Ami Je Tomar 3.0 song Out: भूल भुलैय्या या चित्रपटातील मंजुलिकाचा दरबारातील राजासमोरचा आयकॉनिक डान्स असणारं 'आमी जे तोमार' या गाण्यानं आजवर प्रेक्षकांच्या मनाला रुंजी घातली आहे. मनोरंजनविश्वात सध्या बॉलिवूडच्या भूलभुलैय्या 3 ची प्रेक्षक आतुरतेनं वाट पहात आहेत. 1 नोव्हेंबरला येणाऱ्या या चित्रपटातील आमी जे तोमार 3.0 हे गाणं शुक्रवारी प्रदर्शित झालं आहे. मंजुलिका साकारणाऱ्या विद्या बालनसोबत यावेळी या गाण्यात माधुरी दिक्षितही दिसणार आहे. या गाण्यात दरबारातील विद्या-माधुरीच्या जुगलबंदीची मेजवानीच प्रेक्षकांना मिळणार आहे.


भूल भुलैय्या 3 या चित्रपटातील आमी जे तोमार 3.0 हे गाणं शुक्रवारी लाँच करण्यात आलं आहे. या गाण्याची झलक समोर आली असून आपल्या अनोख्या नृत्यानं ओजी मंजुलिका आणि डान्सिंग क्विन माधुरी दिक्षित या नृत्यांगणा आपल्या विलक्षण नृत्य कौशल्यानं दरबाराला भुरळ घालताना दिसतायत. 


विद्यासोबत माधुरीची जुगलबंदी


विद्या बालन मंजुलिका असणाऱ्या पहिल्या चित्रपटातील भूल भुलैया या आयकॉनिक गाण्यावर डान्स करताना दिसली होती, ज्याला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली होती. भूल भुलैया 2 मध्ये कार्तिक आर्यनने या गाण्यावर डान्स करून प्रेक्षकांची मने जिंकली होती आणि प्रेक्षकांनाही अरिजितच्या आवाजातील हे गाणे खूप आवडले होते. तब्बूनेही या गाण्यावर डबल रोलमध्ये डान्स केल्याचं दिसलं होतं. आता 'भूल भुलैया 3'मध्ये या गाण्यावर दोन मंजुलिका दिसल्या आहेत.. या चित्रपटात माधुरीला दुसरी मंजुलिका म्हणून दाखवण्यात आले आहे. या गाण्यात विद्या आणि माधुरीची जुगलबंदीही पाहायला मिळाली. श्रेया घोषालच्या आवाजातील हे गाणे प्रेक्षकांना प्रचंड आवडले आहे, तर विद्या आणि माधुरीचा अभिनयही अप्रतिम आहे.


 



दरवाजाच्या मागे नक्की काय रहस्य?


'भूल भुलैया 3' दिवाळीच्या मुहूर्तावर म्हणजेच 1 नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अनीस बज्मी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून कार्तिक आर्यन, विद्या बालन, माधुरी दीक्षित, तृप्ती डिमरी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. याशिवाय विजय राज, राजपाल यादव आणि संजय मिश्रा हे कलाकार सहाय्यक भूमिकेत आहेत. दरम्यान 25 ऑक्टोबर रोजी या सिनेमातील आयकॉनिक आमी जे तोमर हे गाणं प्रदर्शित झालं असून बंद दरवाजाच्या पलिकडे नक्की काय रहस्य दडलंय असं लिहित हा म्यूजिक व्हिडिओ लाँच करण्यात आलाय.


हेही वाचा:


Bhool Bhulaiyya 3 : कार्तिक आर्यनने चुकून सांगितला 'भूल भुलैया 3' च्या क्लायमॅक्सचा ट्विस्ट, चित्रपटासाठी घेतोय एवढी रक्कम