एक्स्प्लोर

Mukesh Khanna Reacted On Ayodhya Ram Mandir Donation Scam: 'हे फक्त भक्तांनाच नाही, देवालाही लुटतायत...'; अयोध्येतील राम मंदिरातील देणगी घोटाळ्यावर 'शक्तिमान' फेम अभिनेता चिडला, लिहिलीय लांबलचक इन्स्टा पोस्ट

Mukesh Khanna Reacted On Ayodhya Ram Mandir Donation Scam: अयोध्या राम मंदिरात अर्पण करण्यात येणाऱ्या देणग्यांशी संबंधित एका घोटाळ्याचा पर्दाफाश झाल्यानंतर लोक अवाक् झालेत. मुकेश खन्ना यांनी आता या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली असून आपला संताप व्यक्त केलाय.

Mukesh Khanna Reacted On Ayodhya Ram Mandir Donation Scam: अयोध्या राम मंदिराच्या (Ayodhya Ram Mandir) एसआयटी (SIT) तपासात एक मोठा खुलासा झाला असून, राम मंदिरातील देणगी घोटाळ्याचा (Ayodhya Ram Mandir Donation Scam) पर्दाफाश झालाय. यामुळे अख्ख्या देशात खळबळ माजली आहे. तसेच, देशातील प्रत्येकालाच धक्का बसला आहे. मंदिरातील देणगीच्या नावाखाली झालेल्या या घोटाळा प्रकरणावर देशभरातून संताप व्यक्त केला जातोय. अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिराशी (Ram Mandir) देशभरातील लोकांच्या भावना जोडल्या आहेत, त्यामुळे मंदिरातील देणगी घोटाळा म्हणजे, थेट लोकांच्या भावनांसोबत खेळलं जातंय, असं म्हटलं जातंय. हे प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात (Supreme Court) पोहोचलेलं, पण या प्रकरणावर सुप्रीम कोर्टानं तातडीनं सुनावणी करण्यास नकार दिला. उत्तर प्रदेश सरकार (Government of Uttar Pradesh) आणि पंतप्रधान कार्यालय (PMO) यांनी तातडीनं कारवाई सुरू केलीय. 'शक्तीमान' (Shaktimaan) फेम अभिनेते मुकेश खन्ना (Mukesh Khanna) यांनीही या वादावर संताप व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, जनतेला एक महत्त्वाचं आवाहन केलंय.

अभिनेते मुकेश खन्ना नेमकं काय म्हणाले? (Mukesh Khanna On Ayodhya Ram Mandir Donation)

'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांनी राम मंदिर घोटाळ्यासंदर्भात इन्स्टाग्रामवर एक लांबलचक पोस्ट शेअर केलीय. त्यात त्यांनी लिहिलंय की, "तुम्हाला माहीत आहे का? मंदिरांमध्ये तुम्ही दिलेली रोख देणगी देवापर्यंत पोहोचतच नाही. ती मध्येच कुठेतरी गायब होते. सगळीकडे लुटमार सुरूये. 'लूट सको तो लूट लो' अशी एक म्हण आहे आणि लुटणारे लोक इथे मोठ्या प्रमाणात आहेत. मी एकदा म्हटलेलं, 'भरे पड़े हैं चोर, डाकू और बेईमान, फिर भी मेरा देश है महान'... पण देणगी लुटणाऱ्या या लोकांना मी कोणतं नाव देऊ? चोर, डाकू की बेईमान? यापैकी काहीच नाही, कारण हे लोक या सगळ्याच्या पलीकडचे आहेत..."

पुढे बोलताना मुकेश खन्ना म्हणाले आहेत की, "हे फक्त भक्तांनाच नाही, तर देवालाही लुटत आहेत. मी भक्तांना एवढाच सल्ला देईन की, तुम्ही देणगी देणं बंद केलं, तर घोटाळाही होणार नाही. त्यामुळे मंदिरांमध्ये देणगी, खासकरून पैसे आणि दागिने अर्पण करणं बंद करा. यातच देवाला आनंद होईल...", असंही मुकेश यांनी पुढे म्हटलंय.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mukesh Khanna (@iammukeshkhanna)

अयोध्येतील राम मंदिरात देणग्या आणि अर्पण केलेल्या वस्तूंची चोरी (Theft Of Donations And Offered Items At Ram Mandir In Ayodhya)

अयोध्येतील भव्य राम जन्मभूमी मंदिरात मिळालेल्या देणग्या आणि अर्पण केलेल्या वस्तूंच्या चोरीचं एक खळबळजनक प्रकरण समोर आलंय, ज्यानं संपूर्ण देशाला हादरवून सोडलं. नियमित ऑडिट या आर्थिक अनियमिततेचा प्रकार उघडकीस आल्यानंतर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानुसार स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकानं (SIT) मोठी कारवाई केली आहे. या मोठ्या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर, ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त डॉ. अनिल मिश्रा यांना राजीनामा द्यावा लागलाय, तर आठ आरोपींना अटक करून तुरुंगात पाठवण्यात आलंय.

प्रकरण नेमकं काय? (Ayodhya Ram Mandir Donation Scam)

नियमित ऑडिटदरम्यान, दानपेटीतून जमा झालेली रक्कम आणि बँकेत भरलेली रक्कम यामध्ये मोठी तफावत आढळल्यानं हा मोठा घोटाळा उघडकीस आला. तपासातून असं निष्पन्न झालंय की, मंदिरातील कर्मचारी, रोख रक्कम स्वीकारणारे कॅश काउंटरवरील कर्मचारी आणि पर्यवेक्षक यांनी संगनमत करून देणगी स्वरूपात मिळालेली रोख रक्कम, दागिने आणि चांदीच्या वस्तू यांचा पद्धतशीरपणे अपहार केलाय.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Atul Kulkarni Facebook Post: 'मिसिंग लिंकच्या मोठ्या बोगद्यात आम्ही सगळे...', अतुल कुलकर्णी संतापले, कोणतेही आढेवेढे न घेता थेटच म्हणाले...

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
Advertisement

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget