Suraj Chavan: 'मला ती सोडून गेली..गुलीगत धोका'; सुरज चव्हाणला कुणी दिला धोका? मुलाखतीत सगळंच सांगितलं
Suraj Chavan became famous after heartbreak: बिग बॉस मराठी सिझन 5 मधील व्हिनर सुरज चव्हाणनं आपल्या रिलेशनशिपबाबतीत माहिती दिली.

Suraj Chavan About Relationship: बिग बॉस मराठी सिझन 5चा (Suraj Chavan) विजेता अर्थात सुरज चव्हाणनं झापुक झुपूक (Bigg Boss) करत प्रेक्षकांच्या मनात घर तयार केलं. सुरज चव्हाण कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. तो सोशल मीडियातही प्रचंड सक्रीय असतो. त्याच्या प्रत्येक व्हिडीओला लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळतात. दरम्यान, अलिकडेच त्यानं दिलेली एक मुलाखत चर्चेचा विषय ठरत आहे. या मुलाखतीत त्यानं वैयक्तिक आयुष्यापासून बिग बॉस मराठीच्या घरातील किस्से शेअर केले आहेत. दरम्यान, या मुलाखतीत अभिनेत्याने आपल्याला नात्यात धोका मिळाला असल्याचा खुलासा केला आहे. हा धोका सुरजला नेमका कुणाकडून आणि कसा मिळाला? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. मुलाखतीत सुरजने नेमकं कुणाचं नाव घेतलं? सुरजला कुणाकडून धोका मिळाला? जाणून घेऊयात.
मुलाखतीत सुरज चव्हाण म्हणाला, 'मला धोका भेटलेला आहे. एकदाच गुलीगत धोका भेटला. मला ती सोडून गेली. मी जिद्दीला पेटलो. मला तेव्हा प्रचंड राग आला. काहीतरी बनायचं ठरवलं. मी टिकटॉक स्टार होण्याचं ठरवलं. टिकटॉक स्टार झालो. तिला गोरापान मुलगा आवडला. मी कसा काळासावळा मुलगा. मला तिनं कमी लेखलं. म्हणजे कसं असतं, आपल्यात गुण आहे. काळा सावळा असलो तरी, माझ्यामागे पोरी काही कमी नाहीत. आपण हँडसम नसलो तरी चॉकलेट बॉय आहे', असं सुरज चव्हाण म्हणाला.
View this post on Instagram
बिग बॉसबाबतीत सुरज चव्हाण म्हणाला, 'बिग बॉसमधील स्पर्धक गेमसाठी येतात. स्पर्धक कोणत्याही थराला जाऊ शकतात. मला आता बिग बॉस बघू वाटत नाही. बिग बॉसला मी देव मानतो. मी चांगला बोलतो. बिग बॉसच्या घरात मी तयार झालोय', असं सुरज चव्हाण म्हणाला. 'बिग बॉसमधील स्पर्धकांना मी फॅमिली मानतो. माझ्या फॅन्सची इच्छा अशी होती की, माझ्या लग्नात ते येतील, असं वाटलं. सुरज चव्हाणचं लग्न खूप मोठं झालं, कारण महाराष्ट्रातून मला प्रेम मिळालं', असं सुरज चव्हाण म्हणाला.
'माझ्या स्वप्नात पप्पा आले आणि म्हणाले..' (Suraj Chavan on Bigg Boss)
'बिग बॉसच्या घरात मी झोपण्यापूर्वी ध्यान करायला बसायचो. एका रात्रीत स्वप्नात माझे पप्पा आले. ट्रॉफी तर तूच नेणार, असं मला ते म्हणाले होते. माझ्यासाठी ट्रॉफी लक्ष्मी आहे. ट्रॉफी माझ्या नशिबातच होती. बिग बॉसच्या घरातील स्पर्धक लवकर बदलतात', असं सुरज चव्हाण म्हणाला.
Before You Go
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग





















