Mobile Recharge : अलिकडच्या काळात मोबाईल (Mobile) वापरत नाही (क्वचित सोडले तर) असा माणूस नाही. आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. मोबाईल वापरकर्त्यांच्या संदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे.  लोकसभेच्या निवडणुकीनंतर (Loksabha Election) मोबाईल वापरकर्त्यांना झटका बसणार आहे. कारण मोबाईलचा रिचार्ज (Mobile Recharge) 50 ते 250 रुपयांनी महागणार आहे. 


टेलीकॉम कंपन्यांनी त्यांचा महसूल वाढवण्यासाठी लोकसभा निवडणुकीनंतर टॅरिफ योजना वाढवू शकतात. ही वाढ साधारण 25 रुपयापर्यंतची असू शकते. विशेष म्हणजे 2019 ते 2023 पर्यंत कंपन्यांनी त्यांच्या टॅरिफ प्लॅनमध्ये 3 पट वाढ केली आहे. त्यामुळं लोकसभा निवडणुकीत मोबाईलचा वापर करणाऱ्यांना मोठा धक्का बसू शकतो. टेलिकॉम कंपन्या मोबाईलचे दर वाढवण्याच्या तयारीत असून, ही वाढ 25 टक्क्यांपर्यंत दिसू शकते.


शहरी आणि ग्रामीण भागात ही वाढ होणार


ARPU (Average revenue per user) वर वापरकर्त्यांची संख्या वाढेल म्हणजेच कंपन्यांच्या सरासरी महसूलात वाढ होणार आहे. ब्रोकरेज फर्म ॲक्सिस कॅपिटलच्या अहवालात असे म्हटले आहे की कंपन्यांनी 5G मध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. अशा परिस्थितीत कंपन्या नफ्याकडे लक्ष देत आहेत. अशा परिस्थितीत मोबाइल ऑपरेटर सुमारे 25 टक्क्यांनी दर वाढवू शकतात. माहितीनुसार, शहरी आणि ग्रामीण भागात ही वाढ दिसून येते. अहवालानुसार, पोस्टपेड आणि प्रीपेड दोन्ही योजना पूर्वीपेक्षा महाग होऊ शकतात. दुसरीकडे, इंटरनेट योजना देखील महाग असू शकतात.


नेमकी किती होणार वाढ


मोबाईल रिचार्जमध्ये वाढ होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे प्रति यूजर रेव्हेन्यूमध्ये वाढ. तज्ञांच्या मते, सध्या टेलिकॉम कंपन्यांचा प्रति वापरकर्ता सरासरी महसूल खूपच कमी आहे. याचा अर्थ प्रत्येक वापरकर्त्यावर मोबाइल कंपन्या किती खर्च करत आहेत. ते इतके कमावत नाहीत. या कारणास्तव, टेलिकॉम कंपन्या त्यांच्या टॅरिफ प्लॅनमध्ये 25 टक्क्यांनी वाढ करू शकतात. आता जर 25 टक्के दरवाढ झाली, तर सर्वसामान्यांच्या खिशावर किती परिणाम होईल, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. तुम्ही दर महिन्याला 200 रुपयांचे रिचार्ज केल्यास ते 50 रुपयांनी वाढेल. याचा अर्थ 200 रुपयांचा टॅरिफ प्लॅन 250 रुपयांना मिळेल. दुसरीकडे, जर तुम्ही 500 रुपयांचे रिचार्ज केले तर ते 25 टक्क्यांनी 125 रुपयांनी वाढेल. जर तुम्ही 1000 रुपयांचा रिचार्ज केला तर त्याचे मूल्य 250 रुपयांनी वाढेल आणि एकूण टॅरिफ किंमत 1250 रुपये होईल.


महत्वाच्या बातम्या:


तुमच्या मोबाईलमधील हे 13 धोकादायक ॲप्स आजच डिलीट करा, पाहा यादी