एक्स्प्लोर

BMC Election : अभिनेत्री निशा परुळेकर भाजपतर्फे रिंगणात, सेना नेत्याकडून बंडखोरी करत अपक्ष अर्ज ; परुळेकरांच्या अडचणी वाढल्या

BMC Election : भाजप उमेदवार निशा परुळेकर यांच्या विरोधात शिवसेनेच्या शेखर शेरे यांनी बंडकोरी केली आहे. त्यामुळं परुळेकर यांच्या अडचणी वाढल्यात.

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना यांच्यात युती झाली आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 90 जागा मिळाल्या आहेत. तर, भाजप 137 जागांवर निवडणूक लढवत आहे. मुंबई महापालिकेच्या सदस्यांची संख्या 227 इतकी आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. राजकीय पक्षांकडून उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलं, ज्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यांनी बंडखोरी केली आहे. भाजप आणि शिवसेनेच्या जागा वाटपात वॉर्ड क्रमांक 25 भाजपकडे गेला. भाजपनं या ठिकाणी अभिनेत्री निशा परुळेकर यांना उमेदवारी दिली. मात्र, यामुळं नाराज झालेल्या शिवेसनेच्या शेखर शेरे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. यामुळं निशा परुळेकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. 

निशा परुळेकरांविरोधात सेनेच्या शेखर शेरेंची बंडखोरी

मागाठाणे विधानसभेमध्ये शिवसेना भाजप आमने-सामने आल्याचं पाहायला मिळतंय.  भाजपकडून वॉर्ड क्रमांक 25 मधून निशा परुळेकर यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, याच वॉर्डात शिंदे गटाच्या शिवसेनेचे नेते शेखर शेरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शिवसेनेच्या शेखर शेरे यांच्या बंडखोरीमुळे भाजपच्या परुळेकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

Nisha Parulekar: कोण आहेत अभिनेत्री निशा परुळेकर?

अभिनेत्री निशा परुळेकर या प्रसिद्ध अभिनेत्री असून  त्यांनी अनेक चित्रपट व नाटकांमध्ये लक्षवेधी भूमिका केल्या आहेत. भरत जाधव यांच्यासोबत ' सही रे सही' यासारख्या तुफान नाटकात त्यांनी काम केलं आहे.  तसेच महानायक व शिमणा या दोन चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका साकारली होती. शिवाय महेश कोठारे व्हिजन निर्मित दख्खनचा राजा जोतिबा या मालिकेत त्यांनी महालक्ष्मी अंबाबाईचे पात्र साकारले होते. अभिनयाच्या क्षेत्रात अनेक वर्ष काम केल्यानंतर त्यांनी भाजपचं कमळ हाती घेतला आहे. रंगमंचावर, तसेच मोठ्या व छोट्या पडद्यावर प्रेक्षकांची मने जिंकल्यानंतर आता अभिनेत्री निशा परुळेकर राजकारणाच्या रिंगणात नशीब आजमावणार आहेत. अभिनेत्री निशा परुळेकर यांना प्रभाग क्रमांक 25 मधून उमेदवारी जाहीर करण्यात आले आहे. भाजपकडून त्या महापालिकेच्या रिंगणात उतरणार आहेत. भाजप सांस्कृतिक प्रकाशच्या सहसंयोजक म्हणून सध्या त्या भाजपमध्ये काम करत आहेत. 

बंडखोरी शमवण्यासाठी भाजपची रणनीती

बंडोबांना थंड करण्यासाठी भाजपनं वेगळी रणनीती राबवली आहे. मुंबईतील जिल्हाध्यक्षांकडून बंडोबांची यादी मागवली जाणार आहे.  केंद्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश यांची मुंबईच्या नेत्यांसोबत बैठक होणार आहे. अर्जाची मुदत संपल्यानंतर मुंबईतील बंडोबांचा संपूर्ण आढावा घेतला जाणार आहे. बंडखोरांना संपर्क करण्यासाठी स्थानिक नेतृत्वांना सूचना देण्यात आली आहे, अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.  

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtrachi Hasyajatra Fame Nimish Kulkarni: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'त कधीतरीच का दिसतो निमिष कुलकर्णी? अभिनेत्यानं सांगितलं कारण, खंत व्यक्त करत म्हणाला ..
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'त कधीतरीच का दिसतो निमिष कुलकर्णी? अभिनेत्यानं सांगितलं कारण, खंत व्यक्त करत म्हणाला ..
मनोरंजनसृष्टीवर शोककळा! राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; वयाच्या 57 व्या वर्षी आर चेझीयान यांचे निधन
मनोरंजनसृष्टीवर शोककळा! राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; वयाच्या 57 व्या वर्षी आर चेझीयान यांचे निधन
UK मध्ये सुरू झालं पुष्कर जोगच्या 'अंतराल'चं शूटिंग; ब्रिटिश-इंडियन चित्रपटामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला
UK मध्ये सुरू झालं पुष्कर जोगच्या 'अंतराल'चं शूटिंग; ब्रिटिश-इंडियन चित्रपटामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान

व्हिडीओ

Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Moshi Building Collapse: 64 तास उलटले, अजूनही 8 जण ढिगाऱ्याखाली; अत्याधुनिक कटरच्या मशनरीने इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा स्लॅब पाडला, आतापर्यंत काय काय घडलं?
64 तास उलटले, अजूनही 8 जण ढिगाऱ्याखाली; अत्याधुनिक कटरच्या मशनरीने इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा स्लॅब पाडला, आतापर्यंत काय काय घडलं?
Dombivli: 'मला मारू नका...', मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या मारहाणीचा पीडित महिवाल डॉक्टरचाय मानसिक स्थितीवर गंभीर परिणाम, झोपेतही भयकंप; वैद्यकीय क्षेत्रात तीव्र संताप
'मला मारू नका.. मारू नका...' मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या मारहाणीचा पीडित महिला डॉक्टरच्या मानसिक स्थितीवर गंभीर परिणाम, झोपेतही भयकंप; वैद्यकीय क्षेत्रात तीव्र संताप
Devendra Fadnavis on Missing Link: मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
Sheikh Hasina: 'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
Vande Mataram: आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
England vs India T20I: विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
Embed widget