एक्स्प्लोर

Batwara 1947 Trailer: फाळणीचा थरार पुन्हा मोठ्या पडद्यावर! बंटवारा 1947'चा 3 मिनिटांचा ट्रेलर रिलीज; फाळणीच्या वेदना पाहून सुन्न व्हाल

सनी देओल पुन्हा एकदा दमदार भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, ट्रेलरला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे

Batwara 1947 Trailer: 1947... भारताच्या इतिहासातील असा काळ, ज्याने लाखो कुटुंबांचं आयुष्य कायमचं बदलून टाकलं. एका रात्रीत घरं, नाती, माणसं आणि स्वप्नं तुटली. याच काळजाला भिडणाऱ्या इतिहासाला मोठ्या पडद्यावर जिवंत करण्याचा प्रयत्न 'बंटवारा 1947' या चित्रपटातून करण्यात आला असून, त्याचा बहुप्रतीक्षित ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे..

आमिर खान प्रॉडक्शन्सच्या निर्मितीतील आणि राजकुमार संतोषी दिग्दर्शित या चित्रपटात सनी देओल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ट्रेलरची सुरुवातच फाळणीच्या रक्तरंजित वास्तवाने होते. जळणारी गावं, जीव वाचवण्यासाठी धावणारी माणसं, एकमेकांपासून कायमची दुरावलेली कुटुंबं आणि डोळ्यांत वेदना घेऊन जगण्याचा संघर्ष करणारे चेहरे... प्रत्येक दृश्य अंगावर काटा आणणारं आहे.सनी देओल पुन्हा एकदा दमदार भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, ट्रेलरला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे.

कसा आहे 'बंटवारा 1947'चा ट्रेलर?

'बंटवारा 1947' हा भारतीय सिनेसृष्टीतील महत्त्वाकांक्षी चित्रपटांपैकी एक मानला जात आहे. याआधी प्रदर्शित झालेल्या पोस्टर्स आणि टीझरमधूनच चित्रपटाविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आता प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये 1947 मधील भारताच्या फाळणीच्या काळातील सर्वात वेदनादायी वास्तव भावनिक पद्धतीने मांडण्यात आले आहे.

ट्रेलरमध्ये हिंसा, भीती आणि जबरदस्तीच्या स्थलांतरामुळे उद्ध्वस्त झालेल्या एका कुटुंबाची कथा दाखवण्यात आली आहे. एकत्र राहणारी माणसं फाळणीच्या आगीत एकमेकांपासून दूर जातात. मात्र, या सर्व वेदनांनंतरही माणुसकी, आशा आणि जगण्याची जिद्द कशी टिकून राहते, हे चित्रपट अधोरेखित करतो.

स्टारकास्टचीही एकच चर्चा

ट्रेलरमध्ये सनी देओल एका तत्त्वनिष्ठ आणि कोणत्याही परिस्थितीत आपल्या मूल्यांशी तडजोड न करणाऱ्या व्यक्तीच्या भूमिकेत दिसत आहेत. शबाना आझमी एका ज्येष्ठ महिलेच्या भूमिकेत असून, त्यांची समजूतदारपणा, साधेपणा आणि खंबीर विचारसरणी कथेला वेगळी उंची देते.तर प्रीती झिंटा एका अशा महिलेची भूमिका साकारत आहे, जी कठीण परिस्थितीतही आपल्या कुटुंबाला एकत्र ठेवण्यासाठी संघर्ष करते.

CBFC कडून 'A' प्रमाणपत्र

सनी देओल यांनी यापूर्वी सोशल मीडियावर माहिती देताना सांगितले होते की, 'बंटवारा 1947'ला CBFC कडून एकही कट न लावता मंजुरी देण्यात आली आहे. चित्रपटाला 'A' प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

देशातील प्रत्येक आईला समर्पित केला ट्रेलर

ट्रेलर रिलीज होण्यापूर्वी सनी देओल यांनी त्यांच्या आईसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत हा ट्रेलर देशातील प्रत्येक आईला समर्पित केला. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले, "माझी आईच माझ्यासाठी देव आहे. माझं प्रेम, माझं धैर्य आणि माझी ताकद. 'बंटवारा 1947' हा चित्रपट मी माझ्या आईसह जगातील प्रत्येक आईला समर्पित करतो."

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
Advertisement

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget