Lock Upp Season 2 : 'बिग बॉस 16' (Bigg Boss 16) चा विजेता एमसी स्टॅन (MC Stan) ठरला. पण, इतर स्पर्धकांची लोकप्रियता पण काही कमी झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खानच्या (Salman Khan) शो नंतर आता बिग बॉसची स्पर्धक अर्चना गौतमला एकता कपूरच्या 'लॉक अप 2' शोची ऑफर आली आहे.


अर्चनाला नवीन शोची ऑफर आली


मीडिया रिपोर्ट्सनुसार, अर्चना गौतमला एकता कपूरच्या 'लॉक अप 2' शोची ऑफर आली आहे. पण, अद्याप अर्चना गौतमकडून या संदर्भात कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. पण, अर्चनाला कंगना रनौतच्या तुरुंगात पाहण्यासाठी तिचे चाहते खूप उत्सुक आहेत. अर्चना विधानसभेच्या सीटवर बिकिनी क्वीनच्या नावाने खूप प्रसिद्ध आहे. तर, 'बिग बॉस 16' बद्दल बोलताना, अर्चना या सीझनमधील सर्वात लोकप्रिय आणि लोकांच्या आवडत्या स्पर्धकांपैकी एक होती. इतकेच नाही तर, प्रेक्षकांना तिला बिग बॉसची ट्रॉफी जिंकताना पाहायचं होतं. 'बिग बॉस'नंतर आता अर्चना गौतम 'लॉक अप 2'मध्ये दिसली तर प्रेक्षकांच्या मनोरंजनात कोणतीही कमतरता भासणार नाही.






'लॉक अप 2' शो कधी सुरु होणार?


कंगना रनौतच्या लॉक अप शोच्या दुसऱ्या सीझनबद्दल बोलायचे झाल्यास, हा शो मार्चमध्ये सुरू होणार आहे. मात्र, या शोच्या निर्मात्यांनी अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. याशिवाय शोची होस्ट कंगना रनौतच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास कंगना तिच्या होम प्रोडक्शनच्या 'इमर्जन्सी' चित्रपटात माजी पंतप्रधान 'इंदिरा गांधी'च्या (Indira Gandhi) भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटातील तिचा लूक प्रेक्षकांना फार आवडला आहे. आता इंदिरा गांधींच्या भूमिकेत कंगना पडद्यावर कोणती जादू दाखवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


महत्त्वाच्या बातम्या : 


Zeenat Aman: 'अश्‍लीलता पसरवण्याचा आरोप...'; सत्यम शिवम सुंदरम चित्रपटाच्या आठवणींना उजाळा देत झीनत अमान यांनी शेअर केली पोस्ट