Bhagyashree Mote : मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री मोटे (bhagyashree mote) ही सोशल मीडियावरील तिच्या पोस्टमुळे चर्चेत असते.  भाग्यश्री ही वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते. तिचे फोटो हे नेहमी चाहत्यांचे लक्ष वेधतात. तसेच नेटकरी तिच्या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात. तिचे लाखो फॉओअर्स आहेत. आता नुकतीच भाग्यश्रीनं तिच्या आयुष्यातील 'स्पेशल' व्यक्तीबाबतची माहिती चाहत्यांना दिली आहे. 


भाग्यश्रीनं  विजय पालांडे (Vijay Palande) याच्यासोबतचा रोमँटिक पोजमधील फोटो शेअर केला आहे. या फोटोला तिनं माइन असं कॅप्शन दिलं आहे. फोटोमधील विजय आणि भाग्यश्रीच्या रोमँटिक अंदाजानं अनेकांचे लक्ष वेधलं. विजयनं देखील हा फोटो शेअर केला असून त्यानं फोटोला, 'Completely Yours!'असं कॅप्शन दिलं आहे. विजय हा एक मेक-अप डिझायनर आहे. तो भाग्यश्रीसोबतचे फोटो नेहमी सोशल मीडियावर शेअर करत असतो. काही दिवसांपूर्वी भाग्यश्रीसोबतचा फोटो शेअर करुन विजयनं त्याला 'माय लव्ह' असं कॅप्शन दिलं. या फोटोला भाग्यश्रीनं 'लव्ह यू' अशी कमेंट देखील केली होती. 


विजयची पोस्ट






चिकाटी गडिलो चिथा कोटूडू या तेलगू सिनेमातून  भाग्यश्रीनं दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं. देवयानी ही तिची पहिली मराठी मालिका होती. या मालिकेमधील भाग्यश्रीच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.  भाग्यश्रीचा मराठी सिनेमा क्षेत्रातला पदार्पणाचा सिनेमा 'शोधू कुठे' हा होता. भाग्यश्रीने काय रे रास्कला, पाटील, माझ्या बायकोचा प्रियकर, विठ्ठल, मुंबई मिरर या सिनेमांमध्ये काम केलं आहे. जोधा अकबर, सिया के राम आणि देवों के देव महादेव या हिंदी मालिकांमध्ये भाग्यश्रीनं प्रमुख भूमिका साकारली होती. तिने विश्वगर्जना या व्यावसायिक नाटकामध्ये काम केले. भाग्यश्रीने स्वतःच्या करियरची सुरुवात मॉडेलिंगने केली.


हेही वाचा :