एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi 6: राखी बाहेर जाणार म्हणताच हसले; पण क्षणात बिग बॉसचा एक ट्विस्ट अन् गेमच पलटला

बाऊन्सर्स राखीला बाहेर नेत असल्याचं दृश्य पाहून अनेक प्रेक्षकांनी ‘राखी नसली तर मजा नाही’ अशा प्रतिक्रिया दिल्या होत्या.

‘Bigg Boss Marathi 6’च्या ताज्या भागात प्रेक्षकांना जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळाला. भागाच्या सुरुवातीला राखी सावंतला घराबाहेर काढण्यात येणार असल्याची घोषणा झाली आणि काही स्पर्धकांनी उघडपणे आनंद व्यक्त केलेला. काही जणांनी तर सुटकेचा निश्वास टाकत तिच्या जाण्यावर हसतानाही दिसले.

मात्र काही क्षणांतच सगळं चित्र बदललं. बिग बॉसनं अचानक नवा ट्विस्ट देत राखी सावंतला घराची ‘उत्तराधिकारी’ घोषित केलं. ही घोषणा होताच घरातील स्पर्धकांचे चेहरे पडले. कारण या पदामुळे राखीला काही विशेष अधिकार मिळणार, अशी चर्चा रंगू लागली आहे.

बिग बॉसच्या घरातील समीकरण बदलणार

या अनपेक्षित घडामोडीनंतर घरातील समीकरणं पूर्णपणे बदलल्याचं दिसत आहे. सोशल मीडियावरही या एपिसोडची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. बाऊन्सर्स राखीला बाहेर नेत असल्याचं दृश्य पाहून अनेक प्रेक्षकांनी ‘राखी नसली तर मजा नाही’ अशा प्रतिक्रिया दिल्या होत्या.

दरम्यान, बिग बॉसनं विनोदवीर सागर कारंडे यांना बोलावून राखीला ‘उत्तराधिकारी’चा मुकूट घालण्यास सांगितलं. घरात तिच्या नावाचा जयघोषही करण्यात आला. राखी आता या नव्या भूमिकेत काय निर्णय घेणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. या ट्विस्टमुळे आगामी भागांबद्दल उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. घरातील इतर स्पर्धक राखीविरोधात एकत्र येणार का, की तीच गेमवर वर्चस्व गाजवणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.

दरम्यान, बिग बॉसच्या घरात राखी सावंतने एन्ट्री घेताच धुमाकूळ सुरू झाला आहे. राखीचं आणि रुचिताचं जोरदार भांडण झालेलं पाहायला मिळालं. त्याचबरोबर राखीने प्रत्येक स्पर्धकामध्ये आग लावलीय. इतकंच नव्हे तर, तन्वीला प्राजक्ताविरुद्धही राखीनेचं भडकवल्याचं दिसलं. मात्र, राखीची बिग बॉसच्या घरात एन्ट्री झाल्याचा सगळ्यात जास्त आनंद सागर कारंडेला झाला आहे. राखी घरात आल्यापासून सागर कारंडे तिच्याशी फ्लर्ट करताना दिसतो आहे. या दोघांची जोडी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे हे नक्की.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Model Divyanshu Joshi Died: 20 वर्षांपासून बंद होती खाण, तरीही फोटो काढायला पाण्यात उतरला अन्...; सुप्रसिद्ध मॉडेलचा बुडून दुर्दैवी अंत
20 वर्षांपासून बंद होती खाण, तरीही फोटो काढायला पाण्यात उतरला अन्...; सुप्रसिद्ध मॉडेलचा बुडून दुर्दैवी अंत
Youtube Web Series Dhindora: फक्त 9 एपिसोड्स आणि 500 मिलियनहून अधिक व्ह्यूज; 'या' वेब सीरिजनं युट्यूबवर घातलाय धुमाकूळ
फक्त 9 एपिसोड्स आणि 500 मिलियनहून अधिक व्ह्यूज; 'या' वेब सीरिजनं युट्यूबवर घातलाय धुमाकूळ
Star Pravah Marathi Serial Anandi: भूमिकेसाठी कायपण! मालिकेतलं महत्त्वाचं वळण साकारण्यासाठी 'आनंदी' बनणार जिवंत शिल्प PHOTOs
भूमिकेसाठी कायपण! मालिकेतलं महत्त्वाचं वळण साकारण्यासाठी 'आनंदी' बनणार जिवंत शिल्प PHOTOs
Aamir Khan Third Wife Gauri Spratt: तिसऱ्यांदा बोहोल्यावर चढणार 'मिस्टर परफेक्शनिस्ट'; आमीर खान आणि सहा वर्षांच्या मुलाची आई असलेल्या गौरी स्प्रॅटच्या वयात किती अंतर?
तिसऱ्यांदा बोहोल्यावर चढणार 'मिस्टर परफेक्शनिस्ट'; आमीर खान आणि सहा वर्षांच्या मुलाची आई असलेल्या गौरी स्प्रॅटच्या वयात किती अंतर?

