Bhagat Singh Koshyari : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) आज देहरादूनकडे (Dehradun) प्रस्थान करणार आहेत. आज त्यांना निरोप देण्यात आला. राजभवनावर त्यांना नौदलाकडून मानवंदना देण्यात आली. महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) आज महाराष्ट्रात दाखल होणार आहेत. दरम्यान, आज सकाळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांची भेट घेऊन निरोप देऊन त्यांचे आभार मानले.


राज्यपालांचे विशेष सचिव राकेश नैथानी यांनाही निरोप


राजभवन परिवारातर्फे आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना निरोप देण्यात आला. यावेळी राज्यपालांचे विशेष सचिव राकेश नैथानी यांना देखील निरोप देण्यात आला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी दिलेला राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. ते आज महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरुन निवृत्त होत आहेत. रमेश बैस यांची राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी राज्यपालांचे प्रधान सच‍िव संताष कुमार, राकेश नैथानी, सहसचिव श्वेता सिंघल तसेच प्राची जांभेकर यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी आपल्या भाषणातून राज्यपालांच्या कार्याचा गौरव केला. 
 
भगतसिंह कोश्यारी यांनी राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांनी पत्र लिहिले होते. वारंवार केल्या जाणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यांनंतर कोश्यारी यांना मोठा विरोध झाला होता. त्यानंतर 12 फेब्रुवारीला अखेर त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला होता. भगतसिंह कोश्यारी हे महाराष्ट्राच्या इतिहासातले सर्वात चर्चित ठरलेले राज्यपाल ठरले आहेत. त्यांनी केलेल्या विविध वक्तव्यामुळं त्यांची जोरदार चर्चा झाली. 


भगतसिंह कोश्यारी यांनी केलेली वादग्रस्त वक्तव्य


मुंबईत बोलताना मुंबई-ठाण्यातील गुजराती आणि राजस्थानी लोकांबद्दल कौतुकाचे उद्गार काढले होते. मुंबई आणि ठाण्याबद्दल त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. महाराष्ट्रामध्ये विशेष करून मुंबई आणि ठाण्यातून गुजराती किंवा राजस्थानी लोकांना काढू टाकले, तर तुमच्याकडे पैसेच उरणार नाही. मुंबईही आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते, पण ती आर्थिक राजधानी म्हणून ओळखलीच जाणार नाही, असं वक्तव्य भगतसिंह कोश्यारी यांनी केलं होतं. त्यानंतर संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर समर्थ रामदास यांच्याविना छत्रपती शिवाजी महाराजांना कोण विचारेल? असं वादग्रस्त वक्तव्य केल्याने पुन्हा ते अडचणीत आले होते. “चाणक्यांशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल? समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? गुरुचं आपल्या समाजात मोठं स्थान असतं, तसंच छत्रपतींनी मला माझं राज्य तुमच्या कृपेने मिळालं आहे, असं समर्थांना म्हटलं,” अशा आशयाचं वक्तव्य कोश्यारींनी केलं होतं. तसेच महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबत देखील कोश्यारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांच्याविरोधात संतापाची लाट तयार झाली होती.


महत्त्वाच्या बातम्या:


Maharashtra Governor: देर आए दुरुस्त आए, भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनाम्यावर विरोधकांच्या प्रतिक्रिया