एक्स्प्लोर

Tanvi Kolte On Ruchita Jamdar: 'ती मला खरकटी म्हणाली होती...'; रुचिता जामदारनं केलेल्या सिगारेटच्या आरोपांवर तन्वी कोलतेचं सडेतोड उत्तर

Tanvi Kolte On Ruchita Jamdar: संपूर्ण सीझनमध्ये तन्वी कोलते आणि सीझनमध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेली स्पर्धक रुचिता जामदार यांच्यात अनेकदा वाद झाले. पण, आता घरापाठोपाठ

Tanvi Kolte On Ruchita Jamdar: 'बिग बॉस मराठी'चा (Bigg Boss Marathi 6) सहावा सीझन चांगलाच गाजला. कधी स्पर्धकांची भांडणं, तर कधी घरातले राडे यामुळे हा सीझन प्रेक्षकांसाठी खूपच रंगतदार ठरला. 17 स्पर्धकांपासून सुरू झालेला हा खेळ शेवटच्या टप्प्यात येऊन खूपच अटी-तटीचा झाला. इतर सिझन्सप्रमाणे यावेळीही स्पर्धकांमध्ये आरोप-प्रत्यारोप, वाद आणि मतभेद पाहायला मिळाले. हे सगळे चढ-उतार पार करुन अभिनेत्री तन्वी कोलते (Tanvi Kolte) हिनं विजेतेपदाच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. पण, तन्वीचं जिंकणं अनेकांना पटलेलं नाही. तसेच, 'बिग बॉस मराठी'च्या ग्रँड फिनालेलाही अनेक स्पर्धकांनी पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालं. 

संपूर्ण सीझनमध्ये तन्वी कोलते आणि सीझनमध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेली स्पर्धक रुचिता जामदार (Ruchita Jamdar) यांच्यात अनेकदा वाद झाले. सीझनला सुरुवात झाली, त्यावेळी पहिल्या आठवड्यात रुचिता आणि तन्वी एकत्र खेळताना दिसल्या. पण त्यानंतर संपूर्ण सीझन दोघीही एकमेकींच्या विरोधात दिसून आल्या. रुचिता आक्रमक स्वभाव आणि गेम स्ट्रॅटर्जी यामुळे ती कायम चर्चेत राहिली. जोपर्यंत रुचिता बिग बॉसच्या घरात होती, तोपर्यंत रुचिता आणि तन्वी यांच्यात अनेकदा वाद झाले. कधीकधी तर दोघींमधल्या भांडणांनी अगदी टोक गाठलं होतं. पण, रुचिता एलिमिनेट झाली आणि तन्वीसोबतची घरातली भांडणं थांबली. पण, रुचितानं घराबाहेर पडल्यानंतरही तन्वीसोबतचं भांडण कायम ठवत तिच्यावर अनेक आरोप केले. 

घरातून बाहेर आल्यानंतर रुचिता जामदारनं मुलाखत दिली. या मुलाखतीत रुचितानं तन्वीवर काही आरोप केले. तिच्या मते, तन्वी वारंवार सिगारेट ओढून त्याचा धूर तिच्या चेहऱ्यावर सोडायची, ज्यामुळे तिला त्रास होत होता. तन्वी घरात होती, तोपर्यंत तिला याबाबत काहीच माहीत नव्हतं. पण, 100 दिवसांनी विजेती होऊन घराबाहेर पडल्यानंतर तन्वीला रुचितानं केलेल्या आरोपांबाबत कळलं आणि तिनं तिच्या आरोपांवर आपली बाजू मांडली आहे. 

'बिग बॉस मराठी'ची ट्रॉफी जिंकल्यानंतर तन्वी कोलतेनं 'अल्ट्रा बझ मराठी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना तन्वीनं रुचिताच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. 

रुचिताबाबत बोलताना तन्वी कोलते नेमकं काय म्हणाली?

तन्वी कोलते म्हणाली की, "ती मला खरकटी म्हणाली होती. खरकटी या शब्दाला डिफेंड करण्यासाठी ती माझ्यावर स्मोकिंगचा आळ घेते हे कितपत योग्य आहे, हे मला समजत नाही आणि जर आपण आळ टाकतोय, तर ते बाहेर तसं आहे का? तसं दिसतंय का? ती व्यक्ती हे खरंच करतेय का? आपण बघितलं आहे का? याचा आधी विचार करावा. मला असं वाटतं की एका मुलीने दुसऱ्या मुलीची रिस्पेक्ट ठेवली पाहिजे. बाहेरच्या समाजात पण मुलींनी दुसऱ्या मुलींना धरून चाललं पाहिजे. मी बिग बॉस आत मध्ये खेळत होती, ती बाहेर पडली.... मला माहीत नाही तिने बाहेर पडल्यावर असे आरोप माझ्यावर का लावले..."

"मी स्मोकिंग करत नाही असं जर मी म्हटलं तर ज्या लोकांना ते पटले की मी स्मोकिंग करते त्यांची मतं परिवर्तन आता मी करू शकत नाही. कारण त्यांनी मनामध्ये धरून ठेवलच आहे की मी स्मोकिंग क्वीन आहे. त्यामुळे मी कितीही बोलले की मी नाही करत तरीही मी त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकत नाही. मला वाटतं की आपण बाहेर पडलो, आपण नाही जिंकू शकलो तर एखाद्याला हरवायचा सुद्धा प्रयत्न करू नये मी जर असते तिच्या जागी तर मी नक्कीच असं केलं नसतं . बिग बॉस आत मध्ये सगळेच खेळले सगळ्या प्रकारे खेळले...", असं तन्वी कोलते म्हणाली. 

पुढे बोलताना तन्वी कोलते म्हणाली की, "बाहेर पडल्यावर आपण एखाद्याबद्दल चांगलं बोलू शकत नसलो तर वाईटही बोलायला नाही पाहिजे. ही गोष्ट मी अमलात आणते. मला कोणाबद्दल काहीही वाटत असू देत पण मी बिग बॉस चा गेम आत मध्येच सोडून आलेली आहे. मला बाहेर कोणाबद्दल काहीच बोलायचं नाही. मला तिच्याबद्दलही काहीच बोलायचं नाही. तिने स्टेटमेंट दिलं, तिच्या वाईटासाठी, चांगल्यासाठी काहीही असू देत पण तिने ते केलं. त्यात ती सक्सेसफुल ठरली... नाही ठरली याबद्दलही मला काही बोलायचं नाही. मला पाडायचे प्रयत्न सगळीकडे चालू होते पण काही फरक पडला नाही . ज्यांचं माझ्यावर मनापासून प्रेम होतं त्यांनी ते दाखवलं आणि त्याच्यामुळेच मी इथे ट्रॉफी घेऊन आहे..."

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Tanaji Galgunde Matka King Web Series: 'सैराट' फेम लंगड्या पुन्हा एकदा नागराज मंजुळेंसोबत; 'मटका किंग'मध्ये तानाजी गालगुंडे महत्त्वाच्या भूमिकेत

महत्त्वाच्या बातम्या

Hrithik Roshans Dating App: हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?
हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?
Pakistan Singer in India: पाकिस्तान सोडलं अन् भारतात राहायला आला हा गायक; आशा भोसलेंच्या आग्रहामुळे बॉलिवूडमध्ये एन्ट्री, 15 ऑगस्टलाच साजरा करतो वाढदिवस
पाकिस्तान सोडलं अन् भारतात राहायला आला हा गायक; आशा भोसलेंच्या आग्रहामुळे बॉलिवूडमध्ये एन्ट्री, 15 ऑगस्टलाच साजरा करतो वाढदिवस
Trisha Krishnan with Vijays Parents: विजय थलपतींच्या आई-वडिलांसोबत तृषा कृष्णन; पिवळी साडी अन् केसात गजरा, स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात अभिनेत्रीचा खास अंदाज
विजय थलपतींच्या आई-वडिलांसोबत तृषा कृष्णन; पिवळी साडी अन् केसात गजरा, स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात अभिनेत्रीचा खास अंदाज
Amitabh Bachchan on Dharmendra: धर्मेंद्र यांच्या घरात 4-5 अनोळखी जण शिरले अन् थेट पायऱ्या चढू लागले; 'ही-मॅन' ने प्रश्न विचारताच ..,अमिताभ बच्चन यांनी सांगितला किस्सा
धर्मेंद्र यांच्या घरात 4-5 अनोळखी जण शिरले अन् थेट पायऱ्या चढू लागले; 'ही-मॅन' ने प्रश्न विचारताच ..,अमिताभ बच्चन यांनी सांगितला किस्सा

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
Embed widget