बारामती : सहा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस बारामती (Baramati Court) अपर जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा पोक्सो अंतर्गत सुनावली आहे. याप्रकरणी दौंड तालुक्यातील पिलानवाडी (daund Rape case) येथील आरोपी अनिल बबन बनकरला नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 18 जून 2020 साली हा गुन्हा घडला होता. दौंड तालुक्यातील पिलानवाडी गावातील 6 वर्षीय मुलीवर अनिलने लैंगिक अत्याचार केला होता. 


पीडितेची आई भाजीपाला आणण्यासाठी गेल्याचा आरोपीने फायदा घेत 6 वर्षांच्या मुलीला पोल्ट्रीत नेऊन लैंगिक अत्याचार केला होता. या प्रकरणी मुलीच्या आईने दौंड तालुक्यातील यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी दोषारोपपत्र बारामती कोर्टात दाखल केल होतं.  


त्यानंतर मुलीची आई न्यायालयात फितूर झाली. परंतु अत्याचार झालेल्या चिमुरडीने कोर्टात साक्ष दिली. चिमुरडीने साक्ष बदलली नाही. याप्रकरणी बाल लैंगिक अत्याचार कलम 4,6,20,12 सह भादवी कलम 376, 504, 506 प्रमाणे शिक्षा सुनावण्यात आली आहे. मरेपर्यंत जन्मठेप तसेच 10 हजार रुपयांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


 





महत्वाच्या बातम्या