Urvashi Rautela to Join Politics : सध्या लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election 2024) काळामध्ये अनेक कलाकारांच्या उमेदवारीच्या चर्चा फार जोर धरु लागल्या आहेत. अभिनेत्री कंगणा राणौत (Kangana Ranaut), अक्षय कुमार (Akshay Kumar), माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) या सगळ्या कलाकारांची नावं या यादीमध्ये आहे. पण या सगळ्यात एका अभिनेत्री तिला लोकसभेचं तिकीट मिळालं असल्याचं थेट जाहीरच करुन टाकलं आहे. उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) हीने तिला लोकसभेचं तिकीट मिळालं असल्याचं सांगितलं आहे.
उर्वशीच्या या वक्तव्यानंतर तिच्या राजकारणातील एन्ट्रीची जोरदार चर्चा रंगू लागलीये. पण इतकं सगळं असलं तरीही राजकारणात एन्ट्री करायची की नाही हे मात्र उर्वशीचं अजूनही ठरलं नाहीये. त्यामुळे तिच्या या वक्तव्यामुळे उर्वशी सध्या नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आलीये. त्यातच उर्वशीला कोणत्या पक्षाने लोकसभेचं तिकीट दिलं आहे, याची देखील उत्सुकचा सर्वांना लागून राहिलीये.
उर्वशी राजकारणात करणार एन्ट्री?
अभिनेत्री उर्वशी रौतेला ही अनेक कारणांमुळे चर्चेचा विषय ठरते. त्यातच आता नुकतच राजकारणातील एन्ट्रीवर उर्वशीने केलेल्या एका कमेंट्सने साऱ्यांचच लक्ष वेधून घेतलं आहे. एका मुलाखतीदरम्यान उर्वशीनं म्हटलं की, मला एका पक्षाकडून लोकसभेचं तिकीट मिळालं आहे. पण राजकारणात एन्ट्री करायची की नाही हे अद्याप माझं ठरलेलं नाहीये. तसेच तिने तिच्या राजकारणातील एन्ट्रीवर तिच्या चाहत्यांना देखील कमेंट्स करुन यावर प्रतिक्रिया देण्यास सांगितलं आहे.
उर्वशी पुन्हा एकदा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर
दरम्यान उर्वशीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरही बराच व्हायरल होतोय. यावर एकाने लिहिलं की, तिकीट मिळाल्यानंतर राजकारणात एन्ट्री करणारी ही पहिलीच महिला असेल. तर आता देशाचं काय होणार अशा देखील कमेंट्स काहींनी लिहिल्या आहेत. राजकारणात येऊन काय करणार असा सवाल काहींना विचारलाय. त्यामुळे उर्वशी सध्या तिच्या राजकारणातील चर्चांमुळे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आलीये. त्यामुळे आता उर्वशी राजकारणात एन्ट्री करणार का आणि केली तर कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार याची उत्सुकता सध्या चाहत्यांमध्ये लागून राहिली आहे.