एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi 6: राखी घराबाहेर, आता पुढचा नंबर कोणाचा? बिग बॉसच्या घरातून 'हा' शेवटचा स्पर्धक घेणार निरोप?

बिग बॉसच्या घरात उरलेल्या 6  स्पर्धकांमध्ये तन्वी कोलते, दिपाली सय्यद, विशाल कोटियन, अनुश्री माने, राकेश बापट आणि रेवा कौरासे यांचा समावेश आहे.

Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठीचा सहावा सिझन आता शेवटच्या टप्प्यात जातोय. अवघ्या काही दिवसांचा खेळ राहिलेला असताना TOP 5 च्या रेसमध्ये नेमकी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागलंय. दरम्यान शनिवारच्या भागात वादळी एन्ट्री ठरलेली राखी सावंतने बिग बॉसच्या घरातून निरोप घेतला आहे. आता बिग बॉसच्या घरात 6 स्पर्धक उरले आहेत. आज रविवारच्या भागात राखीनंतर होणाला घरचा रस्ता धरावा लागणार? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. 

राखीनंतर कोण जाणार घराबाहेर?

 बिग बॉसच्या घरात उरलेल्या 6  स्पर्धकांमध्ये तन्वी कोलते, दिपाली सय्यद, विशाल कोटियन, अनुश्री माने, राकेश बापट आणि रेवा कौरासे यांचा समावेश आहे. या आठवड्यात राखी, विशाल , दिपाली, अनुश्री आणि राकेश हे पाच जण नॉमिनेट झाले होते. यापैकी आता राखीचा पत्ता कट झालाय. तिकीट टू फिनले मिळवत top 5 मध्ये गेल्याने तन्वी कोलते बिग बॉसच्या घरातील पहिली फायनलिस्ट ठरलीय. दुसरीकडे रेवा कौरसे या आठवड्यात नॉमिनेट नव्हती त्यामुळे ती सुरक्षित आहे.  ती दुसरी फायनलिस्ट असल्याची चर्चाय. त्यामुळे आता  दिपाली, विशाल, अनुश्री आणि राकेश यांच्यापैकी कोण घराबाहेर पडणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

अधिकृत निकाल हा भाऊच्या धक्क्याच्या एपिसोडमध्ये जाहीर होणार आहे.  या आठवड्यात नेमका कोणता स्पर्धक बाद होणार? हे जाणून घेण्यासाठी  प्रेक्षक आतुर आहेत.  सुरुवातीच्या  ट्रेंडनुसार, या आठवड्यात राकेशला  सर्वाधिक मते मिळाली आहेत. त्याच्यानंतर अनुश्रीला जास्त मते मिळाली आहेत. तर, दिपाली सय्यद ही तिसऱ्या स्थानावर आहे.  तसेच बॉटम 2मध्ये राखी आणि विशाल कोटियन होते.  विशालला काही दिवसांपूर्वी बिग बॉसने शिक्षा सुनावली होती. त्यामुळे तो संपूर्ण सिझन नॉमिनेट असणार आहे.  त्यामुळे कोणता स्पर्धक बाद होणार, हे लवकरच भाऊच्या धक्क्याच्या एपिसोडमध्ये उघड होईल. 

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

राखी सावंत घराबाहेर

संपूर्ण घराला आपल्या तालावर नाचवणारी आणि नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकणारी, घरातली सर्वात चर्चेत असणाऱ्या स्पर्धकानं घराचा निरोप घेतला आहे. 'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या सीझनमध्ये झळकलेली टीआरपी क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) घराबाहेर पडली आहे.  

 

महत्त्वाच्या बातम्या

Asha Kale: 'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
ZEE5 Marathi: मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका
मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Embed widget