Bawal Movie : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) गुरुवारी, अचानक कानपूरच्या रस्त्यावर निळ्या शर्टमध्ये बुलेट चालवताना दिसला आणि पुन्हा एकदा शहरातील रहिवाशांना आश्चर्यचकित केले. सुरुवातीला लोकांचा विश्वासच बसला नाही, पण चित्रपटाचा सेट आणि शूटिंग बघून बघ्यांची गर्दी होऊ लागली. वास्तविक वरुण धवन त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी कानपूरला आला होता, जिथे टीमने सेट तयार केला होता. शूटिंगचे वेळापत्रक इतके घाईघाईने ठरवले गेले होते की, कोणालाच आधीच माहिती नव्हती.
गुरुवारी सकाळी आठ वाजता दुकाने उघडत असतानाच अचानक एका गल्लीत चित्रपटाचा सेट तयार होऊ लागला. सुरुवातीला लोकांना काही समजले नाही, पण जेव्हा सिनेअभिनेता वरुण धवन बुलेटवर निळा शर्ट घालून बाहेर आला तेव्हा प्रेक्षकांनाही आश्चर्य वाटले. चित्रपटाच्या शूटिंगची माहिती मिळताच मित्र, नातेवाईक फोनवरून माहिती देऊ लागले. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस आणि सुरक्षा कर्मचारी आधीच तैनात असतानाही काही वेळातच लोकांचा जमाव जमला.
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता वरुण धवनच्या आगामी 'बवाल' या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. त्यात लखनौच्या आनंदबागच्या अरुंद रस्त्यांचा एक सीनही आहे, ज्याचं शूटिंग लखनौमध्ये होणार होतं. पण, लखनौ प्रशासनाची परवानगी नसल्यामुळे अरुंद रस्त्यांच्या शूटिंगसाठी कानपूरची निवड करण्यात आली आणि परवानगीनंतर गुरुवारी सकाळी शूटिंगला सुरुवात झाली. सकाळी टीम आली, सेट तयार केला आणि त्यानंतर बुलेटवर स्वार झालेला वरुण धवन निळ्या शर्टमध्ये बाहेर आला. शूटिंगच्या ठिकाणी, वरुण धवन त्याच्या बाईकवरून वेगाने निघाला आणि लेनिन पार्कपर्यंत बाईकवर गेला. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त सज्ज होता.
सात दिवस शूट करण्याची योजना
लखनौच्या आनंदबागच्या रस्त्यांचे चित्रण ‘बवाल’ चित्रपटात करण्यात येणार आहे. यासाठी टीमने कानपूरची निवड केली असून, गुरुवारपासून शूटिंगला सुरुवात केली आहे. येथे सात दिवसांचे शूटिंग प्लॅन असल्याचे सांगितले जात आहे. शुक्रवारी मेथोडिस्ट स्कूलमध्ये शूटिंग होऊ शकते. कानपूरमध्ये चित्रित होणाऱ्या सर्व दृश्यांमध्ये लखनौची संपूर्ण झलक दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी तेथे सेट तयार करून गुरुवारी आनंदबागसारखा देखावा दाखवण्यात आला.
चाहत्यांना दिला ऑटोग्राफ
कानपूरमध्ये अभिनेता वरुण धवनच्या शूटिंगची माहिती मिळताच चाहत्यांची गर्दी झाली होती. शूटिंगनंतर वरुण धवननेही चाहत्यांना ऑटोग्राफ देऊन त्यांची मने जिंकली. त्याच्याकडून ऑटोग्राफ घेण्यासाठी गर्दी जमली आणि वरुणने चाहत्यांना निराश केले नाही. त्यांनी 40हून अधिक लोकांना ऑटोग्राफ दिले.
हेही वाचा :