Deepika Padukone Ranveer Singh Lovestory : बॉलिवूडचे लव्ह बर्ड्स दीपिका पादुकोण (Deepika Padukone)  आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) हे नेहमीच चर्चेत असतात. या दोघांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते. पण अनेकांना दीपीका आणि रणवीरच्या लव्ह स्टोरीबाबत माहित नसेल. जाणून घेऊयात  दीपिका आणि रणवीरच्या पहिल्या भेटीबाबत...


दीपिकानं एका मुलाखतीमध्ये तिच्या आणि रणवीरच्या लव्ह स्टोरीबाबत सांगितले होते. तिने सांगितले की, रणवीर आणि तिची पहिली भेट ही सिंगापूरमध्ये एका पुरस्कार सोहळ्यात झाली. पुढे तिने सांगितले, 'मी यशराजच्या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आणि रणवीर तिथे उपस्थित होता. त्यावेळी तो माझ्यासोबत खूप फ्लर्ट करत होता.' दीपिकाने सांगितले की, त्यावेळी तो दुसऱ्या कोणाला तरी डेट करत होता.दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांची  लव्ह स्टोरी रामलिला चित्रपटाचे शूटिंग सुरू होण्यापूर्वीच सुरू झाली होती. 
 





काही दिवसांपूर्वी रणवीर आणि दीपिकाचा 83 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटात रणवीरने कपिल देव यांची भूमिका साकरली आहे. चित्रपटातील रणवीरच्या अभिनयाचे अनेक जण कौतुक करत आहेत. या चित्रपटात दीपिकाने कपिल देव यांची पत्नी रोमी देव यांची भूमिका साकारली आहे. दीपिका पादूकोणचा लवकरच पठाण हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच 'द इंटर्न' या आगामी चित्रपटामध्ये दीपिका प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. अमिताभ बच्चन देखील या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणार आहेत. 


हे देखील वाचा-


Zombivali : 'झोंबिवली' सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा, राज्यभरातील सिनेमागृहात बुधवारी होणार प्रदर्शित


Padma Awards : 'पृथ्वीराज' सिनेमाचे दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदी, सोनू निगम यांना 'पद्मश्री' पुरस्कार जाहीर


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha