एक्स्प्लोर

Bhootam Bhayam: हॉरर अन् कॉमेडीचा डबल डोस, रिलस्टार आता घाबरवणार अन् पोट धरुन हसवणार; 'भूतम भयम्' कधी होणार रिलीज?

Bhootam Bhayam Movie: हास्य आणि भीतीची धमाकेदार सिनेमॅटिक सफर. 'भूतम भयम्' कधी होणार रिलीज?

Bhootam Bhayam Reelstar: आपल्या भन्नाट कॉमिक टाइमिंगने करोडो प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी लोकप्रिय ‘ऑरेंज ज्यूस गँग’ आता पहिल्यांदाच केवळ डिजिटल विश्वापुरती मर्यादित न राहाता, एका मोठ्या पडद्यावरील भव्य सिनेमात मुख्य भूमिकेत धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाली आहे. झी स्टुडिओज प्रस्तुत आणि कायरा कुमार क्रिएशन्स निर्मित आगामी 'भूतम भयम्' हा हॉरर-कॉमेडी चित्रपट येत्या 24 जुलै रोजी चित्रपटगृहांत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'भूतम भयम्' हा चित्रपट तांत्रिक आणि कलात्मकदृष्ट्या अत्यंत दर्जेदार पद्धतीने बनवण्यात आला आहे. मराठी चित्रपटांमध्ये क्वचितच पाहायला मिळणारी भव्य दृश्यरचना, अचूक विनोद आणि उत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स यांचा एक अनोखा सिनेमाटोग्राफिक संगम या चित्रपटातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार असून यात रहस्यमय घटनांमध्ये अडकलेल्या सात बेरोजगार मित्रांची कथा दाखवण्यात आली आहे. 

या चित्रपटाची कथा जितकी मनोरंजक तितकीच ऑरेंज ज्युस गँगमधील या मित्रांची रिअल लाईफ स्टोरीही प्रेरणादायी आहे. मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेले हे मित्र सुरुवातीच्या काळात एका छोट्या खोलीत एकत्र येऊन, लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी छोटे व्हिडिओ रिल्स बनवायचे आणि त्यातूनच त्यांचा पुढील प्रवास सुरु झाला. 

रिलस्टार आता सिनेमात झळकणार (Bhootam Bhayam Reelstar Movie)

त्यामुळे आता या भव्य स्केलवर काम करण्याच्या अनुभवाबद्दल बोलताना नील साळेकर म्हणाला, "झी स्टुडिओजसारख्या मोठ्या बॅनरच्या चित्रपटात आणि थिएटर्सच्या मोठ्या पडद्यावर मुख्य भूमिकेत येणे हा आमच्यासाठी खूप मोठा क्षण आहे. 'भूतम भयम्' हा चित्रपट एका मोठ्या स्केलवर आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शूट केला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना एकाच वेळी घाबरवणार आणि खळखळून हसवणार देखील आहे. चित्रपटगृहातील मोठ्या पडद्यावर आणि उत्तम साऊंड सिस्टीमवरच अनुभवण्यासारखा हा सिनेमा आहे."

तर करण सोनावणे म्हणाला की, "लोकांनी डिजिटल प्लॅटफॉर्मवर आम्हाला खूप प्रेम दिले आहे, परंतु सिनेमाचे माध्यम पूर्णपणे वेगळे आहे. 'भूतम भयम्'साठी आम्ही कॅमेरा फेस करताना आमचे सोशल मीडिया स्टारडम संपूर्णपणे बाजूला ठेवले होते. तिथे आम्ही फक्त एक कलाकार म्हणून स्वतःला झोकून दिले. आम्हा सर्व मित्रांसाठी एकत्र एकाच वेळी मोठ्या पडद्यावर येणे हा आमच्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण आहे."

या चित्रपटात ऑरेंज ज्यूस गँगमधील करण सोनावणे, नील साळेकर, सौरभ घाडगे, सिद्धांत सरफरे आणि शुभम जाधव यांच्यासोबतच मराठी सिनेसृष्टीतील दोन लोकप्रिय चेहरे पुष्कराज चिरपुटकर आणि मनमीत पेम हे देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे या चित्रपटात अभिनयाची आणि मनोरंजनाची एक तगडी जुगलबंदीही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन रामचंद्र अरुण गांवकर यांनी केले असून, नरेन कुमार आणि महेश ज्ञानदेव कोरडे निर्माते आहेत तर बवेश जानवलेकर प्रस्तुतकर्ता आहेत. टाईमपास, सस्पेन्स आणि भितीचा एक जबरदस्त 'सिनेमॅटिक एक्सपिरीयन्स' असलेला हा चित्रपट २४ जुलैपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात पाहता येईल.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

विराट कोहली मैदानात जाण्याआधी कोणतं गाणं ऐकतो? त्याचा आवडता सिंगर कोण? किंग कोहलीने सर्व काही सांगितलं

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CID Fame Actor Vivek: CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?
CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?
Priyanka Chopra Hollywood Film Entry: प्रियांका चोप्राची आणखी एका बड्या हॉलिवूडपटात एन्ट्री; 'या'ऑस्कर विजेत्या अभिनेत्यासोबत झळकणार
प्रियांका चोप्राची आणखी एका बड्या हॉलिवूडपटात एन्ट्री; 'या' ऑस्कर विजेत्या अभिनेत्यासोबत झळकणार
Aai Kuthe Kay Karte Actress in Eetha: 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीची श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमात एन्ट्री; चाहत्यांच्या भुवया उंचावल्या, म्हणाली ..
'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीची श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमात एन्ट्री; चाहत्यांच्या भुवया उंचावल्या, म्हणाली ..
OTT Thriller Webseries: ‘आश्रम’चा थरार आवडला असेल तर या 7 सीरिज पाहाच; क्राइम, सत्ता अन् सस्पेन्सचा धडाका, वीकेंडसाठी लगेच सेव्ह करा
‘आश्रम’चा थरार आवडला असेल तर या 7 सीरिज पाहाच; क्राइम, सत्ता अन् सस्पेन्सचा धडाका, वीकेंडसाठी लगेच सेव्ह करा
Advertisement

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
Mecca Defence Pact: पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
Maratha Reservation: अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Mumbai High Court On FDA: तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
Embed widget