Bigg Boss 20: 'बिग बॉस 20'च्या घरात मोठा ट्विस्ट! विकेंड आधीच मीडविक एलिमिनेशन; कुणाचा पत्ता होणार कट?
Bigg boss 20 Midweek Elimination: मीडविक एलिमिनेशनमध्ये रिति तिवारीला व्हावं लागलं घरातून बेघर.

Bigg boss 20 Elimination: बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचा (Salman Khan) पॉप्यूलर रिअॅलिटी शो 'बिग बॉस 20'ची (Bigg Boss) विशेष चर्चा होत आहे. या रिअॅलिटी शोमधून प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन होत आहे. सध्या सदस्यांना विविध टास्क दिले जात आहे. टास्कमुळे प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन होत आहे, यात शंका नाही. बऱ्याच ट्विस्ट अँड टर्न्स या शोमध्ये पाहायला मिळत आहे. बिग बॉस 20'च्या घरात कुणाचा खेळ कधी पालटेल, सांगता येत नाही. कोण घरातून बेघर होईल? हे देखील सांगणं कठीण आहे. बिग बॉस 20'च्या घरात प्रत्येक दिवशी नवनवीन गोष्टी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. घरातील कंटेस्टेंट (Bigg Boss Contestants) स्वत:ला मजबूत करण्यासाठी टास्क जोमात पूर्ण करत आहेत. बिग बॉस 20' च्या घरात मिडवीक एलिमिनेशन (Midweek Elimination) झाले असल्याचं पाहायला मिळालं. या घरातून मनोज तिवारीची मुलगी आणि गायिका रिति तिवारी घरातून बेघर झाली असल्याचं पाहायला मिळालं.
मीडविकमध्ये कुणाला व्हावं लागलं घरातून बेघर (Bigg boss 20 Midweek Elimination Riti Tiwari got Evicted)
खरंतर, नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये उदिती सिंह, माही वीज आणि यंगला एक स्पेशल पावर देण्यात आली होती. या पावरचा वापर करुन हे तीन सदस्य कोणत्याही एका सदस्याची लाइफलाइन काढून घेऊ शकतात. यावेळी तिघांनीही रिति तिवारीला लक्ष्य केलं. कारण रिति तिवारीने आपली पहिली एक लाइफलाइन गमावली होती. त्यामुळे तिला स्वत:ला वाचवण्यासाठी इतर कोणताही पर्याय उरला नव्हता. शेवटी तिला शोमधून बाहेर पडावं लागलं. रिति तिवारीला बिग बॉस 20'च्या घरात स्वत:ची रॉकस्टार अशी इमेज तयार करायची होती. पण तिला हे शक्य झालं नाही. मिडविक एलिमिनेशनमध्ये तिला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.
'वीकेंड का वार'मध्ये गेमवरुन रिति तिवारीला सलमान खानने झापलं होतं. तसेच नाराजीही व्यक्त केली होती. आपल्या चुकांकडे लक्ष देण्याचा सल्ला सलमान खानने रिति तिवारीला दिला होता. पण तरीही रिति तिवारीच्या खेळात विशेष असा बदल पाहायला मिळालं नाही. स्पर्धक काझी तौकीरसोबत झालेल्या भांडणानंतर प्रेक्षक देखील रिति तिवारीवर नाराज होते. सोशल मीडियावरही नेटकऱ्यांनी रिति तिवारी एलिमिनेट व्हायला हवी, अशी इच्छा व्यक्त करुन दाखवली. दरम्यान, आता एलिमिनेट झाल्यानंतर रिति तिवारी आपल्या करिअरमध्ये कोणता बदल आणते? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:























