Bhool Bhulaiyaa 2 : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan) 'भूल भूलैय्या 2' (Bhool Bhulaiyaa 2) शुक्रवारी (20 मे) रिलीज झाला. या चित्रपटानं रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन...


भूल भूलैय्या 2 नं पहिल्या 'ओपनिंग डे'ला  जवळपास 14.11 कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट देशभरातील  3200 पेक्षा जास्त स्क्रीन्सवर रिलीज करण्यात आला. भूल भुलैय्य 2 ची सुरुवात मॉर्निंग शोमध्ये 20 टक्के ऑक्यूपेंसीनं झाली. चित्रपटाची सरासरी ऑक्यूपेंसी ही 35 टक्के आहे. ट्रेड अॅनॅलिस्ट कोमल नहाता यांनी दिलेल्या माहितीनुसार, भूल भुलैया 2 पाहण्यासाठी नॅशनल मल्टीप्लेक्स चेन्समध्ये लोक मोठ्या संख्येने येत आहेत. आता या वीकेंडला म्हणजेच शनिवारी आणि रविवारी हा चित्रपट किती कमाई करेल? याकडे चाहत्यांचे लक्ष आहे. 


राजास्थानमधील एका कुटुंबातील आणि मोंजोलिकाची गोष्ट या चित्रपटामध्ये दाखवण्यात आली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अनीस बज्मी यांनी केलं आहे. 2007 मध्ये रिलीज झालेल्या भूल भुलैया चित्रपटाचा हा दुसरा भाग आहे.भूल भुलैया चित्रपटाच्या पहिल्या भागामध्ये अक्षय कुमार, अमिशा पटेल, विद्या वालन आणि शाइनी आहूजा या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली होती. तर भूल भूलैया-2 मध्ये कार्तिक आर्यनसोबतच तब्बू, कियारा अडवाणी आणि  राजपाल यादव यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. कंगना रनौतच्या धाकड या चित्रपटासोबत भूल भूलैया-2 या चित्रपटांची टक्कर झाली आहे. 


कलाकारांनी घेतले एवढे मानधन 
'भूल भुलैया 2' मध्ये कार्तिक आर्यन हा रूह बाबा ही भूमिका साकारली आहे. ही भूमिका साकारण्यासाठी कार्तिकनं 15 कोटी मानधन घेतलं आहे. तर कियारा आडवाणीनं या चित्रपटामध्ये रीत ठाकुर ही भूमिका साकारली आहे.  कियारानं या चित्रपटासाठी दोन कोटी रूपये मानधन घेतलं आहे. 


हेही वाचा :