एक्स्प्लोर

Bhojpuri Actor Rohit Sharma Death: भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने उडवलं, प्रसिद्ध अभिनेत्याचा मृत्यू; शूटिंगवरून परत येताना भीषण अपघात

ही धडक एवढी जोरात होती की अभिनेता रोहितचे हेल्मेट फुटले व त्याच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता.

Bhojpuri Actor Rohit Sharma Death:  मनोरंजनसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. शूटिंगवरून परतत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने भोजपुरी चित्रपट अभिनेता आणि दिग्दर्शक रोहित शर्माला (Actor Rohit Sharma Death) जोरदार धडक दिली. या अपघातात अभिनेत्याचा मृत्यू झालाय. 20 जुलै रोजी संध्याकाळी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी गेलेला अभिनेता रोहित शर्मा 21 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास  परतत होता.त्यावेळी रस्त्याच्या विरुद्ध बाजूने भरधाव येणाऱ्या ट्रकने त्याच्या दुचाकीला धडक दिली.ही धडक एवढी जोरात होती की अभिनेता रोहितचे हेल्मेट फुटले व त्याच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता.

नेमकं घडलं काय?

अभिनेत्याचा भाऊ मंजेश यांनी दैनिक भास्करला दिलेल्या माहितीनुसार,' अभिनेता रोहित शर्मा सोमवारी संध्याकाळी एका भोजपुरी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी उत्तर प्रदेशातील मलिहाबादला गेला होता. त्याचा मित्रही त्याच्यासोबत होता.मात्र मंगळवारी पहाटे बाईकवरून परत येत असताना,रस्त्याच्या विरुद्ध बाजूने येणाऱ्या एका ट्रकने त्यांच्या बाईकला धडक दिली. ही धडक एवढी जोरात होती की अभिनेता रोहित शर्माचे हेल्मेट फुटले व त्याच्या पायांना आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. या अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा रोहित आणि त्याच्या मित्राला गंभीर अवस्थेत राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.मात्र उपचारादरम्यान अभिनेता रोहित शर्माचा मृत्यू झाला होता.त्याच्या मित्रावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, ट्रकचा नंबर ओळखण्यात यश मिळाले आहे. चालकाला लवकरच अटक केली जाईल असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.मंगळवारी रात्री उशिरा अभिनेता रोहित शर्माच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आलं. त्यानंतर त्याचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला असून अभिनेता रोहित शर्माच्या मृत्यूने भोजपुरी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसलाय. या अभिनेत्याने अनेक भोजपुरी चित्रपट आणि गाण्यांमध्ये काम केले होते.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Madhuri Dixit Host Kon Honaar Crorepati: बॉलिवूड गाजवणारी 'ही' मराठमोळी अभिनेत्री होस्ट करणार 'कोण होणार करोडपती'? सेलिब्रिटींच्या रिअ‍ॅक्शन्स पाहून नेटकऱ्यांनी नाव सांगून टाकलं...
बॉलिवूड गाजवणारी 'ही' मराठमोळी अभिनेत्री होस्ट करणार 'कोण होणार करोडपती'? सेलिब्रिटींच्या रिअ‍ॅक्शन्स पाहून नेटकऱ्यांनी नाव सांगून टाकलं...
Netflix Top Trending Movie: आधी थिएटर गाजवलं अन् आता नेटफ्लिक्सवर नंबर 1 बनलीय मराठमोळ्या अभिनेत्रीची 'ही' फिल्म; बॉक्स ऑफिसवर कमावलेला 41% प्रॉफिट
आधी थिएटर गाजवलं अन् आता नेटफ्लिक्सवर नंबर 1 बनलीय मराठमोळ्या अभिनेत्रीची 'ही' फिल्म; बॉक्स ऑफिसवर कमावलेला 41% प्रॉफिट
Garam Masala Actress Nikita Rawal Viral Video: प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत हादरवणारं कृत्य, सेल्फी घेताना चाहतीकडून बळजबरीनं किस, जबरदस्तीनं ओठ चघळले अन्... VIDEO
प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत हादरवणारं कृत्य, सेल्फी घेताना चाहतीकडून बळजबरीनं किस, जबरदस्तीनं ओठ चघळले अन्... VIDEO
Spider Man Becomes Highest Grosser Hollywood Movie:  'स्पायडर-मॅन: अ ब्रँड न्यू डे' भारतीय बॉक्स ऑफिसवर सुस्साट; आजवरचा सर्वात यशस्वी हॉलिवूडपट, जेम्स कॅमेरूनच्या 'अवतार'लाही लोळवलं
'स्पायडर-मॅन: अ ब्रँड न्यू डे' भारतीय बॉक्स ऑफिसवर सुस्साट; आजवरचा सर्वात यशस्वी हॉलिवूडपट, जेम्स कॅमेरूनच्या 'अवतार'लाही लोळवलं
Advertisement

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Teacher Recruitment: राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
Embed widget