एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi 6: बिग बॉसच्या घरातील पहिली स्पर्धक आली समोर; कलर्स मराठीने झलक दाखवताच प्रेक्षक म्हणाले, ही तर...

सोशल मीडियावर बिग बॉस मराठी सीजन सहाव्या घरातील पहिला स्पर्धक समोर आला आहे.

Bigg Boss Marathi 6: मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाची एकच चर्चा आहे. 11 जानेवारीपासून बिग बॉसचा (Bigg Boss Marathi 6) नवीन पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण गेल्या कित्येक दिवसांपासून प्रेक्षकांना आतुरता आहे, घरात नेमकं कोण सहभागी होणार याची.  सोशल मीडियावर घरातील संभाव्य स्पर्धकांच्या याद्यांनी धुमाकूळ घातलाय. आता ही उत्सुकता कलर्स मराठीने आणखी ताणली आहे ती स्पर्धकांचा प्रोमो शेअर करत.

सोशल मीडियावर बिग बॉस मराठी सीजन सहाव्या घरातील पहिला स्पर्धक समोर आला आहे. कलर्स मराठीच्या अधिकृत सोशल मीडियावरून या स्पर्धकाचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे.ग्लॅमरस अंदाजात समोर येणाऱ्या सुंदर तरुणीचा चेहरा मात्र अजून यात स्पष्ट दिसत नाही. पण त्यातूनही चाहते स्पर्धकाचा अंदाज बांधत आहेत. फॅशनच्या जगतातील ही सुंदरी भल्या भल्यांवर भारी पडणार असं म्हणत कलर्स मराठीने कोण असेल बरं ही सुपर मॉडेल? असा प्रश्नच चाहत्यांनाच विचारला आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

ग्लॅमरस साडीत दारापाशी थांबलेली सुंदरी कोण?

कलर्स मराठीच्या अधिकृत पेजवरून बिग बॉस मराठी 6 मधील पहिल्या स्पर्धकाचे झलक दाखवण्यात आली आहे. यात एक सुंदर तरुणी साडी नेसून ग्लॅमर्स अंदाजात दरवाजात उभी असल्याचे दिसतय. फॅशन जगतातील ही सुंदरी भल्या भल्यांवर पडणार भारी असं कॅप्शन या प्रमोला देण्यात आलंय. खरंतर हा एआय ने बनवलेला प्रोमो आहे तरी देखील चाहत्यांनी या प्रोमोमधील व्यक्ती ओळखण्याचा प्रयत्न केलाय. या पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये चाहते वेगवेगळ्या अंदाज बांधत आहेत. काहींनी ही तरुणी युट्यूबर असल्याचं म्हटलंय. तर काही नाही अभिनेत्री उर्मिला निंबाळकर असेल असं वाटतंय. तर काहीजण सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सोनाली राऊतचे नाव घेत आहेत. 


Bigg Boss Marathi 6: बिग बॉसच्या घरातील पहिली स्पर्धक आली समोर; कलर्स मराठीने झलक दाखवताच प्रेक्षक म्हणाले, ही तर...

आता बिग बॉसच्या घरातील ही व्यक्ती कोण हे रविवारी म्हणजेच 11 जानेवारीला कळणार आहे. पुन्हा एकदा बिग बॉस मराठीचं नवं पर्व गाजवण्यासाठी अभिनेता रितेश देशमुख सज्ज झाला आहे. रितेश ला पुन्हा एकदा भाऊच्या धक्क्यावर पाहण्यासाठी चाहते आतुरले आहेत. 11 जानेवारीपासून रोज रात्री आठ वाजता प्रेक्षकांना बिग बॉस मराठीचा सहावा सीजन पाहता येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Prasad Oak On Dharamveer Movie: 'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
Bollywood First Hit Mother: 16व्या वर्षी लग्न, 4 मुलांची आई अन् इंग्रजांविरोधात बंड... दारुड्या पतीला सोडलं, सिनेमातील पहिली ग्रॅड्युएट अभिनेत्री अन् पहिली 'हिट आई' कोण?
16व्या वर्षी लग्न, 4 मुलांची आई अन् इंग्रजांविरोधात बंड... दारुड्या पतीला सोडलं, सिनेमातील पहिली ग्रॅड्युएट अभिनेत्री अन् पहिली 'हिट आई' कोण?
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Lage Raho Munnabhai Ashwin: 'लगे रहो मुन्नाभाई' फेम अभिनेत्याची कार दुचाकीला धडकली, अपघातात बापलेक जखमी; समोरच्याचं हाड मोडलं अन्..., VIDEO
'लगे रहो मुन्नाभाई' फेम अभिनेत्याची कार दुचाकीला धडकली, अपघातात बापलेक जखमी; समोरच्याचं हाड मोडलं अन्..., VIDEO

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Embed widget