व्हिडीओ

WhatsApp Scam Alert Special Report : मेसेजवरील एका क्लिकवर स्कॅम मेसेज ओळखणं होणार सोपं
Shashikant Shinde : सरकारचे भांडवलधार्जिणे निर्णय घेल्याने महागाई वाढतेय- शशिकांत शिंदे
Raosaheb Danve on Abdul Sattar : अब्दुल सत्तार चार तारखेला अर्ज मागे घेतील - रावसाहेब दानवे
Congress Crisis Special Report : काँग्रेसमध्ये मोठी धुसफुस! हर्षवर्धन सपकाळांविरोधात आमदार दिल्लीत?
Shivsena Merger : सत्तारांच्या एका विधानामुळे महायुतीत मिठाचा खडा? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lalit Modi : कोची टस्कर्स प्रकरणात शशी थरुर यांना कोण पाठिंबा देत होतं? ललित मोदीचे सोनिया गांधींसह काँग्रेस नेत्यांची नावं घेत खळबळजनक दावे
कोची टस्कर्स प्रकरणात शशी थरुर यांना कोण पाठिंबा देत होतं? ललित मोदीचे खळबळजनक दावे
Aamir Khan Third Wife Gauri Spratt: तिसऱ्यांदा बोहोल्यावर चढणार 'मिस्टर परफेक्शनिस्ट'; आमीर खान आणि सहा वर्षांच्या मुलाची आई असलेल्या गौरी स्प्रॅटच्या वयात किती अंतर?
तिसऱ्यांदा बोहोल्यावर चढणार 'मिस्टर परफेक्शनिस्ट'; आमीर खान आणि सहा वर्षांच्या मुलाची आई असलेल्या गौरी स्प्रॅटच्या वयात किती अंतर?
Kolhapur Crime news: प्रेमाचे आमिष, ब्लॅकमेलिंग, अत्याचाराची जागा अन् माहिती ; धक्कादायक धागेदोरे हाती, आरोपींची आर्थिक परिस्थिती चांगली, पोलीस तपासात महत्त्वाची माहिती समोर
प्रेमाचे आमिष, ब्लॅकमेलिंग, अत्याचाराची जागा अन् माहिती ; धक्कादायक धागेदोरे हाती, आरोपींची आर्थिक परिस्थिती चांगली, पोलीस तपासात महत्त्वाची माहिती समोर
SEBI : एका तक्रारीनं 15 लाख कोटींचा अपहार उघड, सेबीचा राजेश एक्सपोर्टसला दणका,सर्वात मोठ्या सोन्याच्या रिफायनरीचा मालक संकटात, शेअर बाजारात ट्रेडिंगला बंदी
सेबीचा राजेश एक्सपोर्टसला दणका,सर्वात मोठ्या सोन्याच्या रिफायनरीचा मालक संकटात, शेअर बाजारात ट्रेडिंगला बंदी
Andheri Subway Mumbai Rain: अंधेरी सब-वेसाठी आता 'आदित्य पॅटर्न'; अमित साटमांच्या पुढाकाराने 500 कोटींच्या टाक्यांचा प्रस्ताव
अंधेरी सब-वेसाठी आता 'आदित्य पॅटर्न'; अमित साटमांच्या पुढाकाराने 500 कोटींच्या टाक्यांचा प्रस्ताव
Dhule ACB Trap : 'पाच हजार द्या, अन्यथा बिल थांबवेन'; ज्वारी खरेदीच्या पावतीसाठी लाच मागितली, धुळ्याचा पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
'पाच हजार द्या, अन्यथा बिल थांबवेन'; ज्वारी खरेदीच्या पावतीसाठी लाच मागितली, धुळ्याचा पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
Devendra Fadnavis : अत्याधुनिक तंत्रज्ञानात महाराष्ट्र देशात अग्रस्थानी! राज्याचे 'क्वांटम' आणि 'डीप टेक' धोरण लवकरच; मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा निर्णय
अत्याधुनिक तंत्रज्ञानात महाराष्ट्र देशात अग्रस्थानी! राज्याचे 'क्वांटम' आणि 'डीप टेक' धोरण लवकरच; मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा निर्णय
कुवेत विमानतळावर झालेल्या इराणी हल्ल्यात भारतीय नागरिक ठार; 63 जखमी, अनेकांची प्रकृती गंभीर; ड्रोन हल्ल्यात अमेरिकन बेस सुद्धा टार्गेट
कुवेत विमानतळावर झालेल्या इराणी हल्ल्यात भारतीय नागरिक ठार; 63 जखमी, अनेकांची प्रकृती गंभीर; ड्रोन हल्ल्यात अमेरिकन बेस सुद्धा टार्गेट
Embed widget