Rasik Dave : अभिनेते रसिक दवे (Rasik Dave) यांचे काल (29 जुलै) निधन झाले. वयाच्या 65 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्री केतकी दवे (Ketki Dave) यांचे पती रसिक दवे यांचे किडनी खराब झाल्यानं निधन झालं.  आज (30 जुलै) त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. रसिक दवे यांना 15 दिवसांपूर्वी  रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 


मालिका आणि चित्रपटांमध्ये केलं काम


रसिक यांनी  गुजराती भाषेतील चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांनी 1982 मध्ये रिलीज झालेल्या 'पुत्र वधू' या गुजराती चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. रसिक हे हिंदी आणि गुजराती अशा दोन्ही भाषांमधील चित्रपटांमध्ये काम करत होते. ‘मासूम’या चित्रपटामधून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. केतकी आणि रसिक यांनी  2006 मध्ये 'नच बलिए' या कार्यक्रमामध्ये भाग घेतला होता. या कार्यक्रमामधील या दोघांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. रसिक यांनी  संस्कार: धरोहर अपनों की, सीआयडी, ऐसी दीवानगी देखी नहीं कही आणि कृष्णा या मालिकांमध्ये काम केलं. रसिक यांनी मालिकेमधील अभिनयानं प्रेक्षकांची विशेष पसंती मिळवली. रसिक आणि केतकी यांची एक गुजरात थिएटर कंपनी देखील आहे.  






केतकी आणि रसिक यांना रिद्धी आणि अभिषेक ही दोन मुलं आहेत. रसिक दवे यांच्या निधनानं मनोरंजन क्षेत्रात शोककळा पसरली आहे. सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन रसिक यांना श्रद्धांजली वाहली. अभिनेते आणि निर्माते जेडी मजीठिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन रसिक दवे  यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. जेडी मजीठिया आणि रसिक यांनी अनेक नाटकांमध्ये एकत्र काम केलं आहे. 


जेडी मजीठिया यांची पोस्ट:


हेही वाचा: 


Sidhu Moose Wala : सिद्धू मूसेवालाला वडिलांनी दिली अनोखी श्रद्धांजली; काढला खास टॅटू