एक्स्प्लोर

'डॉन म्हणतायेत मला डॉन' प्रभू शेळकेनं दाखवले त्याचे खरे रंग; विशालसोबत झाली शा‍ब्दिक चकमक, बिग बॉसचा नवा प्रोमो व्हायरल

Vishal Kotian And Prabhu Shelkes Heated Fight: विशाल कोटियन आणि प्रभू शेळके यांच्यातील शाब्दिक चकमक अन् वादावादीमुळे बिग बॉसच्या घरातील वातावरण तापलं.

Vishal Kotian And Prabhu Shelke argument:  बिग बॉस मराठी सिझन 6ला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. बिग बॉसच्या घरातून आतापर्यंत 2 स्पर्धकांना नारळ देण्यात आला आहे.  स्पर्धकांचे विविध रंग आता समोर येत आहेत.  काही स्पर्धकांची शा‍ब्दिक चकमक होत आहे. तर, काहींचे टास्क खेळताना बाचाबाची होत आहे. दरम्यान, चुकीचं वागत असलेल्या स्पर्धकांना रितेश देशमुख चांगलंच धारेवर धरत आहेत. काही दिवसांपासून  विशाल कोटियन आणि प्रभू शेळके यांच्यातील  शा‍ब्दिक चकमक पाहायला मिळत आहे.  एका टास्कमध्ये प्रभूने विशाल नावाचं मडकं, जोरात पाण्यात फेकलं होतं. त्यानंतर विशाल प्रभूला म्हणाला,  'प्रत्येक नॉमिनेशनमध्ये मी तुला नॉमिनेट करेन'. मात्र, यानंतर विशालने प्रभूची माफी मागितली.  यानंतर रितेश देशमुखने भाऊच्या धक्क्यावर प्रभूला चांगलंच धारेवर धरलं. 'तुम्ही खूप लाडात आलाय', असं म्हणत रितेशने त्याला झापलं. 

अशातच कलर्स मराठीने अलिकडेच एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये  विशाल आणि प्रभू यांच्यात शा‍ब्दिक चकमक झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. या प्रोमोमध्ये विशाल प्रभूला म्हणतो, 'तू  माझ्यासाठी इतका महत्वाचा नाही आहेस', त्यावर प्रभू, ' तुम्हाला घमंड आला आहे. बॉडी असूनही उपयोग नाही' असं म्हणतो.    तेव्हा विशाल, 'तू नॉमिनेटेड आहे, मला तुला फुटेज नाही द्यायचं तू जा..'असं प्रभूला म्हणतो.  'डॉन म्हणतायेत मला डॉन. मला हलक्यात घ्यायचं नाही हं. दुसऱ्याची वाट लावून मी बाहेर जाणार', असं प्रभू विशालला आकांडतांडव करत म्हणतो.   दोघांचाही आवाजही यावेळेस वाढतो. 

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

दोघांच्या बाचाबाचीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. व्हिडिओतून दोघांमध्ये चांगलीच जुंपली असल्याचं पाहायला मिळत आहे. कलर्स मराठीने बिग बॉसचा हा प्रोमो समाजमाध्यमांमध्ये शेअर केला आहे. तसेच कॅप्शनमध्ये 'डॉन अन् विशालच्या भांडणामुळे फूल फायरी झालंय, बिग बॉस  घरातील  वातावरण...' नंतर 3 इमोजी शेअर केले आहे. असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलं आहे. दरम्यान, विशाल आणि प्रभू यांच्यातील वाद टोकाला जाणार का?  असा प्रश्न  प्रेक्षकांकडून उपस्थित केला जात आहे.


बिग बॉस मराठीच्या प्रोमोवर नेटकऱ्यांनी कमेंट केलं आहे. काहींनी विशालची बाजू घेतली आहे. तर, काहींनी छोटा डॉन प्रभू शेळकेची बाजू घेतली.  एकाने 'हा छोटा डॉन आणि रोशन संधी मिळाली की सिम्पथी घेतात', असं म्हटलं आहे.  सध्या प्रोमो पाहून काहींनी एपिसोड पाहण्याची उत्सुकता दर्शवली.

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Lock Upp 2 Akanksha Chaudhary : 'महिन्यातून 4-5 वेळा शरीरसंबंध...' आर्थिक मदतीच्या नावाखाली प्रसिद्ध अभिनेत्रीसमोर घाणेरडी मागणी, म्हणाली..
'महिन्यातून 4-5 वेळा शरीरसंबंध...' आर्थिक मदतीच्या नावाखाली प्रसिद्ध अभिनेत्रीसमोर घाणेरडी मागणी, म्हणाली..
Upcoming Actress Movies: 600 कोटींची बिग बजेट फिल्म ते 'तुंबाड 2'; यंदा 'या' अभिनेत्री बॉक्स ऑफिस गाजवणार? चित्रपटांची तगडी लाइनअप चर्चेत
600 कोटींची बिग बजेट फिल्म ते 'तुंबाड 2'; यंदा 'या' अभिनेत्री बॉक्स ऑफिस गाजवणार? चित्रपटांची तगडी लाइनअप चर्चेत
Crime Patrol Satish Naikode: 'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्याची फसवणूक, घर देण्याच्या बहाण्याने 25 लाख लुटले, वडिलांचा मृत्यू, स्वत:ला संपवण्याचाही केला प्रयत्न
'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्याची फसवणूक, घर देण्याच्या बहाण्याने 25 लाख लुटले, वडिलांचा मृत्यू, स्वत:ला संपवण्याचाही केला प्रयत्न
Vaibhav Mangle: 'भैय्ये , नेपाळी कामाला ठेवले जातायत..' वैभव मांगलेची कोकणाच्या बदलत्या परिस्थितीवर पोस्ट; म्हणाला...
'भैय्ये , नेपाळी कामाला ठेवले जातायत..' वैभव मांगलेची कोकणाच्या बदलत्या परिस्थितीवर पोस्ट; म्हणाला...

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget