Bhushan Kadu : कलाकार हा रंगभूमीवर जितका सहज वारवरतो, तितकचं त्याच्या खऱ्या आयुष्यातला वावर हा सोपा नसतो. अनेकदा अनेक अडचणींचा सामना कलाकारांना करावा लागतो. असाच काहीसा अनुभव अभिनेता भूषण कडूचा (Bhushan Kadu) आहे. 22 व्यावसायिक नाटकं, 7 ते 8 सिनेमे करणारा हा विनोदवीर मागील काही वर्ष त्याच्या आयुष्यातला सगळ्यात कठिण काळ अनुभवत होता. त्यातच कोविडच्या काळात भूषणच्या बायकोनेही साथ सोडली. त्यानंतर मात्र भूष पुरता हादरला. स्वत:ला संपवण्याचा निर्णय, आर्थिक अचडणींचा सामना करत आता पुन्हा एकदा भूषण प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. पण या त्याच्या अनुभवाविषयी भूषणने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे. 


भूषणने नुकतीच लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. त्यामुळे त्याने आयुष्यातल्या अनेक अडचणी देखील सांगितल्या आहेत. बायको गेल्यानंतर स्वत:ला सावरणं, मुलाची जबाबदारी निभावणं अशा अनेक गोष्टींविषयी भूषण पहिल्यांदाच व्यक्त झालाय. त्याच्या अनेक अनुभवांनी चाहत्यांना बराच धक्का बसला आहे. गाडी होती पण त्यात डिझेल भरायला पैसे नव्हते, मित्राकडे एकदा 850 रुपये मागितले, वडापाव खाण्यासाठीही पैसे नसायचे, अशा अनेक धक्कायदायक गोष्टी भूषणने यावेळी सांगितल्या.



माझी कादंबरी वाचायची अर्धवटच राहिली - भूषण कडू


भूषणने म्हटलं की, 'प्रत्येक माणसाच्या आयुष्यात अनेक चढउतार असतात. तसंच कलाकाराच्या बाबतीतही असतं. अनेक दु:ख पचवली होती.वडिलांचं जाणं, आईचं जाणं मग आजीचं जाणं. सगळं छान सुरु असताना, चांगला संसार सुरु असताना अचानक लॉकडाऊनचा काळ आला आणि आमची कादंबरी वाचायची अर्धवटचं राहून गेली. कोविडच्या शेवटच्या लाटेमध्ये ती देवाघरी गेली. मग मात्र आयुष्यामध्ये खूप मोठा हादरा बसला. मुलाची जबाबदारी होती, अकरा वर्षांचं लेकरु. अचानक हे सगळं घडल्यामुळे थोडा हललो मी. कारण कलाकार हा संवदेनशील असतो. जर त्याच्याकडे संवेदना नसतील तर तो काहीच करु शकत नाही. नकळत हा होईना, जेव्हा सगळं जग सुरु झालं तेव्हा कादंबरीने या जगाचा निरोप घेतला.' 


स्वत:ला संपवण्याचा निर्णय घेतला - भूषण कडू 


यावर भूषनने म्हटलं की, 'कोविडच्या काळात पूर्ण इंडस्ट्री बंद पडली होती. प्रत्येकाच्या आर्थिक अडचणी होत्या. माझंही तेच होतं. जेव्हा कादंबरी आजारी होती, तेव्हा रोज थोडा थोडा आर्थिक संचय वापरत होतो. पण एका वेळेनंतर तो देखील संपला. त्यानंतर आयुष्यात खरी ओढाताण सुरु झाली.पण आम्हाला रसिकांसाठी चांगलचं रहावं लागतं. चांगली गाडी, कपडे. पण गंम्मत अशी होती की, गाडी आहे पण डीझेल भरायला पैसेच नव्हते.कामांसाठी जायचंय पण तिथपर्यंत पोहचायला पैसेच नव्हते.आपल्याला ही आर्थिक अडचण संपवायची असेल तर काम करणं गरजेचं आहे. खूप त्रासलो होतो, तेव्हा स्वत:ला संपवण्याचा निर्णय घेतला. कारण मुलाचं दु:ख पाहू शकत नव्हतो आणि त्याला काहीच देऊ शकत नव्हतो, याचं दु:ख होतं. मग एक दिवस ठरवलं की, हे सगळं संपवण्यासाठी स्वत:लाच संपवून टाकूया. पण ही समज जरा उशीरा आली. म्हणून मी सुसाईड नोट लिहायला  घेतली पण ती संपनेचा. मुलाला सांगायचो होतं, त्याच्यावर किती प्रेम आहे, बायकोचं महत्त्व. रोज लिहियचो. 8 ते 10 पान रोज लिहायचो.पण ती पूर्णच होत नव्हती.' 


सध्या भूषण काय करतो?


सध्या भूषण काय करतो हा प्रश्न मागील अनेक दिवसांपासून प्रेक्षकांना पडला आहे. याच उत्तर देताना भूषणने म्हटलं की, मुलाची जबाबदारी होती त्यामुळे अर्थकारण आलाचं. त्यामुळे कामही करायचं होतं. कलाकार हा रसिकांचा असतो, त्यांचं मनोरंजन करणं ही देवाने नेमून दिलेलं काम आहे.  त्याच रसिकांनी मला सांगितलं भूषण तुझ्यासारख्या कलाकाराची गरज आहे रंगभूमीला, सिनेमाला. अनेकांनी मला सोशल मीडियावर मेसेज करुन पुन्हा काम करण्याची विनंती केली. या प्रवासात प्रत्येकाने एकच प्रश्न विचारला सध्या काय करतोयस. पण त्याचं उत्तर माझ्याकडे नव्हतं. त्यानंतर ठरवलं की आपल्याला काम करायचं आहे. तेव्हा माझ्याबाबतीत अनेक अफवा पसरु लागल्या. तो या जगातच नाही, कोविडमध्ये तो देखील गेला, तो भारतातच नाही. पण मला काम कारयचं होतं. त्यानंतर काही चांगली लोकं माझ्या आयुष्यात आलीत. त्यामुळे सध्या अनेक सिनेमे करतोय. खूप काम सुरु आहे. 


ही बातमी वाचा : 


Jackie Shroff High Court: अभिनेता जॅकी श्रॉफची दिल्ली हायकोर्टात धाव, समोर आलं मोठं कारण