Balwinder Safri : 'भांगडा स्टार' अशी ओळख असणाऱ्या प्रसिद्ध पंजाबी गायक बलविंदर सफरी (Balwinder Safri)  यांचे निधन झाले आहे. वयाच्या 63 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून  बलविंदर हे एका गंभीर आजाराचा सामना करत होते. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण रुग्णालयात दाखल केल्यानंतर 86 दिवसांनी त्यांचे निधन झाले. 


रिपोर्टनुसार, बलविंदर सफरी हे ह्रदयासंबंधित अजाराचा सामना करत होते. त्यांच्यावर बायपास सर्जरी करण्यात आली. ही सर्जरी झाल्यानंतर ते कोमामध्ये गेले होते. त्यांनी 1990 मध्ये सफरी बॉईज बँडची स्थापना केली. त्यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळत होती. 


सेलिब्रिटींनी वाहिली श्रद्धांजली
नीरू बाजवा, गुरदास मान, जस्सी गिल आणि दिलजीत दोसांझ या सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन बलविंदर सफरी यांनी श्रद्धांजली वाहिली. जस्सी गिलनं सोशल मीडियावर बलविंदर सफरी यांचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला त्यांनं 'ही भेट नेहमी लक्षात राहील' असं कॅप्शन दिलं आहे. दिलजीत दोसांझनं ट्वीट शेअर करुन लिहिलं, ' वाहेगुरु, बलविंदर सफरी जी'


दिलजीत दोसांझचं ट्वीट:






गुरदास मान यांची पोस्ट:



बलविंदर सफरी यांच्या वे पांव भांगडा,चान मेरे मखना,यार लंगदे, पाओ भांगडा, गल सुन कुरिये या पंजाबी गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. बलविंदर सफरी यांच्या निधनानं पंजाबी चित्रपटसृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या :