एक्स्प्लोर

सागर कारंडे बिग बॉसच्या घरात तंबाखू खात होता?, सिगारेट अन् ड्रिंकलाही परवानगी? नेमकं खरं काय, सगळं समोर आलं!

Bigg Boss Marathi Smoking and Drinking Rules: बिग बॉसच्या घरात तंबाखू, सिगारेट अन् ड्रिंकला परवानगी? नेमकं खरं काय? केतन माणगावकरने स्पष्ट केलं.

Bigg Boss Marathi Smoking and Drinking Rules: रिअॅलिटी शो बिग बॉस मराठी सिझन 6 ला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या रिअॅलिटी शोमधील कलाकार विविध कारणांमुळे चर्चेत असतात. भांडणं असो किंवा मिळून मिसळून खेळ खेळणे,  प्रत्येक कलाकाराचा हटके अंदाज आणि टास्क पूर्ण करण्याची शैली प्रेक्षकांना आवडत आहे.  विकेंडला भाऊच्या धक्क्यावर नेमकं काय घडतंय?  याची उत्सुकता प्रेक्षकांना असते.  घरातील स्पर्धकांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. अलिकडेच सागर कारंडेचा तंबाखू खातानाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता.  हा व्हिडिओ समोर येताच, बिग बॉसच्या घरात व्यसन करण्याची परवानगी आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

केवळ तंबाखू नसून, बिग बॉसच्या घरात स्पर्धकांकडून इतरही व्यसन केले जातात का? स्मोकिंग आणि ड्रिंकिंगला देखील परवानगी आहे का? असा सवालही सध्या उपस्थित केला जात आहे.  दरम्यान, या प्रश्नांची उत्तरं आता समोर आली आहेत. या प्रश्नावर बिग बॉस मराठीचे क्रिएटिव्ह हेड केतन माणगावकर यांनी उत्तर दिलं आहे.  एका मराठी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत केतन म्हणाले, "सागरचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हिडिओत सागर  तंबाखू खात असल्याचं म्हटलं जात आहे. पण तुम्ही नीट व्हिडिओ पाहिलात तर, तुम्हाला कळेल की, तो अभिनेता निळू फुले यांची अॅक्टिंग करत आहे".

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

"सागर तिथे तंबाखू खात नव्हता. सागर या व्हिडिओमध्ये पाठ करून उभा आहे. तिथे राधा देखील होती, राधाचं चाललं होतं की,  बाईईईई, आम्हाला तुमचा शो करायचं असं वगैरे,  त्यांचा हास्यविनोद सुरू होता. सागर काही तंबाखू खात नव्हता.  आपण नॅशनल टिव्हीवर असं काही दाखवू शकत नाही, हे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे", असं मुलाखतीत केतननं स्पष्ट केलं.

दरम्यान, सागरचा तंबाखू खातानाचा व्हिडिओ व्हायरल होताच घरात स्मोकिंग आणि ड्रिंक केली जाते का? बिग बॉसच्या घरात व्यसन करण्यास परवानगी आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रश्नांचे उत्तर देताना केतन म्हणाला, "बिग बॉसच्या फॉरमॅटमध्ये स्मोकिंग झोन आहे.  स्पर्धक स्मोकिंग झोनमध्ये जाऊन सिगारेट ओढू शकतात. परंतु, ते कुठेही इतर ठिकाणी स्मोक करू शकत नाहीत. तसेच आपण ते दाखवूही शकत नाही. ड्रिंकला बिग बॉसच्या घरात परवानगी नाही", असं केतनने मुलाखतीत स्पष्ट केलं.

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Imran Khan: मोदी सरकारकडून देश सोडण्याचा आदेश, इम्रान खानचं मोठं पाऊल; थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव, प्रकरण नेमकं काय?
मोदी सरकारकडून देश सोडण्याचा आदेश, इम्रान खानचं मोठं पाऊल; थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव, प्रकरण नेमकं काय?
OM chapter 1: साऊथ सिनेसृ्ष्टीत 'या' बिग बजेट सिनेमाची चर्चा; धनुष अन् ममूटी पहिल्यांदाच एकाच स्क्रीनवर, कधी होणार रिलीज?
साऊथ सिनेसृ्ष्टीत 'या' बिग बजेट सिनेमाची चर्चा; धनुष अन् ममूटी पहिल्यांदाच एकाच स्क्रीनवर, कधी होणार रिलीज?
Milind Gawali on Madhu Kambikar: 'नृत्य करताना गिरकी घेतली अन्...'; मराठी अभिनेत्री मधु कांबीकरांच्या निधनानंतर प्रसिद्ध अभिनेत्याची भावूक पोस्ट, सांगितली आठवण
'नृत्य करताना गिरकी घेतली अन्...'; मराठी अभिनेत्री मधु कांबीकरांच्या निधनानंतर प्रसिद्ध अभिनेत्याची भावूक पोस्ट, सांगितली आठवण
Nana Patekar Condolence Meet Shivaji Satam: 'नानाचे अनेक किस्से... शिव्या, मारामाऱ्यां... क्रिकेट खेळाचो, पण एक नंबरचा रडी होता...'; नाना पाटेकरांच्या आठवणींत शिवाजी साटम गहिवरले, VIDEO
'नानाचे अनेक किस्से... शिव्या, मारामाऱ्या... क्रिकेट खेळाचो, पण एक नंबरचा रडी होता...'; नाना पाटेकरांच्या आठवणींत शिवाजी साटम गहिवरले, VIDEO

व्हिडीओ

Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Import: सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, चांदीच्या आयातीमध्येही घसरण
सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, जाणून घ्या कारण
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
Embed widget