Bigg Boss Marathi Season 5 : रितेश देशमुख (Ritiesh Deshmukh) होस्ट करणार असलेला बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi Season 5) हा कार्यक्रम आता अवघ्या काही तासांमध्ये सुरु होणार आहे. पाचव्या सिझनविषयी प्रेक्षकांना बरीच उत्सुकता लागून राहिली आहे. त्यामुळे घरात आता कोणते स्पर्धक एन्ट्री घेणार याची चर्चाही जोरदार रंगू लागलीये. त्यातच आता बिग बॉसच्या घरात दाखल होणाऱ्या स्पर्धकांचे नॉन रिव्हिलिंग प्रोमो शेअर करण्यात येत आहेत.
नुकताच एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे. यामध्ये एक डान्सिंग क्विन बिग बॉसच्या घरात सहभागी होणार आहे. या प्रोमोवरुन ही डान्सिंग क्विन निक्की तांबोळी असल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी वर्तवला आहे. नेटकऱ्यांनी त्या प्रोमोमध्ये निक्कीला टॅग केलं आहे. त्यामुळे निक्की खरंच बिग बॉसच्या घरात सहभागी होणार का? हे येत्या काही तासांमध्ये स्पष्ट होईल. नाच मेरी रानी या गाण्यावर ही स्पर्धक थिरकताना दिसत आहे.
कोण आहे निक्की तांबोळी?
निक्की तांबळी ही हिंदी बिग बॉसच्या 14 व्या सिझनमध्ये सहभागी झाली होती. त्यामुळे निक्की चांगलीच प्रकाशझोतात देखील आली. त्यानंतर तिला अनेक सेलिब्रेटींच्या म्युझिक अल्बममध्येही दिसली होती. तसेच ती कंचना-3 या सिनेमात देखील झळकली होती. तिने आतापर्यंत अनेक तेलुगु सिनेमांमध्येही दिसली होती.
बिग बॉसच्या घरात सहभागी होणार देसी बॉईज
नुकताच कलर्स मराठी वाहिनीकडून प्रोमो शेअर करण्यात आला आहे. अरबाज पटेल आणि अभिनेता वैभव चव्हाण या दोघांच्या नावाच्या जोरदार चर्चा या प्रोमोमुळे सुरु झाल्या आहेत. त्यामुळे आता बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेणारे हे देसी बॉईज नक्की कोण असणार यासाठी प्रेक्षकांना थोडी वाट पाहावी लागणार आहे. पण त्याआधी अनेकांनी या प्रोमोवर कमेंट्स करत या दोघांची नाव सांगितली आहेत.
'हे' स्पर्धक होणार सहभागी?
बिग बॉसकडून काही स्पर्धकांचे नॉन रिव्हिल प्रोमो देखील शेअर करण्यात आले आहेत. यामध्ये गायक अभिजीत सावंत याच्या नावाची जोरदार चर्चा आहे. त्याचप्रमाणे एका परदेसी गर्लचा देखील प्रोमो शेअर करण्यात आला आहे. त्यामुळे ही परदेसी गर्ल कोण असणार याची देखील उत्सुकता लागून राहिली आहे. अभिनेता शुभंकर तावडे देखील बिग बॉसच्या घरात सहभागी होणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. कारण शुभंकरच्या सोशल मीडिया पोस्टवरुन तो घरात जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यातच सोशल मीडिया स्टार अंकिता वालावलकर हिच्या देखील नावाची जोरदार चर्चा आहे.