एक्स्प्लोर

Bigg Boss Couple Breakup: 'बिग बॉस' फेम कपलचं ब्रेकअप? कुनिका सदानंदचा खुलासा, पण...; सोशल मीडियावर चर्चांना उधाण

बिग बॉस 19 मधील अभिनेत्री कुनिका सदानंद हिने याप्रकरणी मोठा खुलासा केलाय. तिच्या प्रतिक्रियेची सध्या सोशल मीडियावरही चर्चा रंगलीय. 

Awez Darbar Nagma Mirajkar Breakup: ‘बिग बॉस 19’मधील स्पर्धक आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आवेज दरबार (Awez Darbar) आणि नगमा मिराजकर (Nagma Mirajkar) हे गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. काही काळापूर्वी हे दोघे सलमान खान यांच्या शोमध्येही एकत्र दिसले होते. मात्र, अलीकडे त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांनी जोर धरला आहे. आवेज दरबारच्या वाढदिवसाच्या पार्टीत नगमाच्या अनुपस्थितीमुळे या अफवांना आणखी उधाण आलं. यावर बिग बॉस 19 मधील अभिनेत्री कुनिका सदानंद हिने याप्रकरणी मोठा खुलासा केलाय. तिच्या प्रतिक्रियेची सध्या सोशल मीडियावरही चर्चा रंगलीय. 

आवेज-नगमाच्या नात्यावर पडदा?

या सगळ्या चर्चांदरम्यान ‘बिग बॉस 19’मधीलच स्पर्धक राहिलेल्या कुनिका सदानंद यांनी या प्रकरणावर मोठं वक्तव्य केलं आहे. आवेज आणि नगमासोबत तिचं चांगलं नातं असल्याने तिने या अफवांवर मौन सोडत तिने मोठे वक्तव्य केलं आहे. एका मुलाखतीत बोलताना कुनिका सदानंदने सांगितलं की, आवेज आणि नगमा आता वेगळे झाले आहेत. ही बातमी तिच्यासाठी खूप भावनिक असल्याचंही तिने म्हटलं. दोघांवर तिचे खूप प्रेम असल्यामुळे ही बातमी ऐकून तिला वाईट वाटत असल्याचं कुनिकाने स्पष्ट केलं.

आवेज नगमाकडून अधिकृत घोषणा नाही

कुनिका यांनी पुढे असंही म्हटलं की, त्यांना आशा आहे की दोघांमधील मतभेद मिटतील. मात्र, जर ते पुन्हा एकत्र आले नाहीत, तर भविष्यात त्यांना चांगले जोडीदार मिळावेत अशीही तिने इच्छा व्यक्त केली. कुनिकाच्या या वक्तव्यामुळे आवेज दरबार आणि नगमा मिराजकर यांच्या ब्रेकअपच्या बातम्यांना दुजोरा मिळाला असला, तरीही अद्याप या कपलकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे चाहते अजूनही त्यांच्या प्रतिक्रिया येण्याची वाट पाहत आहेत.

आवेज आणि नगमा यांच्या रिलेशनशिपची टाइमलाइन पाहिली तर, 2019 पासून आवेज दरबार आणि नगमा मिरजकर यांच्यात डेटिंगच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, ‘बिग बॉस’मध्ये त्यांनी आपल्या नात्याला अधिकृत मान्यता दिली. इतकंच नाही तर, शोदरम्यान आवेजने नगमाला प्रपोजही केलं होतं. दोघं लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चा देखील रंगल्या होत्या. पण मार्च महिन्यात आवेजने आपला वाढदिवस मित्र आणि कुटुंबीयांसोबत साजरा केला, मात्र त्या सेलिब्रेशनमध्ये नगमा कुठेही दिसली नाही. त्यानंतरच दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांना जोर आला. आता कुनिका सदानंदच्या खुलाशाने दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Hrithik Roshans Dating App: हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?
हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?
Pakistan Singer in India: पाकिस्तान सोडलं अन् भारतात राहायला आला हा गायक; आशा भोसलेंच्या आग्रहामुळे बॉलिवूडमध्ये एन्ट्री, 15 ऑगस्टलाच साजरा करतो वाढदिवस
पाकिस्तान सोडलं अन् भारतात राहायला आला हा गायक; आशा भोसलेंच्या आग्रहामुळे बॉलिवूडमध्ये एन्ट्री, 15 ऑगस्टलाच साजरा करतो वाढदिवस
Trisha Krishnan with Vijays Parents: विजय थलपतींच्या आई-वडिलांसोबत तृषा कृष्णन; पिवळी साडी अन् केसात गजरा, स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात अभिनेत्रीचा खास अंदाज
विजय थलपतींच्या आई-वडिलांसोबत तृषा कृष्णन; पिवळी साडी अन् केसात गजरा, स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात अभिनेत्रीचा खास अंदाज
Amitabh Bachchan on Dharmendra: धर्मेंद्र यांच्या घरात 4-5 अनोळखी जण शिरले अन् थेट पायऱ्या चढू लागले; 'ही-मॅन' ने प्रश्न विचारताच ..,अमिताभ बच्चन यांनी सांगितला किस्सा
धर्मेंद्र यांच्या घरात 4-5 अनोळखी जण शिरले अन् थेट पायऱ्या चढू लागले; 'ही-मॅन' ने प्रश्न विचारताच ..,अमिताभ बच्चन यांनी सांगितला किस्सा

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
Abhijit Dipke and Gulabrao Patil: अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
Embed widget