एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi: एका चुकीने सगळं गमावलं...; बिग बॉसच्या घरात ढसाढसा रडला, 'हा' स्पर्धक संपूर्ण सिझनसाठी झाला नॉमिनेट

Vishal Kotian Cries After Season-Long Nomination: Bigg Bossमध्ये विशाल आणि राकेशमध्ये जोरदार भांडण झालं. यानंतर बिग बॉसने विशालला शिक्षा सुनावली.

Vishal Kotian Nominated for Entire Season: बिग बॉस मराठीचा सहावा सिझन (Bigg Boss Marathi) आता अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. बऱ्याच गोष्टींमुळे बिग बॉसचं घर चर्चेत राहिलं.  नॉमिनेशन टास्कमध्ये विशाल आणि राकेशमध्ये  राडा झाला. भांडणामुळे बिग बॉसच्या घरातील वातावरण तापलं होतं. यानंतर राकेशच्या (Rakesh Bapat) कुटुंबाने प्रसिद्धी पत्रक जारी करत,  विशालवर अॅक्शन घेण्याची विनंती केली. कुणाच्या  वैयक्तिक आयुष्याबाबत बोलणं चुकीचं आहे, असं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर प्रेक्षक आणि नेटकऱ्यांनीही विशालवर टीका केली.   आता बिग बॉसने  विशालला (Vishal Kotian) शिक्षा दिली आहे. विशालला संपूर्ण सिझनसाठी नॉमिनेट (Nomination) करण्यात आलं आहे. याचा प्रोमो कलर्स मराठीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.  या प्रोमोमध्ये  स्पर्धक विशाल कोटियन ढसाढसा रडताना दिसत आहे.  सध्या त्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

विशाल कोटियनला पश्चाताप, बिग बॉसच्या घरात ढसाढसा रडला (Bigg Boss Marathi Vishal Kotian)

बिग बॉसच्या घरात अलिकडेच तिकीट टू फिनाले हा टास्क पार पडला. या टास्कमध्ये तन्वी कोलतेनं बाजी मारली. सहाव्या सिझनची पहिली फायनलिस्ट अभिनेत्री तन्वी कोलते ठरली. तिचं विशेष कौतुक केलं जात आहे. एकीकडे तन्वी कोलते ट्रॉफी जिंकण्याच्या प्रवासात एक पाऊल पुढे आहे तर, दुसरीकडे विशाल कोटियनने सर्व काही गमावलं आहे. एका चुकीमुळे विशालला ही शिक्षा भोगावी लागत आहे.  राकेशसोबत झालेल्या राड्यानंतर विशालला बिग बॉसने शिक्षा सुनावली आहे. विशालला संपूर्ण सिझनसाठी नॉमिनेट करण्यात आलं आहे. यामुळे त्याला प्रचंड पश्चाताप होतोय. 

विशालला संपूर्ण सिझनसाठी नॉमिनेट करण्यात आलं आहे (Vishal Kotian And Rakesh Bapat)

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

कलर्स मराठीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये विशाल हा एकटाच पूल जवळ बसलेला दिसतो आहे.  तो ढसाढसा रडत म्हणतो, 'बिग बॉसच्या घरात मी 12 आठवडे अगदी जीव तोडून खेळलो.  फक्त एका चुकीमुळे मी सगळं काही घालवलं, गमावलं.  या घरात मी काहीच करु शकत नाही.  मला माझ्या बाबांसाठी खेळायचं आहे. आईसाठी जिंकायचं  आहे.  पण आता कसे, ते मला कळत नाही', असं विशाल म्हणतो.   बिग बॉसच्या घरात झालेल्या राड्यानंतर राकेशला एका आठवड्यासाठी तर, विशालला संपूर्ण सिझनसाठी नॉमिनेट करण्यात आलंय.

भाऊच्या धक्क्यावरही रितेश देशमुख विशालवर भडकला होता. त्यानं  विशालला कडक शब्दांत सुनावलं होतं. 'विशाल तुम्ही राकेश यांना नाही तर, जिंकण्याच्या ट्रॉफीला धक्का मारला आहे.  महाराष्ट्राला हे अजिबात आवडलेलं नाही. हे खपवून घेतलं जाणार नाही', असं रितेश विशालला म्हणतो. प्रेक्षक तसेच नेटकऱ्यांनीही विशालच्या वागणुकीवर संताप व्यक्त केला. आता प्रेक्षकांचे लक्ष ग्रँड फिनालेकडे आहे. बिग बॉस मराठीची ट्रॉफी नेमकं कोण जिंकणार? याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

FIR दाखल होताच मोबाईलमध्ये सगळ्यात पॉवरफुल नंबर शोधला; फोन करताच काय घडलं?, समय रैनाने सगळं सांगितलं!

महत्त्वाच्या बातम्या

Upcoming Movies Box Office: 14 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 'या' 4 मोठ्या फिल्म्स; कोण मारणार बाजी?
14 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 'या' 4 मोठ्या फिल्म्स; कोण मारणार बाजी?
Toxic Yash Animal Scene: यशने रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’मधील 'तो' सीन केला कॉपी? ‘टॉक्सिक’मधील न्यूड लूकवर होतंय ट्रोलिंग
यशने रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’मधील 'तो' सीन केला कॉपी? ‘टॉक्सिक’मधील न्यूड लूकवर होतंय ट्रोलिंग
Bayangi Palaychi Nahi Talaychi movie: नारळ अन् विझलेला दिवा; 'बायंगी: पाळायची नाही टाळायची!'ची रंजक कथा, कधी होणार रिलीज?
नारळ अन् विझलेला दिवा; 'बायंगी: पाळायची नाही टाळायची!'ची रंजक कथा, कधी होणार रिलीज?
South Star Ravi Prakash: मराठी सिनेमात साऊथ अभिनेत्याची एन्ट्री! मराठी शिकण्यासाठी राऊडी कलाकाराने पाहिली 'ही' प्रसिद्ध टीव्ही मालिका, म्हणाला....
मराठी सिनेमात साऊथ अभिनेत्याची एन्ट्री! मराठी शिकण्यासाठी राऊडी कलाकाराने पाहिली 'ही' प्रसिद्ध टीव्ही मालिका, म्हणाला....

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक, तज्त्र म्हणाले...
विक्रेते बनले खरेदीदार, FPI कडून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
Embed widget