एक्स्प्लोर

छोटा पुढारी, मोठा सवाल; अशोक खरात व्हिडिओ प्रकरणावरुन संताप, रुपाली चाकणकरांना थेट म्हणाला..

Ghan:shyam Darode on ashok kharat case: अशोक खरात प्रकरणात छोटा पुढारीची प्रतिक्रिया. रुपाली चाकणकरांवर टीका.

Ghan:shyam Darode reaction on fake baba case: संपूर्ण राज्यात अत्याचारी बाबाच्या कारानाम्याने थैमान घातला आहे. महिलांच्या श्रद्धेच्या  छायेखाली त्याने काळे कृत्य केले आहे.  त्याचे एक-एक कारनामे उघडकीस आल्यानंतर राज्यात आणि त्याच्या भक्तांमध्ये एकच खळबळ उडाली. धक्कादायक म्हणजे,  या भोंदू बाबाला रुपाली चाकणकर यांनी गुरू मानले होते. रुपाली चाकणकर यांचा अशोक खरातचे पाय धुतानाचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाले.   अनेकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच चाकणकरांवर टीकेचेही बाण सोडले.  या मागणीने इतका जोर धरला की, 20 मार्च रोजी रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.  या प्रकरणात आता बिग बॉस मराठी ५ फेम छोटा पुढारी  अर्थात घन:श्याम दरोडे यानं उडी घेतली आहे. त्यानं या संदर्भात एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत त्यानं अशोक खरातवर ताशेरे ओढले आहेत.

सोशल मीडियावर त्यानं एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत छोटा पुढारी म्हणतो, 'नमस्कार मित्रांनो आज मला अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे.  मित्रांनो आपण बोलतो आज महाराष्ट्र 21 व्या शतकाच्या दिशेनं जात आहे. आधुनिक काळ सुरू होत आहे.  प्रगती होत चालली आहे.  पण प्रगती होत असताना तितक्याच झपाट्याने महाराष्ट्र मागे येत आहे का? हे बघितलं पाहिजे.  कारण आज नागरिकांना भोंदूबाबाचं खूप वेड लागलं आहे'.

'म्हणजे भोंदू बाबांनी यायचं. कानात काहीतरी थुकलं की आपण त्याचा प्रचार करायचा. प्रचार - प्रसार झालं की आपोआप गोष्टी घडतात. मग आपण आपला इतिहास विसरायचा, आपण कोणत्या पदावर आहोत, हे देखील विसरायचं.  लोकांना  याच्यापासून, काय मिळणार, काय आदर्श घ्यायचा, हे देखील विसरुन जायचं.  तिच गोष्ट मी देखील तुम्हाला सांगतो, हा  कोण कुठला भोंदू बाबा, लबाड लांडगा, नाशिकचा अशोक खरात.  याचे कारनामे बघितले तर,  लाज वाटते. काय कारनामे करतोय. पीडित महिलांवर त्याने बलात्कार केलं आहे.  अत्याचार केलंय.  त्याच्याविरोधात पुरावे, सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. त्याला आता अटक झाली आहे'.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Chota pudari official (@chotapudari_official)

'मित्रांनो, त्याला सेलिब्रिटींनी तर साथ दिलीच, पण ज्या महिलांवर त्याने बलात्कार केला. अत्याचार केला. त्यांच्यासाठी आवाज उठवणाऱ्या राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर  या सुद्धा त्याला साथ देत होते.  त्यांच्या ट्रस्टच्या अध्यक्षाही होत्या. बरं एवढंच नाही तर, त्याला गुरु मानलं.  राजकारण्यांपासून समाजाला आदर्श मिळतो, पण  तुम्ही समाजाला नेमकं कोणता आदर्श देताय?  तुम्ही एवढ्या अंधश्रद्धाळू कधी झालात?',  असा सवाल छोटा पुढारीनं उपस्थित केला. 

'जनतेला तुम्ही सांगता अंधश्रद्धा निर्मूलन समिती उभी करा.  रुपाली चाकणकर तुम्ही महिलांना वाचवण्याऐवजी त्याच जाळ्यात ढकलताय का? गु्न्हेगारापेक्षा गुन्हेगाराला सपोर्ट करणाऱ्यांचा मोठा गुन्हा असतो.  प्रशासनाला काही करता आलं नाही तर, असल्या लोकांना जनतेच्या ताब्यात द्या. देवेंद्र फडणवीस यांनी पीडित महिलांना मदत करावी', असं म्हणत घन:श्यामनं महिलांच्या मदतीसाठी मागणी केली. 

'रुपाली तुम्ही राजीनामा दिला. यासाठी मी तुमचे मनापासून आभार मानतो. कारण असल्या महिला आयोगाची महाराष्ट्राला गरज नाही', असं मत छोटा पुढारीने व्यक्त केलं.

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Shraddha Kapoors Eetha: श्रद्धा कपूरच्या 'ईठा'मध्ये आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याची वर्णी; सिद्धार्थ जाधवनंतर कोणता कलाकार झळकणार?
श्रद्धा कपूरच्या 'ईठा'मध्ये आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याची वर्णी; सिद्धार्थ जाधवनंतर कोणता कलाकार झळकणार?
Kala Hiran The Battle for Legacy: हरणाला गोळी... सलमान खानमुळे वादाच्या कचाट्यात सापडलेला 'काला हिरण- द बॅटल फॉर लेगेसी'चा टीझर रिलीज
हरणाला गोळी... सलमान खानमुळे वादाच्या कचाट्यात सापडलेला 'काला हिरण- द बॅटल फॉर लेगेसी'चा टीझर रिलीज
Kiran Rao Supports Sonam Wangchuk: आमिर खानची Ex पत्नी सोनम वांगचुकच्या सपोर्टमध्ये मैदानात उतरली; सत्ताधाऱ्यांना तिखट शब्दात सुनावलं
आमिर खानची Ex पत्नी सोनम वांगचुकच्या सपोर्टमध्ये मैदानात उतरली; सत्ताधाऱ्यांना तिखट शब्दात सुनावलं
Adinath Kothare And Urmila Kanetkar Net Worth: आदिनाथ कोठारे अन् उर्मिलाने 15 वर्षांचं नातं संपवलं, नक्की कारण काय? जाणून घ्या दोघांकडे संपत्ती किती?
आदिनाथ कोठारे अन् उर्मिलाने 15 वर्षांचं नातं संपवलं, नक्की कारण काय? जाणून घ्या दोघांकडे संपत्ती किती?

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget