एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi 6: घटस्फोटावरून डिवचताच राकेश अन् विशालमध्ये जोरदार राडा; एकमेकांच्या अंगावर धावून गेले अन् ... ; चाहते शॉक

Bigg Boss Marathi 6: घरातील सदस्य त्यांना रोखण्यासाठी प्रयत्न करतानाही दिसतात. बिग बॉसच्या घरातील हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठीचे सहावे पर्व (Bigg Boss Marathi 6) सध्या प्रचंड चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरातून डबल एव्हिक्शन  झाल्यानंतर बिग बॉसच्या घरात नवा ड्रामा पाहायला मिळाला. नव्या आठवड्याच्या पहिलाच दिवशी नॉमिनेशन ची प्रक्रिया पार पडल्यानंतर राकेश आणि विशाल या दोन स्पर्धकांमध्ये चांगलाच राडा झाल्याचं दिसलं . (Rakesh Bapat Vishal Kotiyan Fight) याचे सुरुवात होते नॉमिनेशनवरून . राकेश विशाल आणि अनुश्रीला नॉमिनेट करतो. त्यावेळी विशाल बद्दल तो बरंच काही बोलतो. मग विशालही राकेशला त्याच्या खाजगी आयुष्यवरून- त्याच्या घटस्फोटावरून डिवचल्याचं दिसतं. दोघांमध्येही शाब्दिक चकमक होते. हा वाद नंतर इतका टोकाला जातो की दोघेही आपापसात भिडल्याचं दिसतं. घरातील सदस्य त्यांना रोखण्यासाठी प्रयत्न करतानाही दिसतात. बिग बॉसच्या घरातील हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. (Bigg Boss Marathi 6 Nomination Task)

नेमकं काय घडलं ?

बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात आता तिकीट टू फिनाल्यासाठी स्पर्धकांमध्ये चुरस रंगली आहे. दरम्यान 12 व्या आठवड्याच्या नॉमिनेशन टास्कमध्ये घरातील घरातील दोन स्पर्धकांमध्ये मोठा राडा झाला. या नॉमिनेशन टास्कमध्ये घरातील प्रत्येक सदस्याचा फोटो टेलिव्हिजनवर दाखवण्यात येतो. नंतर घरातील सदस्यांना एका सदस्याचा टीव्ही फोडून त्याला ग्रँड फिनाले मध्ये जाण्यापासून वाचवायचं आहे. या टास्कदरम्यान राकेश बापटने विशालला नॉमिनेट करत त्याचा टीव्ही फोडला. त्यावेळी राकेश म्हणाला खाजगी आयुष्याबद्दल विशालने बोललं हे मला चुकीचं वाटलं. यावर विशाल प्रचंड भडकल्याच दिसतं. तो राकेश ला त्याच्या घटस्फोटावरून डिवचतो. तो म्हणतो ' तू माझ्या वयाबद्दल बोलतोस ते पर्सनल नाही का ? तुझा दिवस काय झाला ? असं म्हणताच दोघांमध्ये वाद वाढतो. दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून जाताना दिसतात. ' तू माझ्या घटस्फोटाबद्दल का बोलतो ' असा सवाल करत राकेशही विशालच्या अंगावर धावून जातो . दोघांचाही वाद नियंत्रण बाहेर जातो. एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याने बिग बॉस ही दोघांना बाजूला व्हायला सांगतात. घरातील स्पर्धक दोघांना एकमेकांपासून दूर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. 

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Endemol Shine India (@endemolshineind)

प्रेक्षकांच्या कमेंट्स

यानंतर सोशल मीडियावर अनेक जण घडलेल्या राड्यावर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. राकेशने जे केलं ते बरोबर केलं असं अनेक जण म्हणताना दिसतात. राकेश दिपाली आणि तनवी बसून विशालची बाहेरची लाईफ डिस्कस करत होते हेही पर्सनलच होत असेही काहीजण म्हणतात. अनेकांनी राकेशची बाजू घेतल्याचं दिसतंय . एका चाहत्याने म्हटलं ' राकेश नेहमीच शांत राहून खेळतात. त्यांना बोलण्यासारखं किंवा गेम पलटवण्यासारखा पॉईंट मिळतो तेव्हाच ते निर्भीडपणे आपलं मत मांडतात. ' तर काहींनी विशालची ही बाजू घेतल्याचं दिसतंय . ' राकेश एकच धरून बसतो, विशाल पण ऐकत नसतो मग ' अशा कमेंट्सही काहींनी केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Shreya Kalra Lock Upp Season 2 Winner: श्रेया कालरा जिंकली 'लॉक अप 2'ची ट्रॉफी; शिवांगी जोशीला 7 मतांनी हरवत जिंकली 1 कोटींचं बक्षीस
श्रेया कालरा जिंकली 'लॉक अप 2'ची ट्रॉफी; शिवांगी जोशीला 7 मतांनी हरवत जिंकली 1 कोटींचं बक्षीस
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
Raah : यश राज फिल्म्सच्या ‘राह रेकॉर्ड्स’ची पहिली संगीतपेशी; ‘जादूगरी’ हे गीत प्रदर्शित
यश राज फिल्म्सच्या ‘राह रेकॉर्ड्स’ची पहिली संगीतपेशी; ‘जादूगरी’ हे गीत प्रदर्शित
Lakshmi Nivas Zee Marathi Serial 7 Year Leap: ‘सात वर्षांत बरंच काही बदललंय...’; ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत 7 वर्षांचा लीप, तर मुख्य अभिनेत्याचीच एक्झिट, चाहतेही गोंधळले, VIDEO
‘सात वर्षांत बरंच काही बदललंय...’; ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत 7 वर्षांचा लीप, तर मुख्य अभिनेत्याचीच एक्झिट, चाहतेही गोंधळले

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget