Bhool Bhulaiyya 3 : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित भुल भुलैया 3 चित्रपट लवकरच थिएटरमध्ये दाखल होणार आहे. यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कार्तिक आर्यन आणि तृप्ती डिमरीचा आगामी भुल भुलैया 3 चित्रपट दिवाळीमध्ये चित्रपटगृहात दाखल होणार आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाह मिळताना दिसत आहे. चित्रपटातील गाणंही लवकरच रिलीज होणार असून त्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. यातच आता चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच कार्तिक आर्यनने मोठा ट्वीस्ट उघड केला आहे.


कार्तिक आर्यनने चुकून सांगितला ट्विस्ट


भूल भुलैया 3 रिलीज पूर्वीच प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. त्याआधी अभिनेता कार्तिक आर्यनने चुकून 'भूल भुलैया 3'चे मोठं सरप्राईज उघड केलं आहे. चित्रपटाच्या क्लायमॅक्समधील मोठी ट्वीस्ट कार्तिकने उघड केला आहे. कार्तिक आर्यनला त्याची चूक लक्षात आल्यावर त्याने लगेच विचारलं की हे लाइव्ह आहे की नाही? कार्तिकच्या या गौप्यस्फोटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.


'भूल भुलैया 3' चा क्लायमॅक्स उघड


'भूल भुलैया 3' चित्रपटामध्ये 'भूल भुलैया' चित्रपटातील खरी मंजुलिका म्हणजेच विद्या बालन दिसणार आहे. विद्या बालनसोबत माधुरी दीक्षितही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन आणि तृप्ती डिमरी मुख्य भूमिकेत आहेत. कार्तिक आर्यनसह त्याचे चाहतेही 'भूल भुलैया 3' साठी खूप उत्सुक आहे. या उत्साहात कार्तिकने चुकून या चित्रपटातील सर्वात मोठा ट्विस्ट सांगून टाकला. 


'भूल भुलैया 3'मध्ये कियारा अडवाणी?


दिग्दर्शक अनीस बज्मी यांनी भूल भुलैया 3 चित्रपटाचे दोन क्लायमॅक्स शूट केले आहेत. अलिकडेच ट्रेलर रिलीजच्या वेळी त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. यासंदर्भात चित्रपटातील कलाकारांनाही माहिती नाही. याशिवाय आता कार्तिक आर्यनने चित्रपटाबाबत मोठी हिंट दिली आहे.


पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत कार्तिक आर्यनने मोठा गौप्यस्फोट केला आहे. कार्तिकने या मुलाखतीतल बोलताना हिंट दिली आहे की, भूल भुलैया 3 च्या क्लायमॅक्समध्ये कियारा अडवाणी दिसण्याची शक्यता आहे. मुलाखतीत कार्तिक म्हणाला की, "आम्ही जेव्हा कियारासोबत शुटींग करत होतो, ओह, सॉरी... आम्ही जेव्हा विद्यासोबत शुटींद करत होतो... हे लाईव्ह नाही ना? आम्ही दोन क्लायमॅक्स शूट केले आहेत".


चित्रपटासाठी घेतोय एवढी रक्कम


मीडिया रिपोर्टनुसार, कार्तिक आर्यनने भूल भूलैया 2 चित्रपटासाठी 15 कोटी रुपये फी घेतली होती. त्यानंतर आता त्याने मानधनात वाढ करत 45 ते 50 कोटी फी आकारल्याची माहिती आहे. त्यासोबत तृप्ती डिमरीने या चित्रपटासाठी 80 लाख रुपये तर विद्या बालनने 10 कोटी रुपये घेतले आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Bigg Boss 18 : चुम दरांगने शिवी दिल्यावर अविनाश मिश्राची सटकली, रागाच्या भरात... ; अखेर घरातील सदस्यांनी मिळून केलं बेघर