एक्स्प्लोर

'देव चोरला माझा'; अजित पवारांच्या निधनानंतर बिग बॉस विजेता सूरज चव्हाण भावुक, डोळे पाणावले

Suraj Chavans Heartfelt Post for Ajit Pawar Goes Viral: अजित पवार यांच्या निधनानंतर सूरज चव्हाण भावुक. अजित पवारांनी दिलेल्या मदतीची आठवण काढत खास पोस्ट केली शेअर.

Suraj Chavans Heartfelt Post for Ajit Pawar Goes Viral: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाची बातमी समोर येताच संपूर्ण राज्य हादरलं. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक प्रचारासाठी ते मुंबईहून बारामतीच्या दिशेनं रवाना झाले होते.  मात्र, लँडिंगवेळी त्यांच्या विमानाचा अपघात झाला. विमानाचा स्फोट होताच अजित पवार यांच्यासह एकूण 5 जणांचा मृत्यू झाला. या विमान अपघातात महाराष्ट्राने एक रूबाबदार नेता गमावला असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.  अजित पवार यांच्या निधनानंतर नेते मंडळींसह सिनेकलाकारांनाही  अश्रूंचा बांध फुटला. बिग बॉस मराठी सिझन पाचचा  विजेता सूरज चव्हाण यानेही पोस्टद्वारे दु:ख व्यक्त केलं. यावेळी त्याच्या शब्दातून सूरज प्रचंड भावुक झाला असल्याचं पाहायला मिळालं. सध्या सूरज चव्हाणची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

अजित पवारांसाठी सूरज चव्हाणची भावुक पोस्ट

सूरज चव्हाणने अजित पवार यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियात शेअर केले.  एका फोटोमध्ये सूरज चव्हाण अजित पवार यांना नमस्कार करताना दिसत आहे. तर, इतर फोटो हे अजित पवार यांचे आहेत. सूरज चव्हाणला अजित पवारांनी घर बांधून देण्याचं वचन दिलं होतं. ते वचन अजित दादांनी पूर्ण केलं होतं.  तेव्हा सूरज चव्हाण याने अजित पवार यांचे मनापासून आभार मानले. आज अजित पवार यांचा विमान अपघातात निधन झालं. निधनाची बातमी समोर येताच सूरज चव्हाणला दु:ख अनावर झालं. त्यानं अजित पवार यांच्यासाठी खास पोस्ट शेअर केली.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Suraj Chavan (@official_suraj_chavan1151)

"मित्रांनो.  आज माझा देव चोरला.  मला या गोष्टीवर अजिबात विश्वास बसत नाहीये, आपले लाडके कार्यसम्राट, आपले दादा आज आपल्यात नाहीयेत.. माझ्यासारख्या एका गरीब मुलाला त्यांनी सोन्यासारखं घर बांधून दिलं.  माझी काळजीही घेतली.  तसेच मला नवीन आयुष्य त्यांनी मिळवून दिलं.  अजित दादांसारखा देवमाणूस मी आजवर पाहिलेला नाही.   हा देवमाणूस आता या जगात नाही.  या गोष्टीचं मला लई वाईट वाटत आहे.  मला या गोष्टीचं खूप दु: ख होत आहे. माझ्या आई आणि आप्पांनंतर अजित दादांनी माझ्यासाठी   खूप केलं आहे. आयुष्यभर मी त्यांची आठवण  काळजात सांभाळून ठेवेन..", अशा आशयाचे पोस्ट त्यानं खास अजित पवार यांच्यासाठी लिहून शेअर केली आहे.

सध्या सूरज चव्हाणची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी त्याच्या पोस्टवर कमेंट करून दु:ख व्यक्त केलं.

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Pravin Tarde: नवीन गाडी घेतल्यावर जुनी गाडी स्ट्रगल करणाऱ्या कलाकारांना देतात प्रवीण तरडे; कारण सांगत म्हणाले...
नवीन गाडी घेतल्यावर जुनी गाडी स्ट्रगल करणाऱ्या कलाकारांना देतात प्रवीण तरडे; कारण सांगत म्हणाले...
‘मी संसार माझा रेखिते’मध्ये नवरात्री स्पेशल महाट्विस्ट; लेकीच्या संरक्षणासाठी अनुप्रिया धारण करणार दुर्गेचं रूप
‘मी संसार माझा रेखिते’मध्ये नवरात्री स्पेशल महाट्विस्ट; लेकीच्या संरक्षणासाठी अनुप्रिया धारण करणार दुर्गेचं रूप
Bharat Jadhav Webseries: भरत जाधव नव्या अंदाजात, वेब शोमध्ये झळकणार, 'कोण यशवंत पानसरे' चर्चेत; कोर्ट रुम ड्रामा कुठे अन् कधी पाहता येणार?
भरत जाधव नव्या अंदाजात, वेब शोमध्ये झळकणार, 'कोण यशवंत पानसरे' चर्चेत; कोर्ट रुम ड्रामा कुठे अन् कधी पाहता येणार?
Naach Na Marathi Song: महाराष्ट्र ते मेक्सिको! स्वॅगर बॉय आणि फ्रीबोटचं 'नाच ना' गाणं रिलीज, मराठी-हिंदी-स्पॅनिशचा अनोखा संगम
महाराष्ट्र ते मेक्सिको! स्वॅगर बॉय आणि फ्रीबोटचं 'नाच ना' गाणं रिलीज, मराठी-हिंदी-स्पॅनिशचा अनोखा संगम

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Someshwar Sugar Factory Election Result : 'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
Embed widget