एक्स्प्लोर

45 कोटींचं बजेट, 1 लाखांचीच कमाई; महाफ्लॉप सिनेमामुळं ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीची अवस्था बिकट

Bhumi Pednekar Talks Career Ups and Downs: भूमी पेडणेकरचा लेडी किलर हा सिनेमा चित्रपटगृहात जोरदार आपटला. या सिनेमाविषयी तिनं अलिकडेच मुलाखतीत भाष्य केलं आहे.

Bhumi Pednekars Lady Killer Fails at Box Office: मराठीतील असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी आपल्या टॅलेंटच्या जोरावर  बॉलिवूडमध्ये वेगळं स्थान निर्माण केलं.  भूमी पेडणेकरनं आपल्या पहिल्याच चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच छाप सोडली.  तिनं आपल्या पहिल्या चित्रपटासाठी 30 किलो वजन वाढवलं होतं.   तिनं आपल्या कारकि‍र्दीची सुरूवात कास्टिंग डायरेक्टर म्हणून केली होती. आज ती बॉलिवूडमधील टॉपची अभिनेत्री आहे. तिनं  आपल्या कारकि‍र्दीत अनेक चढ उतार पाहिले.  फ्लॉप चित्रपटामुळे ती प्रचंड चर्चेत आली होती. लेडी किलर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला.  फक्त  सिनेमागृहात नसून, ओटीटीवर देखील या चित्रपटाला जागा मिळाली नाही.  तिनं अलिकडेच या चित्रपटाबाबत खुलासा केला आहे.

भूमी पेडणेकरचा क्राइम थ्रिलर दलदल ही वेब सिरीज नुकतीच रिलीज झाली.  यात तिचा नवा अवतार पाहायला मिळाला. तिनं अलिकडेच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिनं करिअरमधील चढ उतारांबाबत माहिती दिली. तसेच लेडी किलर या चित्रपटाला  मिळालेल्या अपयशाबद्दल भाष्य केलं. लेडी किलर हा सिनेमा चित्रपटगृहात जोरदार आपटला. हा चित्रपट भारतीय चित्रपट सृष्टीतील मोठ्या फ्लॉप सिनेमांपैकी एक ठरला. या सिनेमात भूमी पेडणेकर आणि अर्जून कपूर प्रमुख भूमिकेत होते.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Meagan Concessio (@meaganconcessio)

लेडी किलरच्या अपयशाबद्दल बोलताना भूमी म्हणाली, "लेडी किलर फ्लॉप ठरला, तो काळ माझ्यासाठी खूपच कठीण होता.  तेव्हा मला वाटलं, माझं करिअर आता संपलं आहे. या चित्रपटासाठी मोठी गुंतवणूक करण्यात आली होती. निर्मात्यांच्या मते, या चित्रपटाचं बजेट वाढल्यामुळे आणि पावसामुळे शूटिंग पूर्ण होऊ शकले नाही.  अपूर्ण असलेला चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित करणे ही सर्वात मोठी चूक ठरली", असं भूमीनं स्पष्ट केलं. 'हा चित्रपट माझ्यासाठी धक्का नसून, धडा होता', असंही अभिनेत्री स्पष्ट केलं.

लेडी किलर हा सिनेमा चित्रपटगृहात सुपरफ्लॉप ठरला. या सिनेमाचं बजेट 45 कोटी इतकं होतं.  मात्र, या सिनेमाची कमाई  एक लाखच्या आसपास झाल्याची माहिती आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी या चित्रपटानं 38,000 रूपयांचा गल्ला जमवला. परंतु, हा सिनेमा प्रेक्षकवर्गाला थिएटरपर्यंत खेचण्यात अपयशी ठरला.  त्यानंतर ओटीटी प्लॅटफॉर्मनं देखील या चित्रपटाला नाकारलं. युट्युबवर हा चित्रपट मोफत प्रदर्शित झाला.

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Dilip Joshi on Marathi Actors: 'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम
'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम
Ravi Kishan gets Trolled: 'मी 7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो'; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
'मी 7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो'; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Marathi Actor On PM Modi Video: 'संसदेतून शेपूट घालून पळायचं अन् इन्स्टावर..' PM मोदींच्या व्हीडिओवरून मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत; म्हणाला,' स्क्रिप्टेड पोकळ ज्ञान ..'
'संसदेतून शेपूट घालून पळायचं अन् इन्स्टावर..' PM मोदींच्या व्हीडिओवरून मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत; म्हणाला,' स्क्रिप्टेड पोकळ ज्ञान ..'
Kirti Kulhari Cyber Fraud : थिएटरमध्ये अलर्ट आला अन् काही मिनिटांत खात्यातून लाखो लंपास;लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीची मोठी सायबर फसवणूक
थिएटरमध्ये अलर्ट आला अन् काही मिनिटांत खात्यातून लाखो लंपास;लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीची मोठी सायबर फसवणूक;

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Embed widget