The Kashmir Files : 'द काश्मीर फाईल्स' (The Kashmir Files) या चित्रपटाची देशभरात चर्चा होत आहे. संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी चित्रपटाचे कौतुक केले. यूपीसह अनेक राज्यांमध्ये हा चित्रपट करमुक्त करण्यात आला असून, सर्वांनी हा चित्रपट आवर्जून पाहावा, असे आवाहनही करण्यात येत आहे. आता आसामचे (Assam) मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांनीही 'द काश्मीर फाईल्स' संदर्भात मोठी घोषणा केली आहे.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी 'द काश्मीर फाईल्स' चित्रपट पाहण्यासाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची विशेष सुट्टी जाहीर केली आहे. गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेला हा चित्रपट सातत्याने अनेक विक्रम मोडत असल्याचे दिसते आहे. हा चित्रपट प्रदर्शित होताच प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.
आसामच्या कर्मचाऱ्यांना चित्रपट पाहण्यासाठी मिळणार अर्धा दिवस सुट्टी!
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी 'द काश्मीर फाईल्स' चित्रपट पाहण्यासाठी सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना अर्धा दिवस सुट्टी जाहीर केली आहे. सीएम हिमंता यांनी याबद्दल ट्विट केले आणि म्हटले की, ‘आमच्या सरकारी कर्मचाऱ्यांना 'द काश्मीर फाईल्स' पाहण्यासाठी अर्ध्या दिवसाची विशेष रजा दिली जाईल, हे जाहीर करताना आनंद होत आहे. यासाठी त्यांना त्यांच्या वरिष्ठांना या संदर्भात कळवावे लागले आणि दुसऱ्या दिवशी चित्रपटाची तिकिटे जमा करावी लागतील.’
मध्यप्रदेशातही पोलिसांना सुट्टी!
मध्य प्रदेशातही सर्व पोलिसांना चित्रपट पाहण्यासाठी सुट्टी देण्यात येणार आहे. सोमवारी राज्य सरकारने याबाबतचा आदेश जारी केला आहे. गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी डीजीपींना हा चित्रपट पाहण्यासाठी पोलिसांना एक दिवसाची सुट्टी देण्यास सांगितले आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह सर्व आमदार आणि मंत्रीही हा चित्रपट पाहण्यासाठी जाणार आहेत.
या 7 राज्यांमध्ये चित्रपट करमुक्त!
देशातील 7 राज्यांनी या चित्रपटाळा करमुक्त घोषित केले आहे. या राज्यांमध्ये मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, गुजरात, गोवा, त्रिपुरा आणि कर्नाटक यांचा समावेश आहे. काश्मिरी पंडितांवर झालेला अनन्या आणि हल्ल्यांचे विदारक सत्य सर्वांपर्यंत पोहोचावे यासाठी हा चित्रपट पाहण्याचे आवाहन केले जात आहे.
संबंधित बातम्या
- The Kashmir Files : ‘सत्य समोर आणणारे असे आणखी चित्रपट बनले पाहिजेत’, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ‘द काश्मीर फाईल्स’चे कौतुक!
- The Kashmir Files Box Office Collection Day 4: आठवड्याच्या पहिल्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर दिसली ‘द काश्मीर फाईल्स’ची जादू!
- The Kashmir Files : बॉक्स ऑफिसवरील यशानंतर आता 'द कश्मीर फाइल्स' ओटीटीवर; 'या' प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha