Netflix : एस.एस. राजामौली यांनी दिग्दर्शित केलेल्या 'बाहुबली' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटातील प्रमुख कलाकार प्रभासला 'बाहुबली' या भूमिकेमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. नेटफ्लिक्सनं बाहुबली चित्रपटाचा प्रीक्वेल म्हणजेच  Baahubali: Before The Beginning या चित्रपटाची घोषणा केली होती. पण आता हा चित्रपट प्रदर्शित होणार नाही. त्यामुळे नेटफ्लिक्स मोठ नुकसान झालं आहे. 


रिपोर्टनुसार,  बाहुबली चित्रपटाच्या  प्रीक्वेलमध्ये चित्रपट निर्माते हे बाहुबलीची आई शिवगामीची गोष्ट प्रेक्षकांसमोर मांडणार होते. या चित्रपटामधील प्रमुख भूमिका अभिनेत्री  मृणाल ठाकुर साकारणार होती. मृणाल ठाकूरसोबतच वामिका गब्बी आणि  दाक्षिणात्य सुपरस्टार नयनतारा हे देखील या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणार होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन देव कट्टा हे करणार होते पण हा चित्रपट आता प्रदर्शित होणार नाही. 


बाहुबली चित्रपटाचा प्रीक्वेल प्रदर्शित होणार नसल्यानं नेटफ्लिक्सचं 150 कोटी रूपयांचं नुकसान झालं आहे. कारण या चित्रपटाचं काम हे सहा महिने सुरू होतं. या चित्रपटाचे अपेक्षेप्रमाणे काम होत नसल्यानं  निर्मात्यांना या चित्रपटाचा प्रीक्वल मध्येच थांबवणे योग्य वाटले. 


2015 मध्ये रिलीज झालेल्या बाहुबली चित्रपटात प्रभास, राणा दग्गुबती, अनुष्का शेट्टी, तमन्ना भाटिया, रम्या कृष्णन, सत्यराज या  कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली होती. बाहुबली चित्रपटाचा 39 व्या मॉस्को आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात देखील प्रीमियर झाला आणि या चित्रपटानं तीन राष्ट्रीय पुरस्कार देखील जिंकले आहेत.


हे देखील वाचा-


Zombivali : 'झोंबिवली' सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा, राज्यभरातील सिनेमागृहात बुधवारी होणार प्रदर्शित


Deepika Padukone, Ranveer Singh : बॉलिवूडचे लव्ह बर्ड्स दीपिका अन् रणवीरची पहिली भेट; अशी आहे दोघांची लव्ह स्टोरी


Padma Awards : 'पृथ्वीराज' सिनेमाचे दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदी, सोनू निगम यांना 'पद्मश्री' पुरस्कार जाहीर


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha