Zeenat Aman: अभिनेत्री झीनत अमान (Zeenat Aman) यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. काही दिवसांपूर्वी त्यांनी सोशल मीडियावर एन्ट्री केली आहे. त्या इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत आहेत. झीनत अमान या त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टद्वारे त्यांच्या चित्रपटांच्या तसेच वैयक्तिक आयुष्यामधील आठवणींना उजाळा देत आहेत. नुकताच त्यांनी सत्यम शिवम सुंदरम  (Satyam Shivam Sundaram)  चित्रपटाच्या लूक टेस्टसाठी काढलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोला त्यांनी खास कॅप्शन देखील दिलं आहे. 


झीनत अमान यांनी पोस्ट


झीनत अमान यांनी त्यांचा फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं,  'फोटोग्राफर जे पी सिंघल यांनी हा फोटो 1977 च्या सुमारास सत्यम शिवम सुंदरमच्या लूक टेस्ट दरम्यान काढले होते. आम्ही आर के स्टुडिओमध्ये ही फोटोची सीरिज शूट केली आणि माझे कपडे ऑस्कर विजेते भानू अथैया यांनी डिझाइन केले होते.'


पुझे पोस्टमध्ये  झीनत अमान यांनी लिहिलं,  बॉलिवूडच्या इतिहासाबद्दल माहिती असलेल्यांना हे माहित असेल की, सत्यम शिवम सुंदरममधील माझ्या रूपा या व्यक्तिरेखेमुळे खूप वाद निर्माण झाले झाले होते. या भूमिकेवर अश्‍लीलता पसरवण्याचा आरोप केला गेला. पण मला त्याची मजा वाटायची कारण मला मानवी शरीरामध्ये काहीही अश्लील वाटत नाही. मी दिग्दर्शक जे सांगेल ते करणारी अभिनेत्री आहे. हा लूक माझ्या कामाचा भाग होते. रूपा या भूमिकेची कामुकता हा चित्रपटाच्या कथानकाचा मुख्य भाग नव्हता. तो केवळ चित्रपटामधील एक भाग होता. प्रत्येक हालचालीची नृत्यदिग्दर्शन, तालीम आणि डझनभर क्रू सदस्यांसमोर सादरीकरण केले जाते. 






'दिग्दर्शक राज कपूर यांनी मला या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी दिली. पण माझ्या 'मॉडर्न' इमेजची देखील त्यांना काळजी वाटत होती. प्रेक्षक मला या  भूमिकेत स्विकारतील की नाही? याची त्याला खात्री नव्हती.  म्हणून त्यांनी माझी लूक टेस्ट घेतली. नंतर, या टेस्टच्या आधारे, आम्ही लताजींच्या 1956 च्या जगते रहो चित्रपटातील 'जागो मोहन प्यारे' या प्रसिद्ध गाण्यावर एक छोटा व्हिडीओ शूट केला.' असंही झीनत अमान यांनी पोस्टमध्ये लिहिलं.


पुढे त्यांनी लिहिलं, 'राज कपूर यांनी माझ्या भूमिकेला कसा प्रतिसाद मिळू शकतो? हे जाणून घेण्यासाठी राज कपूर यांनी आर के स्टुडिओमध्ये डिस्ट्रीब्यूटर्ससाठी 'जागो मोहन प्यारे' गाण्यावरील व्हिडीओच्या स्क्रीनिंगचे आयोजन केले होते. हे स्क्रिनिंग झाल्यानंचर या चित्रपटाचे सर्व विभागातील राइट्स विकले गेले.' 


1978 मध्ये सत्यम शिवम सुंदरम हा आयकॉनी चित्रपट आजही प्रेक्षक आवडीनं बघतात. या चित्रपटात झीनत अमान यांच्यासोबतच शशी कपूर, पद्मिनी कोल्हापुरे यांनी देखील काम केले. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Zeenat Aman: झीनत अमान यांची सोशल मीडियावर एन्ट्री; पोस्टद्वारे दिला जुन्या आठवणींना उजाळा