एक्स्प्लोर

'बालिका वधू'फेम अभिनेत्री सुरेखा सिक्री यांची प्रकृती चिंताजनक

सुरेखा सिक्री हे नाव भारतीय सिनेसृष्टीला नवं नाही. 1980 च्या दशकापासून त्या मनोरंजनसृष्टीत कार्यरत आहेत. मम्मो, तमस, किस्सा खुर्सी का आदी अनेक मालिका, चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या आहेत.

मुंबई : भारतातल्या अत्यंत उत्तम अभिनेत्रींपैकी एक गणल्या जाणाऱ्या चरित्र अभिनेत्री सुरेखा सिक्री यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. त्यांना दोन दिवसांपूर्वी ब्रेन स्ट्रोक आला होता. त्यानंतर त्यांना तातडीने सिटी क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असली तरी चिंताजनक असल्याचं बोललं जातं.

सुरेखा सिक्री हे नाव भारतीय सिनेसृष्टीला नवं नाही. 1980 च्या दशकापासून त्या मनोरंजनसृष्टीत कार्यरत आहेत. मम्मो, तमस, किस्सा खुर्सी का आदी अनेक मालिका, चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या आहेत. त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळवले आहेत. तमस, मम्मो आणि बधाई हो या चित्रपटातल्या भूमिकांसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठीच्या राष्ट्रीय पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. त्यांचं नाट्यक्षेत्रातलं योगदान लक्षात घेऊन संगीत नाटक अकादमीनेही त्यांचा गौरव केला आहे. सुरेखा सिक्री हे नाव भारतीय सिनेसृष्टीला माहीत होतं. पण ते घराघरांत पोचलं ते बालिका वधू या मालिकेमुळे. 2008 मध्ये त्यांना या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा टेली अॅवॉर्ड देऊन गौरवण्यात आलं. 2011 मध्येही त्यांनी बालिका वधूसाठीच्याच भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळवला.

याशिवाय, सलीम लंगडे पे मत रो, रघू रोमियो, झुबैदा, नसीम, रेनकोट, मिस्टर एंड मिसेस अय्यर आदी चित्रपटांत त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या आरोग्यासाठी अनेक कलाकार प्रार्थना करत आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांना सकाळी ज्युस पित असताना अचानक ब्रेन स्ट्रोक आला आणि त्या खाली कोसळल्या. त्यांना यापूर्वी 2018 मध्येही एकदा ब्रेन स्ट्रोक येऊन अर्धांगवायू झाला होता. पण त्यातून त्या प्रयत्नपूर्वक बाहेर आल्या. त्यानंतर त्यांनी कामही सुरू केलं. पण अचानक पुन्हा एकदा तशीच घटना घडल्यामुळे चिंता वाढली आहे.

सिक्री यांच्या नर्सने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयातही त्यांच्यावर उपचार सुरू झाले. त्यांच्या मेंदूत गाठी आढळल्या आहेत. औषधोपचारांनी त्या गाठी कशा विरघळतील यावर डॉक्टर लक्ष देत आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असली तरी त्या आयसीयूमध्ये आहेत. आणि त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Spider Man Becomes Highest Grosser Hollywood Movie:  'स्पायडर-मॅन: अ ब्रँड न्यू डे' भारतीय बॉक्स ऑफिसवर सुस्साट; आजवरचा सर्वात यशस्वी हॉलिवूडपट, जेम्स कॅमेरूनच्या 'अवतार'लाही लोळवलं
'स्पायडर-मॅन: अ ब्रँड न्यू डे' भारतीय बॉक्स ऑफिसवर सुस्साट; आजवरचा सर्वात यशस्वी हॉलिवूडपट, जेम्स कॅमेरूनच्या 'अवतार'लाही लोळवलं
Govinda on Mother: ...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
Detective on Actress: 'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
Mrunal Thakur on Dating: मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Teacher Recruitment: राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
Embed widget