एक्स्प्लोर

Sreelekha Mitra On Displaying Pm Modi Insulting Poster: अभिनेत्रीनं पंतप्रधान मोदींचं 'ते' आक्षेपार्ह पोस्टर आंदोलनात मिरवलं, पोलीस तक्रार दाखल होताच सारवासारव करत म्हणाली, 'चष्मा नसल्याने नीट पाहिलं नाही...'

Actress Sreelekha Mitra On Displaying Pm Modi Insulting Poster: अभिनेत्री श्रीलेखा मित्रा सध्या कायद्याच्या कचाट्यात सापडली आहे. आंदोलनात पंतप्रधानांवरचं आक्षेप्राह्य पोस्टर झळकवल्यामुळे तिच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Actress Sreelekha Mitra On Displaying Pm Modi Insulting Poster: काही दिवसांपूर्वी देशात झालेल्या विद्यार्थी आंदोलनानं (Student Protest) सत्ताधाऱ्यांनाही हादरवून ठेवलं, अखेर सरकारनं आंदोलकांच्या सर्वच्या सर्व मागण्या मान्य केल्या, तत्कालीन शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आणि अखेर आंदोलन संपलं. या आंदोलनात चांगल्या-वाईट अनेक गोष्टी घडल्या. अशातच आंदोलनात सहभागी झालेली बंगाली अभिनेत्री श्रीलेखा मित्रा (Actress Sreelekha Mitra) सध्या कायद्याच्या कचाट्यात सापडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचं आक्षेपार्ह्य पोस्टर आंदोलनात घेऊन फिरल्याप्रकरणी तिच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांत तक्रारी दाखल करण्यात आली आहे. भाजप नेत्या केया घोष (BJP Leader Keya Ghosh) यांनी आनंदपूर पोलीस ठाण्यात श्रीलेखा मित्रा यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवली. मीडिया रिपोर्टनुसार, बिधाननगर सायबर क्राईम पोलीस ठाण्यासह विविध जिल्ह्यांमध्येही त्यांच्याविरुद्ध अतिरिक्त तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

भाजप नेत्या केया घोष यांच्या तक्रारीनुसार, अभिनेत्री श्रीलेखा मित्रानं 24 जुलै रोजी सियालदह ते धर्मतला दरम्यान काढण्यात आलेल्या विद्यार्थी रॅलीत सक्रीय सहभाग घेतला होता आणि त्यात पंतप्रधान मोदींचं 'आक्षेपार्ह आणि अपमानजनक' व्यंगचित्र असलेलं पोस्टर जाहीरपणे झळकावलं होतं.

अभिनेत्री श्रीलेखा मित्राविरुद्ध तक्रार (Complaint Against Actress Sreelekha Mitra) 

अभिनेत्रीविरोधात करण्यात आलेल्या तक्रारीत म्हटलंय की, "जरी भारतीय संविधानातील कलम 19(1)(ब) अन्वये शांततापूर्ण निदर्शनाचा अधिकार दिला गेला असला, तरी या अधिकारावर वाजवी निर्बंध आहेत. राजकीय निदर्शनांद्वारे असहमती व्यक्त करण्याच्या अधिकाराचा अर्थ सार्वजनिक बदनामी करणे, सार्वजनिक शांतता भंग करण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक अपमान करणे किंवा जनक्षोभ भडकवणारी अपमानजनक चित्रे वापरणे असा होऊ शकत नाही..."

कोणताही FIR दाखल नाही, केवळ तक्रार

पोलिसांनी अभिनेत्रीविरोधात तक्रार स्वीकारली असली तरी, अद्याप कोणताही FIR दाखल करण्यात आलेला नाही, असं सूत्रांनी सांगितलं आहे. या वादावर भाष्य करताना मित्रा यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीय आणि पंतप्रधान मोदींचा अपमान करण्याचा आपला कोणताही हेतू नव्हता, असं सांगितलं आहे.

मी देशविरोधी नाही : श्रीलेखा मित्रा (Sreelekha Mitra Explanation On PM Modi Insulting Poster)

अभिनेत्री श्रीलेखा मित्रा म्हणाली की, "माझा एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मी एक विशिष्ट पोस्टर हातात धरलेलं दिसतंय... मी कदाचित भाजप-विरोधी असेन, पण मला देशविरोधी म्हणणं हास्यास्पद आहे. मी मुद्दाम ते पोस्टर हातात धरून फोटो काढले, ही कल्पनाही तितकीच अतार्किक आहे."

श्रीलेखा मित्राचं स्पष्टीकरण, "मी चष्मा नव्हता लावलेला..."

श्रीलेखा मित्रानं सांगितलं की, विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी ती रस्त्यावर उतरली होती आणि जमावासोबत धावत असतानाच कोणीतरी तिला तो पोस्टर दिला. चष्मा सोबत नसल्यामुळे तिला त्यावरील चित्र स्पष्टपणे दिसलं नाही. 

श्रीलेखा मित्रा नेमकं काय म्हणाली? (Sreelekha Mitra Explanation)

श्रीलेखा मित्रा म्हणाली की, "मी माझा चष्मा आणायला विसरले होते आणि माझ्याकडे फक्त गॉगल होता... त्यावेळी पोलीस लाठीमार करत होते, त्यामुळे पोस्टरवर नेमकं कोणतं चित्र छापलंय, हे न पाहताच तिनं घाईघाईनं त्यासोबत फोटोसाठी पोझ दिली..."

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Anupam Kher Stands For PM Narendra Modi: '...पण अश्लील भाषा मान्य नाही', पंतप्रधान मोदींची पाठराखण करण्यासाठी अनुपम खेर मैदानात, विद्यार्थी आंदोलन संपताच काय म्हणाले?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sunita Ahuja on Govinda: 'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
Dengue vs Typhoid: तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
Vaibhav Mangle Daughter: 'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
Samay raina: समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द
समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द
Advertisement

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget