मुंबई : आशियातील सर्वात मोठी उत्पादक आणि ॲल्युमिनियम कंपोझिट पॅनल्सची पुरवठादार (एसीपी) असलेल्या विवा तर्फे सुपरस्टार अनिल कपूर यांची कंपनीचा पहिला ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्तीची घोषणा केली आहे. ही ऐतिहासिक भागीदारी एसीपी उद्योगासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे,ज्यामुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील कलाकार असलेल्या अनिल कपूर यांच्यासोबत सहयोग करणारा या उद्योगातील पहिला ब्रँड म्हणून विवाला स्थान मिळाले आहे. आर्किटेक्चरल डिझाईनच्या परिवर्तनातील विवा एसीपीचा प्रवास आणि अष्टपैलू अभिनेत्याचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व हे नावीन्यपूर्ण आणि गतिशील उर्जेची भावना प्रतिबिंबित करतात.


दोन दशकांहून अधिक कौशल्यांसह,विवा एसीपी उच्च-गुणवत्तेच्या,शैली आणि टिकाऊ क्लॅडिंग सोल्युशन्स साठी उच्च मापदंड प्रस्थापित करत आहेत. फसाडस्‌‍ पुन्हा परिभाषित करण्यापासून ते इंटिरिअरर्ससाठी समकालीन सोल्युशन्स प्रदान करण्यापर्यंत,विवाची उत्पादने अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी ओळखली जातात. यामध्ये 4 कलर कोटिंगसारख्या उद्योगातील नवकल्पनांचा समावेश आहे. 500 हून अधिक शेडसचा प्रदान करत विवा एसीपी आर्किटेक्ट,इंटिरियर डिझाईनर आणि प्रोजेक्ट डेव्हलपर्स यांची पसंती बनले आहेत.


या महत्त्वपूर्ण टप्प्याबद्दल भाष्य करताना विवा एसीपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक प्रकाश जैन म्हणाले की,विवा परिवारात अनिल कपूर यांचे स्वागत करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना मिळालेले अद्वितीय यश आमच्या जागतिक पातळीवर भारतीय अभिनवता घेऊन जाण्याचे ध्येय आणि उत्कृष्टतेप्रती आमची असलेली कटिबध्दता प्रतिबिंबित करते.एकत्र मिळून आम्ही क्लॅडिंग डिझाईनमध्ये नवीन दृष्टीकोनासह प्रेरित करण्याचे आमचे ध्येय असून हे ॲल्युमिनियम कंपोझिट पॅनल्समध्ये असलेले अमर्यादित सामर्थ्य दर्शविते.हा सहयोग विवाची पोहोच अजून वाढविणार असून आर्किटेक्टस आणि डिझाईनर्सना अद्वितीय जागा निर्माण करण्यासाठी सक्षम करेल.


अनिल कपूर हे आपले आकर्षक व्यक्तिमत्त्व आणि सगळ्यांशी जुळवून घेण्यासाठी ओळखले जातात.हे विवाचे अष्टपैलूत्व ,विश्वासार्हता आणि अभिनवता या मूळ तत्त्वांशी सुसंगत आहे.विवा एसीपीचा चेहरा म्हणून अनिल कपूर हे क्लॅडिंग सोल्युशन्स अधिक सुलभ आणि स्टायलिश बनविण्याच्या ब्रँडचे ध्येय पुढे नेत बांधकाम क्षेत्रातील शाश्वतता आणि प्रगत तंत्रज्ञानासाठी देखील प्रचार करतील.


विवा एसीपीचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून आपल्या भूमिकेबद्दल बोलताना अभिनेते अनिल कपूर म्हणाले की, विवा एसीपी सोबत भागीदारी करणे ही माझ्यासाठी एक अभिनवता आणि टिकाऊपणा दर्शविणाऱ्या ब्रँडशी संलग्न होण्याची अनोखी संधी आहे. क्लॅडिंगच्या प्रती दूरदर्शी दृष्टीकोन आणि अत्याधुनिक डिझाईनसह जागांना पुन्हा परिभाषित करण्याच्या त्यांच्या क्षमतेने मी प्रभावित झालो आहे. विवा एसीपीची उत्पादने सौंदर्यशास्त्र आणि कार्यक्षमतेचा परिपूर्ण समतोल दर्शवितात आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लक्षणीय प्रभाव पाडणाऱ्या ब्रँडचा भाग बनण्यास मी उत्सुक आहे.


या सहयोगाचे उद्दिष्ट एसीपीच्या अतुलनीय डिझाईन सामर्थ्यावर प्रकाश टाकणे हे आहे व याचबरोबर आधुनिक आर्किटेक्चर,इंटिरियर डिझाईन आणि शाश्वत बांधकाम पध्दतींमधील सामर्थ्य अधोरेखित करणे आहे.जगभरात ओळखले जाणारे अनिल कपूर ब्रँडचा चेहरा बनण्यासह उद्योगातील आपले नेतृत्वाचे स्थान भक्कम करत विवा एसीपी क्लॅडिंग क्षेत्रात जागरूकता आणि स्वारस्याची नवीन लाट प्रेरित करेल.






(Disclaimer: ABP Network Pvt. Ltd. and/or ABP Live does not in any manner whatsoever endorse/subscribe to the contents of this article and/or views expressed herein. Reader discretion is advised.)