Suraj Chavan Daughter: 'माझी लाडाची लक्ष्मी...'; सूरज चव्हाणने पहिल्यांदाच दाखवला लेकीचा चेहरा, मुलगी अन् पत्नीचं केलं औक्षण, लक्ष्मीपूजनाचा VIDEO व्हायरल
Suraj Chavan Daughter: सूरज चव्हाणच्या लेकीची पहिली झलक समोर, व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल.

Suraj Chavan Daughter face: 'बिग बॉस मराठी सिझन 5'चा (Bigg Boss Marathi 5) विजेता सूरज चव्हाण (Suraj Chavan) कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सध्या तो आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वी सूरज चव्हाणला मुलगी झाली असून, त्याने अलिकडेच आपल्या लाडक्या लेकीचा चेहरा रिव्हिल केला आहे. दिवाळीच्या लक्ष्मी पूजनाच्या (Diwali) दिवशी सूरज चव्हाणने आपल्या लेकीचा चेहरा दाखवला आहे. सूरज चव्हाणने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर (Lakshmi Pujan) एक व्हिडीओ शेअर केला आहे. तो आपल्या लेकीची पूजा करत असल्याचं दिसत आहे. त्याने याचा व्हिडीओ शेअर करुन आपल्या लेकीचा चेहरा दाखवला आहे. सध्या त्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत असून, अनेकांनी सूरजच्या लेकीचं कौतुक केलं आहे.
सूरज चव्हाणच्या व्हिडीओची सोशल मीडियात चर्चा (Suraj Chavan Reveals daughter face)
सूरज चव्हाणने अलिकडेच शेअर केलेल्या व्हिडीओमुळे त्याची विशेष चर्चा होत आहे. एका व्हिडीओमध्ये सूरज चव्हाणच्या मांडीवर त्याची लेक दिसत आहे. सूरज चव्हाणची पत्नी संजना आपल्या लेकीची पूजा करत आहे. सूरज चव्हाणने या व्हिडीओतून आपल्या लेकीचा चेहरा दाखवला आहे. तर, दुसऱ्या व्हिडीओमध्ये संजना पाटावर बसली आहे. तिच्या मांडीवर त्यांची लेक दिसत आहे. सूरज चव्हाण लेकीची आधीची पूजा करतो. तिचे पाय धुवून, पायांवर हळद कुंकू, फुलं वाहून पूजा करतो. नंतर आपल्या पत्नीचीही पूजा करतो. सूरज चव्हाण आपल्या पत्नीचे पाय पाण्याने धुतो. नंतर पायांवर हळद - कुंकू आणि फुलं वाहतो. तसेच पत्नीचे पायाही पडतो. आणि आशीर्वादही घेतो. सध्या हे दोन्ही व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
सूरज चव्हाणने व्हिडीओ शेअर करुन, याला लक्षवेधी कॅप्शन दिलं आहे. 'माझी लाडूबाई, माझी लाडाची लक्ष्मीचे लक्ष्मीपूजन'; असं त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. सध्या सूरज चव्हाणने शेअर केलेल्या व्हिडीओची सोशल मीडियात चर्चा होत आहे. या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षा होत आहे. सूरज चव्हाणच्या व्हिडीओवर, सूरजची मानलेली बहीण जान्हवी किल्लेकर हिने देखील कमेंट केली आहे. 'आमची लक्ष्मी' असं म्हणत तिने सूरज चव्हाणच्या व्हिडीओवर कमेंट केली आहे. माहितीनुसार, स सूरज चव्हाणने 29 नोव्हेंबर 2025 रोजी संजनाशी लग्न केलं. तर, 4 सप्टेंबर 2026 रोजी गुडन्यूज शेअर केली. सूरज चव्हाणच्या लेकीचा जन्म झाला.
महत्त्वाच्या इतर बातम्या:























