Bigg Boss Actress Arrested :  जेव्हा एखादा कार्यक्रम हा चर्चेचा विषय असतो त्यावेळी त्यातील कलाकार देखील तितकेच चर्चेत असतात. यासाठी बिग बॉस (Bigg Boss) हा शो ओळखला जातो. पण या कार्यक्रमामुळे अनेक कलाकारांच्या करियरला देखील वेगळी कलाटणी मिळाली. अशीच एक बिग बॉसमुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्रीला पोलिसांनी अटक केल्याची माहिती सध्या समोर येत आहे. 


या अभिनेत्रीवर बेकायदेशीररित्या मूल दत्तक घेतल्याचा आरोप करण्यात आलाय. सध्या ही अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याचप्रमाणे पोलीस तिची पुढील चौकशी करत आहेत. बिग बॉस हा कार्यक्रम जसा टीव्हीवर प्रसिध्दीस आला त्याचप्रमाणे तो ओटीटी माध्यांवरही सुरु करण्यात आला. त्याचप्रमाणे तो वेगवेगळ्या भाषांमध्येही प्रदर्शित करण्यात आला आहे. 






या अभिनेत्रीला पोलिसांनी केली अटक


बिग बॉस ओटीटी कन्नड या सिजनमधून अभिनेत्री सोनू श्रीनिवास गौडा ही प्रेक्षकांच्या भेटीला आली. या कार्यक्रमामुळे तिला प्रसिद्धीही मिळाली. पण सध्या बेकायदेशीररित्या मूल दत्तक घेतल्याच्या आरोपाखाली तिला पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना देखील सध्या धक्का बसला आहे. 






सोशल मीडियावर शेअर केला होता व्हिडिओ 


सोनूने तिच्या मुलीसोबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना तिने मूल दत्तक घेतल्याची माहिती दिली होती. त्यावर तिच्या चाहत्यांकडूनही कमेंट्स करत तिला अभिनंदन करण्यात आलं होतं. पण आता तिने हे मूल बेकायदेशीररित्या दत्तक घेतल्याची माहिती समोर आलीये. त्यामुळे आता सोनूने खरंच बेकायदेशीररित्या दत्तक घेतलं का हे पोलिसांच्या तपासातून समोर येईल पण सध्या सोशल मीडियावर तिच्या अटकेनंतर बराच गोंधळ सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. 






ही बातमी वाचा : 


Urvashi Rautela to Join Politics : उर्वशी रौतेला करणार राजकारणात एन्ट्री? लोकसभेचं तिकीट मिळालं पण...