Tanushree Dutta On Bigg Boss: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांवर (Nana Patekar) केलेल्या गंभीर आरोपांमुळे गेल्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. अशातच अभिनेत्रीनं अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना केलेल्या दाव्यामुळे तिच्या नजरा सर्वांनावर खिळल्या आहेत. गेल्या 11 वर्षांपासून तनुश्री दत्ताला (Tanushree Dutta) 'बिग बॉस'च्या (Bigg Boss) ऑफर येत आहेत, असं तिनं सांगितलं. पण, सर्वच्या सर्व ऑफर आपण नाकारल्याचंही अभिनेत्रीनं पुढे सांगितलं आहे. बॉलिवूड (Bollywood News) ठिकानाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना तनुश्री दत्तानं सलमान खान (Salman Khan) होस्ट करत असलेल्या 'बिग बॉस' (Bigg Boss 19) शोबाबत बोलताना सांगितलं की, तिला कितीही कोटी रुपये ऑफर केले तरीसुद्धा ती 'बिग बॉस'च्या घरात स्पर्धक म्हणून जाणार नाही. कोट्यवधी रुपयांसाठी 'बिग बॉस'मध्ये जाण्याइतपत ती 'स्वस्त' नाही.

Continues below advertisement

'बिग बॉस'ची ऑफर नाकारण्याबाबत तनुश्री दत्ता काय म्हणाली?

तनुश्री दत्तानं मुलाखतीत खुलासा केला की, तिला गेल्या 11 वर्षांपासून 'बिग बॉस' टीमकडून ऑफर येत आहेत, पण तिनं नेहमीच त्या नाकारल्या आहेत. "तुम्हाला खरंच वाटतंय का? मी अशा शोमध्ये जाईन? मी अशा ठिकाणी राहू शकत नाही. मी माझ्या कुटुंबासोबतही राहत नाही. मला बिग बॉसमध्ये कधीच रस नव्हता आणि कधीच राहणार नाही... त्यांनी मला या शोचा भाग होण्यासाठी 1.65 कोटी देऊ केले आहेत. माझ्या लेव्हलच्या आणखी एका बॉलिवूड सेलिब्रिटीलाही अशीच रक्कम ऑफर करण्यात आली आहे. मला बिग बॉसच्या स्टायलिस्टचा फोन आला, जिनं मला विनंती केली आणि सांगितलं की, ती माझ्या खाण्यापिण्याची काळजी घेईल. मी म्हणालो की, जरी त्यांनी मला चंद्राचा तुकडा दिला तरी मी जाणार नाही..."

तनुश्रीनं असंही म्हटलं की, ती इतकी 'स्वस्त' नाही की, ती रिअॅलिटी शोसाठी 'एका पुरूषासोबत एकाच बेडवर झोपेल'. ती म्हणाली, "पुरुष आणि स्त्रिया एकाच हॉलमध्ये झोपतात, तिथेच झोपतात, तिथेच भांडतात... मी ते करू शकत नाही. मी माझ्या उर्जेनुसार माझ्या खाण्यापिण्याबद्दल खूप जागरूक आहे. मी अशा प्रकारची स्त्री दिसते का जी रिअॅलिटी शोसाठी एका पुरूषासोबत एकाच बेडवर झोपेल? मी इतकी स्वस्त नाही. माझी गोपनीयता माझ्यासाठी मौल्यवान आहे. मला माहीत आहे की, जर त्यांनी मला शांततेत काम करू दिलं तर मी यापेक्षा जास्त कमाई करू शकेन..."  

Continues below advertisement

तनुश्री दत्ताची चित्रपट कारकीर्द

2005 मध्ये 'आशिक बनाया आपने' या चित्रपटातून पदार्पण केल्यानंतर, तनुश्री शेवटची 2013 मध्ये 'सुपरकॉप्स व्हर्सेस सुपर व्हिलन' या चित्रपटात दिसली होती. तिच्या कारकिर्दीत तिनं चॉकलेट: डीप डार्क सिक्रेट्स, भागम भाग, सास बहू और सेन्सेक्स आणि रॉक सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. चित्रपट कारकिर्दीला सुरुवात करण्यापूर्वी तिनं 2004 मध्ये फेमिना मिस इंडिया युनिव्हर्सचा किताब जिंकलेला.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Bigg Boss 19 Kunika Sadanand Son Ayaan: 'जेव्हा माझ्या गर्लफ्रेंड होत्या, तेव्हा माझ्या आईचे बॉयफ्रेंड होते'; प्रसिद्ध अभिनेत्रीच्या अफेअरबाबत लेकाचा खळबळजनक खुलासा