Bigg Boss 20 Qazi Tauqeer: 'बिग बॉस 20' मधून रॉकस्टार काजी तौकीर बाहेर? महिनाभरात खेळ संपला? गायकाच्या टीमची पोस्ट व्हायरल
Bigg Boss 20 Qazi Tauqeer: काजीचा 'बिग बॉस 20'चा प्रवास संपला? सिंगरच्या टीमची पोस्ट व्हायरल; महिनाभरातच घराबाहेर?

Bigg Boss 20 Qazi: 'बिग बॉस 20' (Bigg Boss 20) हा रिअॅलिटी शो प्रेक्षकांचं फूल्ल ऑन मनोरंजन करत आहे. या रिअॅलिटी शोमधून (Reality Show) काजी तौकीरला विशेष प्रसिद्धी मिळाली. सर्वत्र काजी तौकीरची विशेष चर्चा होत आहे. पण आता काजी तौकीरच्या चाहत्यांना मोठा धक्का बसणार आहे. प्रकृती ढासळल्यामुळे काजी तौकीर या रिअॅलिटी शोमधून एक्झिट घेणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्याची प्रकृती ठीक झाल्यानंतर त्याला पुन्हा शोमध्ये बोलवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. सोशल मीडियातील दाव्यानुसार, काजी तौकीरला डेंग्यू झाला आहे. 'बिग बॉस 20' (Reality Show) च्या घरात बऱ्याच दिवसांपासून काझी तौकीर आजारी होता. दरम्यान, काजी तौकीरच्या एव्हिकशन (Eviction) बातमीवर त्याच्या टीमने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या त्याची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
काजी तौकीर 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर जाणार? (Bigg Boss 20 Qazi Tauqeer Exit Show)
इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करण्यात आलेल्या पोस्टच्या माध्यमातून काजी तौकीरच्या टीमने एव्हिक्शनवर आपलं स्पष्टीकरण दिलं आहे. बऱ्याच दिवसांपासून रॉकस्टार आजारी पडले आहेत. त्याला अशक्तपणा वाटत आहे. तो वारंवार मेडिकल रुममध्ये जात आहे. विकनेस असूनही काजी रॉकस्टारप्रमाणे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. काजी तौकीरच्या टीमने पोस्टमध्ये लिहिले की, 'काजीच्या फॅन फॅमिलीसाठी एक महत्त्वाची अपडेट. गेल्या काही दिवसांपासून रॉकस्टार काजी तौकीर हा 'बिग बॉस'च्या घरात आजारी पडला आहे. जेव्हा त्याला संधी मिळते, तो आराम करतो. आपल्या आरोग्याची काजी सध्या काळजी घेत आहे. त्याला सध्या आजारामुळे अशक्तपणा वाटत आहे. त्यामुळे काजीला वारंवार मेडिकल रुममध्ये घेऊन जात आहेत. डॉक्टरांना काजीला तपासले'.
'प्रकृती बिघडल्यामुळे काजी घरात पूर्णपणे आराम करु शकत नाहीये. तो टास्कमध्ये सहभाग होत आहे. लोकांना एन्टरटेन करत आहे. पॉझिटिव्ह वातावरणही सकारात्मक करत आहे. त्याला तुमच्याकडून सकारात्मक एनर्जी, प्रेम आणि सपोर्ट हवा आहे', असं टीमने काजीच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 'प्रकृती सुधारल्यानंतर काजी पुन्हा 'बिग बॉस'च्या घरात येऊन प्रेक्षकांचं मनोरंजन करेल', असंही पोस्टमध्ये म्हणण्यात आलं आहे. काजीची तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी, यासाठी त्याचे चाहते प्रार्थना करीत आहे. 'गुरुकूल'फेम विजेता काजी तौकीर बऱ्याच काळापासून लाईमलाईटपासून दूर होता. पण 'बिग बॉस' या रिअॅलिटी शोमध्ये त्याने ग्रँड कमबॅक केला. त्याच्या चाहत्यांना अशी आशा आहे की, तो सलमान खानचा रिअॅलिटी शो नक्कीच जिंकेल.
महत्त्वाच्या इतर बातम्या:























