एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस 6'ची पहिली फायनलिस्ट, पण 'ती' एक चूक अन् सारं गमावलं; तन्वी कोलते ट्रोल, नेटकऱ्यांनी विजेतेपदाच्या शर्यतीतून काढलं बाहेर

Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी'चा सहावा सीझन आता लवकरच संपणार आहे. खेळ अगदी शेवटच्या टप्प्यात आलाय. पण, आता फिनाले गाठूनही घरातील सदस्यांमधली भांडणं आणि मनातील खदखद आता चव्हाट्यावर.

Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी सीझन 6' (Bigg Boss Marathi Season 6) आता अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचलाय. त्यामुळे आता घरात ट्वीस्ट, ट्वीस्ट आणि ट्वीस्टच पाहायला मिळतायत. असाच एक ट्वीस्ट बिग बॉसच्या (Bigg Boss Marathi) घरात पाहायला मिळाला. गेल्या आठवड्यात वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून सहभागी झालेली राखी सावंत (Rakhi Sawant) एलिमिनेट झाली. त्याचवेळी आता घरातून राखीपाठोपाठ आणखी एक स्पर्धक घराबाहेर जाणार असल्याचं रितेश देशमुखनं (Riteish Deshmukh) जाहीर केलेलं. त्यानुसार, घरात एलिमिनेशनचा डाव रंगला आणि घरातली वाईल्ड कार्ड स्पर्धक रेवा कौरासे (Reva Kaurase) घराबाहेर गेली. त्यानंतर घराला या सीझनचे टॉप 5 स्पर्धक मिळाले. पण, फिनाले गाठूनही घरातील सदस्यांमधली भांडणं आणि आरोप-प्रत्यारोप थांबण्याचं नाव घेत नाहीत. 

'बिग बॉस मराठी'चा सहावा सीझन आता लवकरच संपणार आहे. खेळ अगदी शेवटच्या टप्प्यात आलाय. पण, आता फिनाले गाठूनही घरातील सदस्यांमधली भांडणं आणि मनातील खदखद आता चव्हाट्यावर आलीय. सीझनमधील सर्वात पहिली फायनलिस्ट ठरलेली तन्वी कोलते (Tanvi Kolte) सध्या सर्वांच्या निशाण्यावर आलीय. 'बिग बॉस मराठी सीझन 6'चा खेळ ऐन रंगात आल्यापासूनच तन्वी कोलतेचं जिंकणार असंच काहीचं बोललं जात होतं. तिचा खेळ, तिचं वागणं-बोलणं याचं सारेचजण कौतुक करत होते. पण, रेवा कौरसे घराबाहेर जात असतानाच तन्वी कोलते एक वाक्य बोलली आणि तिनं मिळवलेलं सारं गमावलं की, काय? असंच चित्र निर्माण झालंय. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by 𝗛𝗞_𝟬𝟱𝟬𝟱 (@hk_0505_)

'बिग बॉस'च्या या सीझनच्या विजेतेपदाची तन्वी कोलते प्रबळ दावेदार मानली जात होती. पण, आता विजेतेपद तिच्या हातून जाऊ शकतं, अशी चर्चा रंगलीय. रेवाच्या एलिमिनेशननंतर तन्वी असं काही बोलून गेली आहे की, नेटकऱ्यांनी तिला विजेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर केलं आहे. 

नेमकं काय घडलं? (Tanvi Kolte Trolled)

'बिग बॉसनं' घरातल्यांना धक्का देत मिड विक इविक्शन टास्क ठेवला. त्यावेळी घरात वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून आलेली रेवा कौरासे एलिमिनेट झाली. पण, रेवा टॉप 5 मध्ये असावी, अशी तन्वीची इच्छा होती. पण, रेवा घराबाहेर पडल्यामुळे तन्वीची इच्छा अपूर्ण राहिली. त्यामुळे रेवा घराबाहेर जात असताना तन्वीनं तिच्याबद्दल भावना व्यक्त केल्या. 

तन्वी कोलते रेवाबद्दल बोलताना म्हणाली की, "रेवा.. तुझ्यासाठी मला दोन शब्द बोलायचेत. बिग बॉसच्या घरात आली एक बाहुली. ती लेट आली पण, थेट मनात भरली.. टास्क ती एकदम जबरदस्त खेळली... माझ्याबरोबर पडली, उठली, रडली आणि हसली. पण या आठवड्यात ती मला सोडून चालली. आज खोटारडेपणा आणि धक्काबुक्की इथे राहिली... आणि माझ्या चांगल्या मनाची पोरगी थेट घरातून बाहेर चालली..."

तन्वी बोलत असतानाच अनुश्रीकडून जोरदार प्रत्युत्तर

तन्वी रेवाबद्दलच्या भावना व्यक्त करत असतानाच अनुश्री चिडते आणि लगेचच तन्वीला प्रत्युत्तर देते. "आमचं मन नाही चांगलं बरं का. आम्ही मनातूनच घाण आहोत. काहीही बोलते... माणूस घरातून चाललाय तरी हिचं वेगळंच सुरू आहे...", असं अनुश्री म्हणते. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bigg Boss Marathi 6 Reva Kaurse Evicted: 'बिग बॉस मराठी 6'मध्ये ग्रँड फिनालेच्या उंबरठ्यावर घरातली स्टार सदस्य एलिमिनेट; नाव जाहीर होताच सर्वांचा आक्रोश

महत्त्वाच्या बातम्या

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah FDA Promo: तुकाराम मुंढेंच्या FDA ची 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये दहशत, माधवी भिडेंना मोठा धक्का, PROMO पाहिला?
तुकाराम मुंढेंच्या FDA ची 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये दहशत, माधवी भिडेंना मोठा धक्का, PROMO पाहिला?
Popular Actress Neck Surgery: चार-चार तास बेडवर पडून गेम, रील्स पाहण्यात तासनतास घालवले; लोकप्रिय अभिनेत्रीच्या मानेची थेट सर्जरी; आता साधं उठणं-बसणंही झालं कठीण
चार-चार तास बेडवर पडून गेम, रील्स पाहण्यात तासनतास घालवले; लोकप्रिय अभिनेत्रीच्या मानेची थेट सर्जरी; आता साधं उठणं-बसणंही झालं कठीण
'रंगीला' गर्ल उर्मिला मातोंडकरच्या Ex नवऱ्यानं केलं दुसरं लग्नं, पत्नीवर प्रेमाचा वर्षाव; अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट, म्हणाली...
'रंगीला' गर्ल उर्मिला मातोंडकरच्या Ex नवऱ्यानं केलं दुसरं लग्नं, पत्नीवर प्रेमाचा वर्षाव; अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट, म्हणाली...
Sonu Nigam On CJP Protest Reaction: 'मी माझ्या वडिलांना वचन दिलंय..', CJP आंदोलनावर प्रतिक्रिया न देता संतापून निघून गेला; सोनू निगमने सांगितलं गप्प राहण्याचं कारण; म्हणाला...
'मी माझ्या वडिलांना वचन दिलंय..', CJP आंदोलनावर प्रतिक्रिया न देता संतापून निघून गेला; सोनू निगमने सांगितलं गप्प राहण्याचं कारण; म्हणाला...

व्हिडीओ

Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
HSRP Number Plate: वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
Embed widget