एक्स्प्लोर

Atul Todankar On Prashant Damle: ब्रेन हॅमरेज, मुलाची दहावी, घराचे EMI .. प्रशांत दामलेंनी न सांगता उचलला अभिनेत्याचा उपचाराचा खर्च

मराठी मनोरंजन विश्वात असे अनेक कलाकार आहेत जे कामाव्यतिरिक्त वैयक्तिक आयुष्यातही एकमेकांना मदत करताना दिसतात. 

Atul Todankar on Prashant Damle: मराठी रंगभूमी,  मालिका, विनोदी चित्रपटांमधून महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना खळखळून हसवणारा अभिनेता अतुल तोडणकर (Atul Todankar) गेल्या काही महिन्यांपासून मनोरंजन विश्वापासून जरा दूर आहे. दोन वर्षांपूर्वी अतुलला ब्रेन हॅमरेज असल्याचं निदान झालेलं. त्यानंतर त्याच्या आर्थिक परिस्थिती इतकी खालावली की उपचाराचे पैसे भरणेही त्याला कठीण झालं होतं. अलीकडेच राजश्री मराठीला दिलेल्या एका मुलाखतीत त्यानं त्याचा आजारपणातील आर्थिक संघर्षाविषयी सांगितलं. अतुलच्या उपचाराचा सर्व खर्च प्रशांत दामले (Prashant Damle) यांनी स्वतः उचलल्याचं त्यानं या मुलाखतीत सांगितलं. त्याच्या या मुलाखतीची सध्या मनोरंजनसृष्टीत चर्चा आहे. आता अतुल आजारपणातून पूर्णपणे बरा झालाय. त्याचं 'तरुण तुर्क म्हातारे अर्क ' नावाचं नाटक रंगभूमीवर प्रेक्षकांसमोर आलंय.  या निमित्ताने त्यानं त्याच्या आजारपणा विषयी मोकळेपणाने सांगितलं. 

मनोरंजन विश्वात अनेकदा असलेली नाती ही फरशी घट्ट नसतात. तात्पुरते, वरवरचे संबंध असतात असं अनेकांकडून ऐकायला मिळतं. पण मराठी मनोरंजन विश्वात असे अनेक कलाकार आहेत जे कामाव्यतिरिक्त वैयक्तिक आयुष्यातही एकमेकांना मदत करताना दिसतात. 

काय म्हणाला अतुल तोडणकर ? (Atul Todankar)

अतुल म्हणाला ' आता हे बोललं पाहिजे की नाही माहित नाही. पण आजारपणात माझे आयुर्वेदिक उपचार सुरू होते. साताऱ्याला सुयोग दांडेकर डॉक्टर यांच्याकडे मी उपचार घेत होतो. त्यांना कळलं तेव्हा त्यांनी 'ताबडतोब ये ' असं सांगितलं .पण हे उपचार खर्चिक असल्याचं मी त्यांना सांगू शकलो नाही. हो येईन येईन असं म्हणत राहिलो. तेव्हा मी तो खर्च देऊ शकणार नव्हतो. आजारपणामुळे उत्पन्नाचे सगळे मार्ग बंद झाले होते. कामच नव्हतं त्यामुळे पैसे कुठून येणार! त्यावेळी मुलगा दहावीला होता. घराचे हप्ते वगैरे अशा सगळ्या गोष्टी होत्या. पण त्यांनीही पैशाचा विचार करू नको असं म्हटलेलं. '

'माझा सगळा खर्च प्रशांत दामलेंनी उचलला ' (Atul Todankar on Prashant Damle)

अतुल पुढे म्हणाला ' तिकडे गेल्यानंतर त्यांनी आठ दिवस उपचार केले. त्यामुळे मला खूप फरक पडला. ब्रेन हॅमरेज मधून बरं होऊन आता मी काम करू शकतोय , यात त्यांचा मोठा वाटा आहे. मी नंतर त्यांना विचारलं तुमच्यासाठी काय करू? त्यांनी त्यावर फक्त एक प्रतिक्रिया द्यावी . मी म्हटलं ठीक आहे. पण वर्षभरानंतर त्यांनी मला सांगितलं की तुझ्या आणि माझ्यातला एक दुवा आहे. त्याने या सगळ्या गोष्टी हँडल केल्या. म्हणजेच माझा सगळा खर्च प्रशांत दामले यांनी उचलला होता. " असं अतुल तोडणकर म्हणाला. 

'एका लग्नाची पुढची गोष्ट नाटकाच्या 500व्या प्रयोगाला प्रशांत दामले यांनी त्यांच्या भाषणात या नाटकातून मला अतुल तोडणकर सारखा मित्र मिळाला असं म्हटलेलं, त्यावेळी मी अवाक झालो होतो. मी ती भावनाच व्यक्त करू शकत नाही.इतका अनुभवी माणूस आपल्या मैत्रीच्या नात्याचा उच्चार करतो ही खूप मोठी गोष्ट होती. हे पाठबळ माझ्याकडे आहे.इतका मोठा स्टार तुमच्या मागे उभा राहतो हीच तुमची ताकद आहे. " असं त्याने सांगितलं.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

OTT Horror Thriller: दिवसा पाहतानाही उडेल थरकाप! JioHotstar वरील वर्षभरापूर्वीचा हा हॉरर थ्रिलर पाहण्याचं धाडस कराल?
दिवसा पाहतानाही उडेल थरकाप! JioHotstar वरील वर्षभरापूर्वीचा हा हॉरर थ्रिलर पाहण्याचं धाडस कराल?
Medha Manjrekar : महेश मांजरेकरांच्या पत्नी मेधा मांजरेकर यांना कॅन्सर? सोशल मीडियावरील 'त्या' पोस्टने वेधले लक्ष
महेश मांजरेकरांच्या पत्नी मेधा मांजरेकर यांना कॅन्सर? सोशल मीडियावरील 'त्या' पोस्टने वेधले लक्ष
'धुरंधर 2'फेम गायिकेनं भर कॉन्सर्टमध्ये केली साखरपुड्याची घोषणा; स्टेजवर होणाऱ्या नवऱ्याला घेऊन आली अन् .. 
'धुरंधर 2'फेम गायिकेनं भर कॉन्सर्टमध्ये केली साखरपुड्याची घोषणा; स्टेजवर होणाऱ्या नवऱ्याला घेऊन आली अन् .. 
Cricketer praises Maharashtrachi Hasyajatra: माजी क्रिकेटपटूनं केलं महाराष्ट्राची हास्यजत्रेचं भरभरून कौतूक; म्हणाले 'समीरदादाचं ते स्कीट..', VIDEO
माजी क्रिकेटपटूनं केलं महाराष्ट्राची हास्यजत्रेचं भरभरून कौतूक; म्हणाले 'समीरदादाचं ते स्कीट..', VIDEO
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?
Eknath Khadse on BJP : एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावरून गुलाबराव पाटलांचा खोचक टोला
Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Goa Fort Ratnagiri: संवर्धनाच्या नावावर कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
संवर्धनासाठी कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
Pune News: पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
Beed Crime News: दुचाकीवरून जाताना अडवलं, काही समजायच्या आतच हल्लेखोरांनी 23 वर्षीय तरुणाला भररस्त्यात संपवलं; घटनेनं बीडमध्ये खळबळ
दुचाकीवरून जाताना अडवलं, काही समजायच्या आतच हल्लेखोरांनी 23 वर्षीय तरुणाला भररस्त्यात संपवलं; घटनेनं बीडमध्ये खळबळ
Embed widget