Bappi Lehiri Funeral : गोल्डन मॅन, डिस्को किंग अशी ओळख असणाऱ्या ज्येष्ठ संगीतकार बप्पी लाहिरी ( Bappi Lahiri ) यांनी वयाच्या 69 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.  हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या हटक्या संगीताने बप्पी लाहिरी यांनी विशेष ओळख निर्माण केली. त्यांच्या तम्मा तम्मा लोगे, डिस्को डान्सर, याद आ रहा है तेरा प्यार या बप्पी लाहिरी यांच्या सुपर हिट गाण्यांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. बप्पी लाहिरी यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर राजकीय, सामाजिक, बॉलिवूडसह सर्वच क्षेत्रातून श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. 


आज सकाळी 10 वाजता विले पार्ले येथील पवन हंस या स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.  बप्पी लाहिरी यांचा चाहता वर्ग मोठा आहे. बप्पी लाहिरी यांचे चाहते त्यांचे अंत्यदर्शन नऊ वजता विले पार्ले येथील स्मशानभूमीमध्ये घेऊ शकणार आहेत. 






बप्पी लाहिरी यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1952 रोजी पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथे झाला. 1973 साली त्यांनी नन्हा शिकारी या चित्रपटापासून बॉलिवुडमधील करीअरला सुरुवात केली.  बप्पी लाहिरींना संगीताचं सुरुवातीची शिक्षण आपल्या घरातच मिळालं. वयाच्या 17 वर्षापासूनच बप्पी लाहिरी हे संगीतकार होण्याचं ठरवलं होतं. तीन वर्षाचे असल्यापासून ते तबला वादन शिकले  त्यांची प्रेरणा होते एसडी बर्मन. एसडी बर्मन यांची गाणी ऐकूण ते रियाज करायचे.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha