(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सईचं ठरलं!
सई लोकुरने आता लग्न ठरवलं असून अनेकांचे अंदाज तिने चुकवला आहे. तिचा हा जोडीदार तिनेचं निवडला आहे.तो काय करतो.. कुठे काम करतो ते अद्याप गुलदस्त्यात आहे. पण लवकरच दोघांचा साखरपुडा होईल आणि याच वर्षात लग्न होईल असं कळतं.
बिग बॉसच्या पहिल्या सीझनमधून सगळ्यांच्या घराघरांत पोचली ती सई लोकुर. त्यानंतर आपल्या सोशल मीडियाद्वारे ती नेहमीच चर्चेत होती. तिच्या पोस्ट नेहमी व्हायरल होत होत्या. आता हीच सई लोकुर लग्न बंधनात अडकणार आहे. कारण तिने तिचा जोडीदार निवडला आहे.
सई लोकुर ही मूळची बेळगावची. तिने काही मराठी सिनेमात काम केलं. पण तिची चर्चा झाली ती बिग बॉसमध्ये. मराठी बिग बॉसच्या याा सीझनमध्ये तिची जोडी जमली होती ती पुष्कर जोगसोबत. बिग बॉसमध्ये मेघा धाडे, उषा नाडकर्णी, अनिल थत्ते, रेशम टिपणीस, राजेश शृंगारपुरे आदी मंडळी होती. यात सगळ्यात जास्त ग्लॅमर आपल्याकडे खेचलं ते सईने. त्यानंतर मात्र सई इतर फार कुठे दिसली नाही. पण तिच्या सोशल मीडियावरून ती सातत्याने पोस्ट टाकत होती. आता तिने एक पोस्ट टाकून आपल्याला जोडीदार मिळाल्याचं सांगितलं आहे.
'मला सगळे कुरुप म्हणायचे' , सुहाना खानने इन्स्टावर व्यक्त केली भावना
सईने या फोटोत आपल्या जोडीदाराचा चेहरा दाखवलेला नाही. मात्र, दोघेही पाठमोरे उभे असल्याचा हा फोटो आहे. सई लोकुरने आता लग्न ठरवलं असून अनेकांचे अंदाज तिने चुकवला आहे. तिचा हा जोडीदार तिने निवडला आहे. म्हणजे हा प्रेमविवाह नसून तो अरेंज असणार असल्याचं कळतं. तो काय करतो.. कुठे काम करतो ते अद्याप गुलदस्त्यात आहे. पण लवकरच दोघांचा साखरपुडा होईल आणि याच वर्षात लग्न होईल असं कळतं. लॉकडाऊनमुळे अत्यंत जवळच्या नातलगांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडेल.
Rhea Chakraborty | रिया, शोविकवर लावलेले आरोप चुकीचे, रिया सुशांतला ड्र्ग्ज द्यायची याचे पुरावे नाही- सतीश मानेशिंदे