(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bhool Bhulaiyaa 2 Box Office Collection Day 5 : 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार भूल भुलैय्या-2? पाहा पाच दिवसांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन
पाहा भूल भुलैया-2 (Bhool Bhulaiyaa 2) या चित्रपटाचे पाच दिवसांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन-
Bhool Bhulaiyaa 2 Box Office Collection Day 5 : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan) भूल भुलैय्या-2 (Bhool Bhulaiyaa 2) सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. केवळ पाच दिवासांमध्ये या चित्रपटानं 76 कोटी पेक्षा जास्त कमाई केली आहे. हा चित्रपट रिलीज होऊन पाच दिवस झाले तरी या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. लवकरच हा चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल, असं म्हटलं जात आहे.
पाहा भूल भुलैय्या-2 चे आत्तापर्यंतचे बॉक्स ऑफिस कलेक्शन
कार्तिक आणि अभिनेत्री कियार अडवाणीचा हा चित्रपट 20 मे रोजी प्रदर्शित झाला होता. भूल भुलैया-2 मध्ये कार्तिक आर्यनसोबतच तब्बू, कियारा अडवाणी आणि राजपाल यादव यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. पाहा या चित्रपटाचे पाच दिवसांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन-
चित्रपटानं पहिल्याचं दिवशी म्हणजेच शुक्रवारी 14.11 कोटींची कमाई केली होती. तसेच दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं 18.34 कोटींची कमाई केली आहे. तिसऱ्या दिवशी या चित्रपटानं 23.51 कोटींची कमाई केली. सोमवारी म्हणजेच चौथ्या दिवशी या चित्रपटानं 10.75 कोटींची कमाई केली. आता पाचव्या दिवशी या चित्रपटानं 9.56 कोटींची कमाई करुन 76.27 कोटींचा टप्पा गाठला आहे. आता हा चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये कधी सामील होईल? याची कार्तिकचे चाहते उत्सुकतेने वाट पाहात आहेत.
'भूल भुलैया 2' मध्ये कार्तिक आर्यन हा रूह बाबा ही भूमिका साकारली आहे. ही भूमिका साकारण्यासाठी कार्तिकनं 15 कोटी मानधन घेतलं आहे. तर कियारा आडवाणीनं या चित्रपटामध्ये रीत ठाकुर ही भूमिका साकारली आहे. कियारानं या चित्रपटासाठी दोन कोटी रूपये मानधन घेतलं आहे.अनेक सेलिब्रिटींनी या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. अभिनेत्री कंगना रनौतनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन या चित्रपटाचं कौतुक केलं आहे.
संबंधित बातम्या