एक्स्प्लोर

आता मराठीत 'बाहुबली' ; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

डॉ.अमोल कोल्हे यांनी बाहुबलीला या भूमिकेला आवाज दिला आहे

दिग्दर्शक एस.एस.राजामौली यांनी दिग्दर्शित केलेल्या बाहुबली चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.  निर्मितीसाठीचे उच्च तंत्रज्ञान, व्हीएफएक्सचा वापर, विराट सेटस् आणि त्याला भव्य, उत्तुंग कलात्मक स्वरूप बाहुबलीच्या यशाचे मापदंड ठरले. बाहुबलीच्या या यशाला मानवंदना देत त्याप्रती सन्मान व्यक्त करण्यासाठी ‘शेमारू मराठीबाणा’ वाहिनीने आपल्या प्रेक्षकांसाठी एक आगळी भेट आणली आहे. अभिनेते – दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी या मराठमोळया ‘बाहुबली’ चित्रपटाची कलात्मक जबाबदारी सांभाळली असून अभिनेते डॉ. अमोल कोल्हे, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, गश्मीर महाजनी, उदय सबनीस, संस्कृती बालगुडे, कौशल इनामदार, आदर्श शिंदे, बेला शेंडे  यासारखे अनेक नामवंत कलाकार याच्याशी जोडले गेले आहेत.
 
बाहुबलीच्या मराठी वर्जनबद्दल बोलताना ‘शेमारू एंटरटेनमेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरेन गडा म्हणाले की, “भारतीय सिनेसृष्टीच्या इतिहासातील सोनेरी पान म्हणजे बाहुबली हा चित्रपट. या चित्रपटाने फक्त कमाईचे नाही तर लोकप्रियतेचाही उच्चांक गाठला आहे. जगभरातील विविध भाषांमध्ये प्रदर्शित झालेला हा सिनेमा मराठी रसिकांसाठी मराठी रूपात, मराठी आवाजात आपल्या मराठी भाषेच्या लहेजात आणताना आम्हाला अतिशय आनंद  होत आहे'.]

‘शेमारू मराठीबाणा’ वाहिनीच्या संकल्पनेचे स्वागत करताना भव्यतेसोबत मराठी भाषेचा लहेजा प्रेक्षकांना वेगळा अनुभव देणारा असेल असं अभिनेते डॉ. अमोल कोल्हे सांगतात. दिग्दर्शकाच्या नजरेतून काय निर्माण होऊ शकतं हे दाखवून देणारा बाहुबली मराठीत आणत त्याच ताकदीने पोहचवण्याचा ‘शेमारू मराठीबाणा’ वाहिनीचा प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे सांगत याचा महत्त्वपूर्ण भाग होता आल्याचं समाधान अभिनेते–दिग्दर्शक प्रवीण तरडे व्यक्त करतात. गाजलेल्या कलाकृतीला मराठी मातीचा गंध असणार आहे हे नक्कीच प्रत्येकाला सुखावणारे आहे. आतापर्यंत  आपण  बाहुबलीचं  वैभव  पाहिलंय  आता  ते  आपल्यास  ऐकायला  मिळेल, असं अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने सांगितले. याचे लेखन स्नेहल तरडे यांनी केलं आहे.

 डॉ.अमोल कोल्हे यांनी बाहुबलीला आवाज दिला असून देवसेनेसाठी सोनाली कुलकर्णीचा आवाज लाभला आहे. मेघना एरंडे-शिवगामी, भल्लाल देव-गश्मीर महाजनी, कटप्पा-उदय सबनीस तर अवंतिका या व्यक्तिरेखेला संस्कृती बालगुडे हिचा आवाज असणार आहे. कौशल इनामदार यांचे संगीत दिग्दर्शन असून गीतलेखन वैभव जोशी, मिलिंद जोशी, अस्मिता पांडे यांनी केले आहे. आदर्श शिंदे, अवधूत गुप्ते, संजीव चिम्मलगी, हृषिकेश रानडे, हंसिका अय्यर, बेला शेंडे, केतकी माटेगावकर, मुग्धा कऱ्हाडे यांच्या आवाजात गाणी स्वरबद्ध करण्यात आली आहे. हा मराठमोळा अंदाज कसा असणार? जाणून घेण्याची उत्सुकता आता सगळ्यांनाच लागून राहिली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
Priya Berde Post: भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
Zoya Akhtar on Zindagi Na Milegi Dobara 2: 15 वर्षांनंतर 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'चा सीक्वेल? झोया अख्तरने दिली मोठी अपडेट 
15 वर्षांनंतर 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'चा सीक्वेल? झोया अख्तरने दिली मोठी अपडेट 

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Embed widget